जेव्हा अचानक पैशांची गरज उद्भवते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा जेव्हा आपल्याकडे नसतो तेव्हा साहजिकच कर्जाचा पर्याय अवलंबला जातो. यामध्ये प्रामुख्याने पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज घेण्याकडे आपल्यापैकी बऱ्याच जणांचा ट्रेंड दिसून येतो. पर्सनल लोन विविध बँकांच्या माध्यमातून दिले जाते व प्रत्येक बँकांचे व्याजदर व यासंबंधीचे नियम देखील वेगवेगळे असतात.
बँकांमध्ये जर आपण बँक ऑफ महाराष्ट्रचा विचार केला तर हे बँक सध्या आकर्षक व्याजदरासह पर्सनल लोन ऑफर करत असून साधारणपणे 9.25 टक्के पासून व्याजदर याकरिता बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते असेल व तुम्हाला मोठ्या रकमेची आवश्यकता असेल तर तुम्ही कमीत कमी कागदपत्रांसह बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्र जास्तीत जास्त वीस लाख रुपये पर्सनल लोन देते.
काय आहेत बँक ऑफ महाराष्ट्राच्या पर्सनल लोनची वैशिष्ट्ये?
1- व्यक्तीच्या सर्व वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्रातून पर्सनल लोन घेता येऊ शकते.
2- बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून कमी आणि आकर्षक व्याजदरामध्ये पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जाते.
3- तसेच बँक ऑफ महाराष्ट्र कडून पर्सनल लोन घेण्यासाठी फारच कमी कागदपत्रांची आवश्यकता भासते.
4- या माध्यमातून तुम्ही कमाल वीस लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात.
5- तसेच कर्ज प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचे छुपे शुल्क आकारले जात नाही.
6- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्जाच्या रकमेवरील व्याजदरावरील दररोज कमी होत असलेली जी काही शिल्लक असते तिचा फायदा देखील मिळतो.
7- बँक ऑफ महाराष्ट्र केंद्र आणि राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांना 9.25 टक्के व्याजदराने गृह कर्ज देखील देते. परंतु त्यांचे पगार खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असणे गरजेचे असून सिबिल स्कोर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असावा.
बँक ऑफ महाराष्ट्रमधून पर्सनल लोन घेण्यासाठी आवश्यक पात्रता
1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जर बँक ऑफ महाराष्ट्र कडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुमचे या बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
2- समजा तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुमचा पगार बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये येत असेल तर तुम्हाला अगदी सहजपणे पर्सनल लोन बँकेकडून मिळू शकते.
3- जर तुम्ही स्वयंरोजगार करत असाल तर बँक ऑफ महाराष्ट्र मधील तुमचे खाते कमीत कमी एक वर्ष जुने असणे गरजेचे आहे व या खात्यामध्ये सरासरी चांगल्या पद्धतीचा व्यवहार होणे गरजेचे आहे.
4- तसेच या कर्जासाठी अर्ज करताना अर्जदाराची किमान वय 21 वर्षे असावे.
5- किमान मासिक उत्पन्न पंचवीस हजार पेक्षा जास्त असावे.
6- तसेच तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणी किमान एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कामाचा कालावधी असावा.
कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता भासते?
यामध्ये अर्जदाराकडे पॅन कार्ड, रहिवासी पुराव्यासाठी( विज बिल/मतदार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स / टेलिफोन/ आधार कार्ड किंवा रोजगार कार्ड )
पगारदार व्यक्तींसाठी
मागील तीन महिन्यांची पगार स्लिप, फॉर्म 16 सह मागील दोन वर्षाचे आयटी रिटर्न, मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट इत्यादी
व्यावसायिकांसाठी आवश्यक कागदपत्रे
ताळेबंद लेखापरीक्षण अहवालासह मागील तीन वर्षाच्या आयटी रिटर्न, नफा तोटा खाते सादर करावे लागते तसेच कर नोंदणी पत्र किंवा कंपनीचा नोंदणी परवाना सादर करावा लागतो व त्यासोबतच मागील एक वर्षाचे बँक स्टेटमेंट द्यावे लागते.