Business Idea : तुम्हाला व्यवसाय करून पैसे कमवायचे आहेत? तुमचा हा विचार अत्यंत योग्य आहे. याचे कारण असे की, आजकाल नोकरी फार कमी प्रमाणात मिळते. मिळाली तरी त्यातून तुमच्या गरजा पूर्ण होतीलच असे नाही.
त्यामुळे बक्कळ कमाई करायची असेल तर बिझनेस हाच एकमेव मार्ग आहे. तुम्ही कोणताही बझनेस करू शकता. परंतु तुमच्याकडे भांडवल कमतरता असेल तर आम्ही तुम्हाला एक भन्नाट बिझनेस आयडिया येथे सांगणार आहोत.
यात जर तुमच्याकडे एखादे दुकान किंवा स्टोअर रूम असेल तर मग कामच झालं. तुम्हाला कसलेही पैसे न गुंतवता बंपर नफा मिळू शकतो. हा व्यवसाय आहे जुना किंवा वारपलेला माल विकण्याचा ऑफलाइन व्यवसाय.
ऐकून थोडं वेगळं वाटेल पण यात मिळणारा प्रॉफिट जर पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल. चला जाणून घेऊयात –
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला थ्रिफ्ट स्टोअर उघडावे लागेल. यामध्ये असे लोक की ज्यांच्या घरात अशा वस्तू पडून आहेत की ज्यांचा त्यांना उपयोग नाही असे लोक त्या वस्तू तुमच्या स्टोअरवर ठेवतील.
ज्यांना या उपयुक्त वस्तूंची गरज असेल तर ते लोक या वस्तू विकत घेतील. याच एक फायदा असाही आहे की, नवीन वस्तू बनवताना होणारे कार्बन उत्सर्जनास आळा बसेल. तुमचाही इन्कम सुरु होईल.
व्यवसायाचं स्वरूप समजून घ्या
दैनंदिन गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू तुम्ही स्टोअरमध्ये ठेवू शकता. उदाहरण घ्याच झालं तर लोकांच्या घरात कपडे प्रेस करण्यासाठी इस्त्री असते. कधीकधी त्यांना ती आवडत नाही म्हणून ते दुसरे विकत घेतात. मग पहिली सुस्थितीत असूनही तिचा युज होत नाही. ती अडगळीत जाऊन पडते.
मग जर तुम्ही ती इस्त्री तुमच्या दुकानात ठेवली तर तुम्हाला ती विकत येईल. यात तुम्ही तुमचे मार्जिन ऍड करून ती विकू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही सुस्थितीत असणारे पंखे, स्मार्ट टीव्ही, गॅस शेगडी, कुलर आदी वस्तू विकू शकता. यातून अनेक लोक मोठे इन्कम कमवत आहेत.
कमाईचे कॅल्क्युलेशन जाणून घ्या
या व्यवसायात चांगला नफा कमाऊ शकता. तुम्ही जेव्हा एखादी वस्तू घ्याल त्या किमतीत तुमचा वेळ, भाडे, मार्जिन आदी गोष्टी ऍड करून ती विका. साधारण तुम्हाला २५ टक्के मार्जिन या वस्तूंवर भेटत असते. त्या अनुशंघाने कॅल्क्युलेशन केले तर तुम्ही चांगली कमाई करू शकता.