स्पेशल

1000 रुपयांपेक्षा कमी तिकीट दरात करा भारतातील ‘या’ 5 मार्गांवर वंदे भारत ट्रेनने प्रवास; वाचा वंदे भारत ट्रेनचा रूट आणि तिकीट दर

भारतामध्ये सध्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अनेक वाहतुकीच्या साधनांमध्ये आमुलाग्र असे बदल करण्यात येत आहेत व अनेक नवीन वाहतुकीचे साधने उभारण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प तसेच रेल्वे व मेट्रो प्रकल्पांचा समावेश करता येईल. भारतीय रेल्वेच्या दृष्टिकोनातून बघितले तर प्रवाशी आणि मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे

व दररोज काही लाखोंच्या संख्येने प्रवासी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत असतात. आज भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये रेल्वेचे जाळे विस्तारले आहे व अजून  देखील यामध्ये अनेक विकासात्मक कामे करण्यात येत आहेत. यामध्ये पुढचे पाऊल टाकत प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव यावा याकरिता वंदे भारत ट्रेन ही संकल्पना भारतात सुरू करण्यात आलेली असून

त्याचाच भाग म्हणून सन 2019 मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेली होती व तेव्हापासून तर आतापर्यंत भारतामध्ये जवळपास बऱ्याच मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेले आहेत. या ट्रेनमध्ये अनेक प्रकारच्या अत्याधुनिक अशा सोयी सुविधा प्रवाशांना देण्यात आलेले आहेत  व त्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळतो.

 वंदे भारत अत्याधुनिक सुविधा असलेली ट्रेन

वंदे भारत ट्रेनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला लांबचा प्रवास अगदी कमी वेळेमध्ये पूर्ण करता येतो व लांबचा प्रवास इतर ट्रेन पेक्षा अधिक सुखकारक करण्याचे काम वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून पार पडते. जर आपण वंदे भारत ट्रेनमधील सुविधा पाहिल्या तर यामध्ये प्रवाशांना मनोरंजनाकरिता 32 इंच मोठी स्क्रीन, फ्री वाय-फाय तसेच रुंद काचेच्या खिडक्या इत्यादी सुविधा देण्यात आलेल्या आहेतच

परंतु तुम्ही या ट्रेनमध्ये इंटरनेट देखील चालवू शकतात व प्रवास करताना बाहेरील सुंदर दृश्यांचा आनंद देखील घेऊ शकतात. परंतु वंदे भारत ट्रेनने जर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिकीट दर खूप जास्त असल्याने तुम्हाला जास्तीचे पैसे याकरिता मोजावे लागतात.

परंतु यामध्ये भारताचे पाच रूट आहेत की त्या ठिकाणी जर तुम्ही वंदे भारत ट्रेनने प्रवास केला तर तुम्हाला अगदी 1000 रुपयापासून तिकीट घेऊन या ट्रेनने प्रवास करता येतो. त्यामुळे या लेखात आपण ते रूट कोणते आहेत? त्याबद्दलची माहिती बघू.

 या रूट वरील वंदे भारत ट्रेनने एक हजार रुपयात करता येईल तुम्हाला प्रवास

1- मुंबई सेंट्रल ते गांधीनगर सेंट्रल महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई ते गुजरात राज्यातील महत्त्वाचे असलेले शहर गांधीनगर यांच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनने तुम्ही कमीत कमी दरात प्रवास करू शकता.

ही ट्रेन बुधवार सोडून इतर दिवशी तुम्हाला उपलब्ध राहते. या ट्रेनच्या माध्यमातून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर हा 520 किलोमीटरचा प्रवास तुम्ही सहा तास 25 मिनिटांमध्ये पूर्ण करतात. तुम्हाला देखील या दरम्यान प्रवास करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी 755 ते 1095 पर्यंत तिकिटासाठी पैसे मोजावे लागतील.

2- मुंबई सीएसटी ते साईनगर शिर्डी महाराष्ट्रातील ही वंदे भारत ट्रेन किंवा हा रूट प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय असा आहे. या मार्गावर तुम्हाला आठवड्यातील मंगळवार सोडून इतर दिवशी ही ट्रेन उपलब्ध आहे.

मुंबई सीएसटी ते साईनगर शिर्डी ही वंदे भारत ट्रेन एकूण तीनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते व याकरिता पाच तास दहा मिनिटांचा कालावधी लागतो. या वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्यासाठी तुम्हाला 1095 रुपये ते 2405 रुपये पर्यंत तिकिटासाठी पैसे द्यावे लागतात.

3- डेहराडून ते आनंद विहार टर्मिनल या मार्गावर जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर आठवड्यातील मंगळवार सोडून इतर संपूर्ण दिवशी ही ट्रेन उपलब्ध असते. डेहराडून ते आनंद विहार टर्मिनल हे 302 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या वंदे भारताला चार तास 45 मिनिटांचा कालावधी लागतो व याकरिता प्रवाशांना 1065 पासून ते 2485 रुपयापर्यंत तिकिटासाठी पैसे द्यावे लागतात.

4- न्यू जलपाईगुडी जंक्शन ते गुवाहाटी या मार्गावरील वंदे भारत ट्रेन देखील आठवड्यातील मंगळवार सोडून इतर दिवशी उपलब्ध असते. न्यू जलपाईगुडी जंक्शन ते गुवाहाटी हे अंतर 407 किलोमीटरचे असून हे अंतर पूर्ण  करण्यासाठी या वंदे भारत ट्रेनला पाच तास 30 मिनिटांचा कालावधी लागतो. या वंदे भारत ट्रेनचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला 1075 ते 2025 रुपये तिकिटासाठी द्यावे लागतात.

5- हावडा ते पुरी या मार्गावर देखील आठवड्यातील मंगळवार सोडून इतर संपूर्ण दिवशी ही ट्रेन धावते. हावडा ते पुरी हे अंतर 500 किलोमीटरच्या असून हे अंतर पार करण्यासाठी या ट्रेनला सहा तास 25 मिनिटांचा कालावधी लागतो. यासाठी प्रवाशांना 1565 रुपये ते 2485 रुपये तिकिटासाठी द्यावे लागतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts