Foreign Trip:- ज्यांना कायम फिरण्याची व वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्याची आवड असते असे व्यक्ती हे कुठल्याही प्रकारे पैशांचा विचार न करता फिरत असतात व वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असतात. एवढेच नाही तर असे व्यक्ती भारतातच नाही तर अनेक विदेशवारी देखील करतात व दुसऱ्या देशांना भेट देतात.
आपल्यापैकी बऱ्याच जणांची एखाद्या दुसऱ्या देशाला भेट येण्याची व त्या ठिकाणी फिरण्याची आवड असते. परंतु दुसऱ्या देशाचा प्रवास म्हटला म्हणजे मोठ्या प्रमाणावर खर्च येतो व खर्च येत असल्याने अनेक जण इच्छा असून देखील परदेशात फिरण्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही.
परंतु जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत ते भारताच्या जवळपास असून तुम्ही कमी खर्चामध्ये त्या त्यामध्ये जाऊन फिरू शकतात. साधारणपणे पन्नास हजार रुपयांमध्ये तुम्ही अनेक दिवस त्या ठिकाणी राहू शकतात.
कमी पैशांमध्ये फिरता येतील तुम्हाला हे देश
1- मलेशिया– तुम्हाला पर्वत तसेच समुद्रकिनारी, वन्यजीव आणि जंगलात राहण्याची आवड असेल तर तुम्ही मलेशियाला नक्की भेट देणे गरजेचे आहे. असे म्हटले जाते की जगातील सर्वात जास्त फुले मलेशियामध्ये आढळून येतात व या ठिकाणचे खाद्यपदार्थ देखील पर्यटकांना खूप आवडतात.
तुम्हाला जर मलेशियाला जायचे असेल तर विमानाचे भाडे वीस हजार ते 25 हजार रुपये इतके येते.जर ऍडव्हान्स बुकिंग केली तर त्यामध्ये तुमची बचत होऊ शकते. मलेशिया मध्ये एका दिवसासाठी राहण्याचा व प्रवास करण्यासाठी तुम्हाला साडेतीन ते पाच हजार रुपयांचा खर्च लागेल.
2- कंबोडिया– या देशाला मंदिरांचा देश असे देखील म्हटले जाते. या देशातील अंगकोरवाटचे मंदिर जगात प्रसिद्ध आहे आणि दररोज हजारो लोक या ठिकाणी भेट देतात. कंबोडियामध्ये तुम्ही सुंदर बेटे तसेच भव्य राजवाडे पाहू शकतात.
तसेच या देशाचे ग्रामीण जीवनशैली तुम्हाला पाहिजे असेल तर मी पाहू शकतात कारण या ठिकाणची ग्रामीण जीवन खूप पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी कमी पैशात तुम्ही अत्यंत शांतता शोधू शकतात. कंबोडियाला जाण्यासाठी पंचवीस ते तीस हजार रुपये फ्लाईटच्या भाड्यासाठी खर्च करावे लागतात व या ठिकाणी राहणे, खाणे आणि प्रवासाचा खर्च दिवसाला तीन ते पाच हजार रुपये इतका येतो.
3- श्रीलंका– तुम्हाला समुद्र आणि समुद्रकिनारा आवडत असेल तर तुम्ही कमी पैशांमध्ये श्रीलंका जाऊन तुमची आवड पूर्ण करू शकता. श्रीलंकेतील समुद्रकिनारे खूप सुंदर आहेत व या ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तू तसेच हिल स्टेशन आणि महत्वाचे म्हणजे उत्कृष्ट असे सी फूड पिकनिक अधिक स्मरणात राहील असे बनवतात.
श्रीलंका जाण्याकरिता आणि प्रवास करण्यासाठी तुम्हाला फ्लाईट तिकीटा करिता दहा ते अठरा हजारापर्यंत कर्ज येऊ शकतो. श्रीलंकेमध्ये राहण्याचा व प्रवास करण्यासाठी तुम्हाला एका दिवसाला दीड ते दोन हजार रुपये खर्च येईल.
4- सिंगापूर– सिंगापूर हे प्रामुख्याने त्या ठिकाणाची कला तसेच स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि संस्कृतीसाठी प्रामुख्याने ओळखले जाते. आशिया खंडातील कमी बजेटमध्ये फिरता येईल असा हा एक देश असून त्यासोबत कमी खर्चात तुम्ही स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घेऊ शकतात.
सिंगापूरला लाईन सिटी असे म्हणून देखील ओळखले जाते व या ठिकाणची ऐतिहासिक स्थळे तुम्हाला पाहायला मिळतात व सुंदर बेटे देखील आहेत. सिंगापूरला जाण्याकरिता 17 ते 22 हजारापर्यंत खर्च करावा लागतो. ठिकाणी राहण्याचा व फिरण्याचा दररोज तुम्हाला 6000 ते 7000 पर्यंत खर्च येऊ शकतो.
5- व्हिएतनाम– आशिया खंडातील हा एक देश असून या ठिकाणी सर्वात मोठी गुहा आहे व व्हिएतनाम या ठिकाणी तुम्ही बेटे तसेच जंगले व धार्मिक स्थळे आणि सुंदर अशी दृश्य पाहू शकतात. या ठिकाणी असलेला संगमरवरी पर्वत विशेष आकर्षण ठरतो. या देशातील स्ट्रीट फूड देखील खूप स्वादिष्ट असतात. या स्ट्रीट फूड मध्ये राईस नूडल्स आणि भातापासून बनवलेले वेगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात.
या ठिकाणी गेल्यावर तरंगता बाजार पाहण्यात वेगळीच मजा येते. या देशाला जाण्यासाठी तुम्हाला विमानाचे भाडे म्हणून पंचवीस ते तीस हजारापर्यंत खर्च येईल. तसेच राहण्याचा व खाण्याचा तसेच प्रवास करण्यासाठी दररोज अडीच ते तीन हजार रुपये खर्च करावा लागेल.