भारतीय प्रशासन सेवेतील सर्वोच्च पदे पाहिली तर ती आयपीएस आणि आयएएस ही आहेत. हे दोन्हीही पदे प्रामुख्याने यूपीएससीच्या माध्यमातून भरले जातात. यातील आयएएस हे पद म्हणजेच इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस प्रशासकीय कामकाजाशी निगडित असून यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्हाधिकारी या पदाचा समावेश करतो आणि इंडियन पोलीस सर्विस अर्थात आयपीएस हे पद प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्थेची संबंधित असून यामध्ये पोलीस खात्यातील सर्वोच्च पदांचा समावेश होतो.
या दोन्ही प्रकारच्या पदांची भरती ही यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होते व अनेक विद्यार्थी याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास करतात. या दोन्ही पदांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सेवा सुविधा देखील पुरवल्या जातात आणि त्यांचा पगार देखील तेवढाच भरभक्कम असतो.त्यामुळे या लेखात आपण एका आयपीएस अधिकाऱ्याला कुठल्या सुविधा मिळतात व त्याला किती पगार मिळतो यासंबंधीचे महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
अधिकाऱ्याला किती मिळतो पगार व काय काय मिळतात सुविधा?
आयपीएस अधिकाऱ्याचा दर्जा हा खूप महत्त्वाचा असतो व तो जिल्ह्यातील सर्वात मोठा पोलीस अधिकारी किंवा एसपी असतो. जर आपण एका आयपीएस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचा विचार केला तर दिलेल्या सेवा क्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आयपीएस अधिकार्याकडे असते.
या अधिकाऱ्यांना डेप्युटी एसपी ते एसपी, आईजी तसेच डीआयजी व डीजेपी या पदांवर प्रमोशन मिळते. आयपीएस अधिकाऱ्यांना घर आणि गाडीची सुविधा दिली जाते. मात्र पद कोणत्या प्रकाराचे आहे या आधारावर गाडी आणि घराचा आकार अवलंबून असतो. तसेच वाहन चालक, गृहरक्षक आणि सुरक्षारक्षक ही आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांना मिळालेल्या पदानुसार दिले जातात. तसेच पदानुसारच त्यांना वैद्यकीय उपचार फोन व विज बिलाकरिता देखील भत्ता दिला जातो.
जर आपण आयपीएस अधिकाऱ्याच्या पगाराचा विचार केला तर त्याला सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो. साधारणपणे आयपीएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये पगार मिळतो व महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील आयपीएस अधिकाऱ्यांना मिळतात. जर प्रमोशनने एखादा आयपीएस अधिकारी डीजीपी पदावर पोहोचला तर त्याला सर्वाधिक पगार मिळतो. डीजीपी झाल्यानंतर एका आयपीएस अधिकाऱ्याला प्रतिमाह दोन लाख 25 हजार रुपये इतके वेतन मिळते.
त्याचे म्हणजे आयपीएस अधिकाऱ्याला शैक्षणिक रजा घेऊन देश आणि विदेशातील नामांकित अशा विद्यापीठांमध्ये शिक्षण देखील घेता येते. तसेच या अधिकाऱ्यांना तीस दिवसांची ईएल आणि सोळा दिवसांचे सीएल देखील मिळते. तसेच आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या मुलांना शिकवण्याकरिता वार्षिक शैक्षणिक पत्ता देखील दिला जातो व मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये ते स्वतःसाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी मोफत उपचार देखील घेऊ शकतात. तसेच वर्षातून एकदा त्यांना प्रवासाची सवलत देखील मिळते व ते देशामध्ये कुठेही कौटुंबिक सहली करीता देखील जाऊ शकतात.