Share Market Price:- काल म्हणजेच मंगळवारी 7 जानेवारी 2025 रोजीची शेअर बाजाराची स्थिती बघितली तर ती काहीशी सकारात्मक असल्याची दिसून आली. बाजारात सध्या सकारात्मक असे तेजीचे संकेत पाहायला मिळत आहेत. आपल्याला माहित आहे की शेअर बाजारावर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव पडत असतो व त्यानुसार शेअर मार्केटमध्ये तेजी किंवा मंदी पाहायला मिळते.
सदर आपण बघितले तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अगदी ग्रामीण भागात देखील आता अनेक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे येताना दिसून येत आहेत. परंतु शेअर मार्केट मधील गुंतवणूक ही जरा जोखमीची असल्याने गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊनच यामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते.
या अनुषंगाने जर आपण बघितले तर देशातील टॉप ब्रोकरेज कंपन्यांच्या माध्यमातून तिमाही अपडेट नंतर काही शेअर्सवर नोट देखील जारी करण्यात आल्या असून यामध्ये काही शेअर्सच्या टारगेट प्राईज प्रसिद्ध असलेल्या ब्रोकरेज फर्मच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत व त्या बद्दलची माहिती आपण बघू.
प्रसिद्ध असलेल्या ब्रोकरेज फर्मेने जाहीर केलेल्या शेअर्सच्या टार्गेट प्राईज
1- गोदरेज कंजूमर शेअर प्राईस- गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मचा रिपोर्ट बघितला तर त्यांच्यानुसार गोदरेज कंजूमर शेअर्स करिता १३७० रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे.
या फर्मच्या मते हा शेअर सध्याच्या त्याच्या पातळीपासून 22 टक्के परतावा देऊ शकतो. गोदरेज कंजूमर कंपनीचे असलेली मजबूत मागणी आणि भविष्यातील वाढीची शक्यता सकारात्मक संकेत देत असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
2- L&T फायनान्स शेअर प्राईस-
प्रसिद्ध असलेल्या युबीएस ब्रोकरेज फर्मचा रिपोर्ट बघितला तर त्यानुसार एल अँड टी फायनान्स शेअर्ससाठी 240 रुपये टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे. या ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर सध्याच्या पातळीपासून 64 टक्क्यांचा परतावा देऊ शकतो.3- रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर- सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार बघितले तर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स करिता 1650 रुपये टारगेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे. या ब्रोकरेज फर्मच्या मते हा सध्याच्या पातळीपासून 32 टक्यांचा परतावा देऊ शकतो.
4- एचडीएफसी बँक शेअर प्राईस- प्रसिद्ध असलेल्या जेफरीज ब्रोकरेज फर्मचा रिपोर्ट बघितला तर त्यानुसार एचडीएफसी बँक शेअर्स करिता 2120 रुपये टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आली आहे. या ब्रोकरेज फर्मच्या मते एचडीएफसी बँक शेअर सध्याच्या पातळीपासून 21 टक्क्यांचा परतावा देऊ शकतो.
( टीप- शेअर बाजार अथवा कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करताना गुंतवणूक तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)