Zerodha Success Story : शासकीय धोरणे, मेक इन इंडिया आदी शासनाच्या धोरणांमुळे नवनवीन बिझनेस स्टार्ट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेक तरुण सध्या विविध स्टार्टपकडे वळला आहे. कोणताही स्टार्टअप जिद्द, चिकाटी व योग्य प्लॅनिंग असेल तर खूप सक्सेस होतो.
अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी सुरवात केली, अनेकांनी त्यांना वेड्यातही काढले. परंतु त्यांनी आपला स्टार्टअप जिद्दीच्या जोरावर हजारो कोटींचा बनवला आहे. आज आपण याठिकाणी
नितीन आणि निखिल कामथ या बंधूंची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत. या दोघांनी अगदी छोटा स्टार्टअप सुरूकेला. पाहता पाहता अवघ्या १३ वर्षात त्यांचा हा स्टार्टअप सर्वात मोठे डिस्काउंट ब्रोकर प्लॅटफॉर्म Zerodha हा ब्रँड बनला.
आज ही कंपनी ३० हजार कोटींची आहे. चला जाणून घेऊयात Zerodha ची सुरवात कशी झाली याविषयी –
जर तुम्हाला बिझनेसचे फ्युचर माहित असेल तर नक्कीच तुमचा व्यवसाय सक्सेस होतो. Zerodha ची सुरवात ज्यावेळी झाली त्यावेळी या दोघांनाही स्टॉक मार्केट मध्ये असणाऱ्या भविष्याची कल्पना आली होती.
त्यांच्या लक्षात आले होते की येत्या काळात देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढेल आणि डिस्काउंट ब्रोकर्सना मोठी मागणी वाढेल. हेच हेरून त्यांनी Zerodha ची स्थापना केली. विशेष म्हणजे कामथ ब्रदर्स यांना स्टॉक आणि फायनान्स क्षेत्रातील कोणताही अनुभव नव्हता.
तरीही त्यांनी धाडस करत ही कंपनी सुरु केली. आह ही देशातील टॉपची स्टॉक ब्रोकिंग कंपनी बनली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भावांनी यासाठी कसलीही फंडिंग गोळा केलेलं नव्हते. दोघांनी स्वतःच्या हिमतीवर ही कंपनी नावारूपाला आणली.
Zerodha ची आयडिया नेमकी कशी सुचली?
स्टॉक ब्रोकिंगच्या व्यवसायात येण्यापूर्वी नितीन कामथ यांनी स्वतः या मार्केटचा अभ्यास केला. त्यानंतर त्यात उतरले. परंतु शेअरमार्केट मध्ये कधी काय होईल हे सांगता येणे कठीण आहे. त्याचा फटका नितीन यांनाही बसला.
त्यांनी सुरवातीला कमी किमतीच्या शेअर्समध्ये भरपूर गुंतवणूक केली परंतु 2001-2002 मध्ये शेअर बाजारात आलेल्या मंदीमुळे त्यांना मोठे नुकसान झाले. परंतु त्यांनी कॉल सेंटरमध्ये नाईटशिफ्टचे काम सुरु ठेवले व आपल्या व्यवसायाचा प्रवास अबाधित ठेवला.
त्यांनी आपल्या कंपनीची स्थापना करण्याआधी एका ब्रोकिंग फर्म मध्ये काम केलं आहे. त्यांचे बंधू निखिल यांनी 10वी नंतर शाळा सोडली होती. पण व्यवसाय करण्यासाठी त्याने शेअर ट्रेडिंगचा अभ्यास केला. त्यानंतर जाऊन हे सक्सेस मिळाले.
किती आहे कमाई
आज या प्लॅटफॉर्मद्वारे त्यांनी भरपूर कमाई केली आहे. नितीन आणि निखिल कामथ यांना 2022-2023 या आर्थिक वर्षात 195.4 कोटी रुपये वेतनस्वरूपात मिळालेलं होते. म्हणजेच डेली 53 लाख रुपये. आज या कंपनीचं मूल्य सुमारे 30,000 कोटी रुपये आहे.