ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ रविवारी संगमनेर मध्ये ! स्थानिक खेळाडूंबरोबर प्रदर्शनीय सामना खेळणार

Published on -

क्रिकेट हा भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ असून महिला क्रिकेटची लोकप्रियता ही वाढली आहे. ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी संगमनेर मध्ये येणार असून त्या स्थानिक महिला खेळाडूंबरोबर प्रदर्शनीय सामना खेळणार आहेत याचबरोबर स्थानिक महिलांना प्रशिक्षणही देणार असल्याची माहिती आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर व जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार महर्षी चषक 2025 निमित्ताने ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ संगमनेर मध्ये येणार आहे.

नुकतीच महिलांची आयपीएल स्पर्धा संपन्न झाली असून ऑस्ट्रेलियाच्या सर्व महिला खेळाडू संगमनेर मध्ये येणार आहेत यामध्ये ऑस्ट्रेलियन महिला कर्णधार आलीस हिली, फोबी लिचफिल्ड, बेथ मूनी, अ‍ॅशले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अ‍ॅनाबेल सदरलँड यांचा समावेश आहे

सहकार महर्षी चषक मागील 25 वर्षापासून या क्रीडा संकुलात होत असून यामध्ये आयपीएल सह आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. तर मागील तीन वर्षापासून एकविरा फाउंडेशन च्या वतीने महिलांच्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न झाल्या आहेत.

रविवारी या सर्व महिला खेळाडू ऑस्ट्रेलियन किट मध्ये स्थानिक महिला खेळाडूंबरोबर प्रदर्शनीय सामना खेळणार आहेत . याचबरोबर स्थानिक महिलांना प्रशिक्षणही देणार आहे.

हा सामना केवळ खेळापुरता मर्यादित न राहता स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संघांसोबत खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी आयोजित केला आहे. यावेळी प्रदर्शनीय सामन्यानंतर सायंकाळी 5 वा. लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आ डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे , डॉ. जयश्रीताई थोरात व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा सन्मान सत्कार संगमनेरकरांच्या वतीने करण्यात येणार आहे.

तरी हा ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंचा सामना पाहण्याकरता संगमनेर मधील सर्व महिला व युवक क्रीडाप्रेमींनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे उपस्थित रहावे असे आवाहन क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर जय हिंद लोक चळवळ यांच्या वतीने करण्यात आले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe