क्रीडा

IND vs SL 3rd ODI Live Streaming: अरे वाह! फ्रीमध्ये पाहता येणार भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना ; फक्त करा ‘हे’ काम

IND vs SL 3rd ODI Live Streaming: उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच रविवारी ( 15 जानेवारी 2023) रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना होणार आहे.

भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 01.30 वाजता सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला हा समान आता फ्रीमध्ये बघण्याची संधी प्राप्त झाली आहे. तुम्ही या संधीचा फायदा घेत हा संपूर्ण सामना फ्रीमध्ये पाहू शकतात. हे लक्षात घ्या कि भारताने मालिका 2-0 ने जिंकली असून आता भारताचा श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याचे लक्ष्य आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही हा सामना फ्रीमध्ये कसा पाहू शकतात.

भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा वनडे कधी खेळला जाईल?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना रविवार, 15 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.

IND vs SL मधील तिसरा ODI कधी सुरू होईल?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना IST दुपारी 01.30 वाजता सुरू होईल.

IND विरुद्ध SL मधील तिसरा एकदिवसीय सामना कोठे खेळला जाईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

IND vs SL मधील तिसरा एकदिवसीय सामना मी कुठे पाहू शकतो?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका दूरदर्शन स्पोर्ट्स चॅनलवरील डीडी फ्री डिशवर विनामूल्य प्रसारित केली जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. क्रिकेट चाहते Disney+ Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.

भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 4  गडी राखून विजय मिळवला. भारतासाठी पहिल्या सामन्यात कोहलीने शतक झळकावले. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात उमरान आणि कुलदीप यादव यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि श्रीलंका यांच्यात 164 सामने खेळले गेले आहेत. भारताने 95 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत आहे. तर 11 सामन्यांचा निकाल लागला नाही.

हे पण वाचा :- HDFC Bank: ‘त्या’ प्रकरणात एचडीएफसी ठरला किंग ! झाला ‘इतका’ मोठा फायदा ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Ahmednagarlive24 Office

Recent Posts