क्रीडा

आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर ! विश्वचषक खेळलेल्या केवळ तीन खेळाडूंचा समावेश…तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार

India Squad For South Africa Tour : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर टीम इंडियाला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. ज्यासाठी टीम इंडियाची आज औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.

टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या तीन फॉरमॅटच्या मालिकेसाठी तीन वेगवेगळ्या भारतीय खेळाडूंना कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात विश्वचषक खेळलेल्या केवळ तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. टी-20ची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे, तर केएल राहुल एकदिवसीय मालिकेची कमान सांभाळणार आहे. कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली नाहीत !
दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बोर्डाला विनंती केली की ते टी-२० आणि वनडेमध्ये खेळणार नाहीत. तर मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून आहे.

शुभमन गिलला संधी नाही !
संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. रजत पाटीदार, साई सुदर्शन या नव्या चेहऱ्यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांना ही मोठी संधी मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे शुभमन गिलला वनडे संघात संधी मिळालेली नाही. सूर्या वनडे संघातूनही गायब आहे.

बुमराह आता उपकर्णधार
आता कसोटी संघात केएल राहुल आणि इशान किशन हे यष्टीरक्षक आहेत. जसप्रीत बुमराह आता कसोटी संघाचा उपकर्णधार असेल.

ऋतुराज गायकवाडचा तिन्ही फॉरमॅटमध्ये समावेश
टी-२० च्या कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादववर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. उपकर्णधार रवींद्र जडेजा असेल. म्हणजेच रवींद्र जडेजावर पहिल्यांदाच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाडचा तिन्ही फॉरमॅटमध्ये समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक

टी २० मॅचेस

१० डिसेंबर – डर्बन
१२ डिसेंबर – पोर्ट एलिझाबेथ
१४ डिसेंबर – जोहान्सबर्ग

वनडे मॅचेस

१७ डिसेंबर – जोहान्सबर्ग
१९ डिसेंबर – पोर्ट एलिझाबेथ
२१ डिसेंबर – पारल

कसोटी
२६ ते ३० डिसेंबर -सेंच्युरियन
३ ते ७ जानेवारी – जोहान्सबर्ग

टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर

वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ
रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, अविनाश कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर

कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार. शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts