क्रीडा

IPL 2023 : चेन्नईवर मोठे संकट! ‘या’ दिग्गज खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

IPL 2023 : आज IPL 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडणार आहे. परंतु चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कारण संघाचा स्टार खेळाडू अंबाती रायडूने निवृत्ती जाहीर केली आहे.

याबाबत रायडूने ट्विटद्वारे ही माहिती दिली असून त्याने पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘मुंबई आणि सीएसके या दोन महान संघांसाठी खेळलो आहे. 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आज रात्री सहावा सामना जिंकण्याची आशा आहे.

रायुडू ‘यू-टर्न’ घेणार ?

याबाबत रायडूने पुढे लिहिले की, ‘हा एक लांबचा प्रवास असून मी ठरवले आहे की आज रात्रीचा अंतिम सामना हा माझा आयपीएलमधील शेवटचा सामना असणार आहे. मला ही महान स्पर्धा खेळताना खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार. रायुडू या निर्णयावरून ‘यू-टर्न’ घेणार नाही.’

खेळले इतके सामने

अंबाती रायडूने आजच्या अंतिम सामन्यापर्यंत 203 आयपीएल सामन्यांमध्ये भाग घेतला असून यादरम्यान या खेळाडूने २८.२९ च्या सरासरीने ४३२० धावा केल्या आहेत. यात त्याने 22 अर्धशतक आणि 1 शतक झळकावले आहे.

तसेच आयपीएल 2023 चा हंगाम रायुडसाठी काही खास ठरला नसला तरी तो 15 सामन्यांत 15.44 च्या सरासरीने फक्त 139 धावा करू शकला. आयपीएल 2023 मध्ये, अंबाती रायडूचा वापर बहुतेक सामन्यांमध्ये प्रभावशाली खेळाडू म्हणून करण्यात आला होता.

पाच वेळा पटकावले विजेतेपद

अंबाती रायुडू हा 5 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचा भाग असून त्याने 2013, 2015 आणि 2017 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी विजेतेपद पटकावले होते. संघाकडून 2018 आणि 2021 च्या आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावले होते, या संघाचा तो एक भाग होता.

मागील वर्षी बदलला निर्णय

मागील वर्षी आयपीएलच्या मध्यावर एका ट्विटमध्ये अचानक निवृत्ती जाहीर करण्यात आली होती. परंतु त्यानंतर लगेचच त्यांनी त्यांचे ट्विटही डिलीट केले होते. त्यावेळी रायुडू म्हणाला होता की २०२२ चा हा सीझन त्याचा शेवटचा असणार आहे. परंतु, चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी ही खोटी बातमी असल्याचे सांगून रायुडू निवृत्त होत नसल्याचे स्पष्ट केले होते.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts