IPL 2024 : 2024 इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लवकरच सुरु होणार आहे, यापूर्वीच आता दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. संघातील स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ आयपीएल 2024 च्या पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर राहू शकतो. शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून जात आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वन-डे कपमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्याला ही दुखापत झाली होती.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. तो गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे की नाही हे पुढील तीन आठवड्यांत बीसीसीआय पाहणार आहे. या सलामीच्या फलंदाजाला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी काही सराव सामने खेळावे लागतील.
मिळालेल्या माहितीनुसार शॉ नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये त्याच्या फलंदाजीचा आणि क्षेत्ररक्षणाचा चांगला सराव करत आहे. त्याच्यावर सध्या येथे उपचार सुरू आहे. पण तो दुखापतीतून कधी बाहेर निघेल यावर पुनरागमन अवलंबून असेल. अशा परिस्थितीत सलामीचा फलंदाज या वर्षाच्या अखेरीस दिल्ली कॅपिटल्समध्ये परतण्याची शक्यता आहे.
आयपीएल मिनी-लिलाव 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जे रिचर्डसन आणि वेस्ट इंडिजच्या शाई होपची निवड करून दिल्ली कॅपिटल्सने यावेळी त्यांच्या संघात रोमांचक बदल केले आहेत. संघाने हार्ड हिटिंग हॅरी ब्रूकला 4 कोटी रुपयांना, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रिचर्डसनला 5 कोटी रुपयांना आणि वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक-फलंदाज शाई होपला 75 लाख रुपयांना खरेदी केले. दिल्लीने अनकॅप्ड भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्राला 7.2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा पूर्ण संघ :
ऋषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, पृथ्वी शॉ, खलील अहमद, ललित यादव, प्रवीण दुबे, मुकेश कुमार, यश ढुल, विक्की ओस्टवाल, अभिषेक पोरेल, रिकी भुई, कुमार कुशाग्र, रसिख डार, सुमित कुमार आणि स्वास्तिक चिकारा.