क्रीडा

कर्णधारपदाचा राजीनामा नंतर विराट कोहली निवृत्ती घेणार?

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  भारताचा स्टार खेळाडू तसेच माजी कर्णधार विराट कोहलीने १५ जानेवारीला कसोटी कर्णधारपद सोडले. या पदावरून तो पायउतार होत असल्याचे त्याने ट्विटकरून जाहीर केले.

अनेकांनी विराटच्या निर्णयाचे स्वागत केले असून अनेकांनी त्याचा हा निर्णय धक्कादायक होता असे म्हटले आहे. दरम्यान, विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर तो लवकरच निवृत्ती घेण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.

विराटच्या आधी कर्णधार असलेले एम. एस. धोनी आणि सौरभ गांगुली यांनी कर्णधारपद सोडल्यानंतर केवळ तीन वर्षांतच निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला होता.

धोनीने वयाच्या ३३ व्या वर्षी कर्णधारपद सोडले आणि विराट कोहलीनेही कर्णधारपद सोडले तेव्हा त्याचे वय अवघे ३३ वर्षे आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा सौरव गांगुलीने २००५ मध्ये कर्णधारपद सोडले तेव्हा त्याचे वयही ३३ वर्षे होते.

दरम्यान कर्णधारपद सोडल्यानंतर खेळाडूंना जास्त काळ संघाचा भाग राहता आलेले नाही, असे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात डोकावल्यास आपल्याला समजेल.

कर्णधार पद सोडण्याची हि आहेत कारणे मागच्या वर्षी विश्वचषक स्पर्धेनंतर कोहलीने टी २० संघाचे कर्णधारपद सोडले. तर द. आफ्रिकेच्या दौ-याआधी बीसीसीआयच्या निवड समितीने वनडे संघाच्या कर्णधारपदावरून त्याची उचलबांगडी केली.

द. आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहलीने कसोटीच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. कोहलीच्या कर्णधारपदाच्या सुवर्ण कारकिर्दीचा शेवट चांगला झाला नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

द. आफ्रिका संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची संधी त्याच्याकडे होती. पण यात विराट अपयशी ठरला आणि भारताला २-१ ने मालिका गमवावी लागली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts