WPL 2024 : नुकतेच महिला प्रीमियर लीगचे दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, महिला प्रीमियर लीग २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, यावेळी ही स्पर्धा दोन शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे, अंतिम फेरीसह एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. WPL 2024 चा पहिला सामना उद्घाटन (पहिली महिला आयपीएल) हंगामातील विजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात खेळला जाईल.
मागील हंगाम संपूर्णपणे मुंबईतील वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता परंतु यावेळी ही स्पर्धा दोन शहरांमध्ये होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील 11 सामने बेंगळुरूमध्ये आणि उर्वरित सामने दिल्लीत होणार आहेत. अशा प्रकारे खेळाडूंना एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळण्याची संधी मिळेल.
बेंगळुरू लीग ४ मार्चपर्यंत चालेल आणि त्यानंतर उर्वरित सामने ५ मार्चपासून दिल्लीत होतील. 24 दिवसांच्या दुसऱ्या सत्रात दुहेरी हेडर नाही तर सर्व सामने संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील.
या मोसमाचा फॉरमॅटही मागील वेळेप्रमाणेच असेल, ज्यामध्ये लीग टप्प्यातील अव्वल तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. गुणतालिकेत अव्वल असणारा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणारे संघ १५ मार्चला एलिमिनेटर खेळतील. त्यानंतर १७ मार्चला अंतिम सामना होणार आहे.
WPL 2024 चे संपूर्ण वेळापत्रक :-
-23 फेब्रुवारी- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बेंगळुरू
-24 फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध यूपी वॉरियर्स, बेंगळुरू
-25 फेब्रुवारी- गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, बेंगळुरू
-26 फेब्रुवारी – यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बेंगळुरू
-27 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात जायंट्स, बेंगळुरू
-29 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बेंगळुरू
-1 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, बेंगळुरू
-2 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, बेंगळुरू
-3 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, बेंगळुरू
-4 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, बेंगळुरू
-5 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली
-6 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली
-7 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली
-9 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, दिल्ली
-10 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, दिल्ली
-10 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली
-11 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, दिल्ली
-12 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली
-13 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, दिल्ली
-15 मार्च – एलिमिनेटर, दिल्ली
-17 मार्च – अंतिम, दिल्ली