मी कधीच कोणासमोर लोटांगण घातलं नाही; भुमरेंचं राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोर आमदारांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. बंडखोरांनी राऊतांवर केलेल्या टीका आणि आरोपांना संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेत उत्तरे दिली. ‘संदीपान भुमरे हे मंत्री झाले तेव्हा सामना कार्यलयामध्ये आले आणि माझ्यासमोर लोटांगण घातलं’, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या वक्तव्यावर संदीपान भुमरे यांनी आता भाष्य केले आहे. मी … Read more

राऊतांमुळे एकच नगरसेवक राहिलाय, त्यालाच आता महापौर करणारl; मनसेने उडवली सेनेची खिल्ली

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे महापिलाकेमध्ये मोठं खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अनेक ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेनेमध्ये फक्त एक नगरसेवक राहिला आहे. यावरुन मनसेचे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ‘चमत्कार बाबा’ संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला … Read more

‘मातोश्री’वरुन बोलवणे आले तर जाऊ पण…; बंडखोर आमदाराची अट

शिर्डी  :  शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरीनंतर आता ‘मातोश्री’वर जाण्याबाबत मौन सोडले आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी ‘मातोश्री’वरुन फोन आला तर जाऊ, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी देखील असे वक्तव्य केले आहे. आमची तर इच्छा आहे आम्हाला उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हाला ‘मातोश्री’वर बोलवावे, असे सुहास कांदे … Read more

भावना गवळींऐवजी राजन विचारेंना प्रतोद केल्याचे संजय राऊतांनी सांगितले कारण

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी शिवसेनेच्या भावना गवळी यांच्या जागी लोकसभेतील मुख्य प्रतोद पदी राजन विचारे यांची नियुक्ती करण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. याचे कारण आता संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. व्हीप बदलणे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेत मुख्य प्रतोद … Read more

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मुर्मूंना पाठिंबा द्यावा; सेना खासदाराची मागणी

मुंबई : देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक येत्या १८ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीएने आदिवासी नेतृत्व म्हणून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू यांना एनडीएचे मित्रपक्ष असलेल्या पक्षांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाने देखील दौपदी मुर्मू यांनाच आपला पाठिंबा जाहिर केला आहे. आता शिवसेनेच्या एका खासदाराने द्रौपदी … Read more

“संदीपान भुमरे मंत्री झाले तेव्हा त्यांनी माझ्या पायात लोटांगण घातलं, हवं तर व्हीडिओ दाखवतो”

मुंबई : शिवसेनेत मोठी पडल्यापासून शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप टीका करत आहेत. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या २ दिवसांपासून शिवसेनेतील शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी संजय राऊतांमुळेच आम्ही शिवसेना सोडल्याचे सांगितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत आज सकाळी पत्रकार परिषद घेत मौन सोडले आहे. तसेच सर्व आरोपांना आणि टीकांना आज संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. … Read more

“अडीच वर्षात जे डॉक्टर करू शकले नाहीत ते १५ दिवसात शिंदेंनी करून दाखवलं”

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीका टिपण्णी करताना दिसत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. अडीच वर्षात जे डॉक्टर करू शकले नाहीत ते १५ दिवसात एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं. साहेबांना ठणठणीत बरे केले. आता ते  रोज … Read more

…म्हणून शिवसेनेने भावना गवळी यांची प्रतोद पदावरुन केली उचलबांगडी

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राज्याच्या विधीमंडळाला देखील मोठा धोका बसला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी केली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका उचलून धरली होती. त्यानंतर … Read more

संजय राऊतांमुळे शिवसेना फुटली; शंभूराजे देसाईंचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांमुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. संजय राऊतांमुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार सेनेतून बाहेर पडले. त्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, असे म्हणत शंभूराजे देसाईंनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांमुळेच शिवसेना … Read more

शरद पवारांशी कोणतीही भेट झाली नाही; एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो जुना असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. माझी आणि शरद पवारांची नुकतीच कोणतीही भेट झालेली नाही. प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेला फोटो जुन्या भेटीचे आहेत, असेही स्पष्टीकरण … Read more

शिंदेंची हौस तात्पुरती भागली; शिवसेनेचा खोचक टोला

मुंबई : अनेक नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडी सरकार पाडून  शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. त्यावरु शिवसेनेमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये नव्या सरकारवर टीका केली आहे.   भाजपाचा कुटिल डाव आहे. ज्यांना मुख्यमंत्रिपद हवं होतं, त्या एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागवली आहे. हे … Read more

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला; मुखमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभागृहातील भाषणावरुन टीका केली. खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेवर नाराज असलेल्या आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला होता. अनेक बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबाबत अनेक तक्रारी देखील केल्या. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात भाजपसोबत युती करत शिंदे सरकार स्थापन झाले. राज्यात विशेष अधिवेशन सुरु असताना सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी … Read more

तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खदखद

मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून गप्प असलेले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन सुरु होताच शिवसेनेतील नेत्यांबाबतची खदखद व्यक्त केली. मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना सभागृह चांगलेच गाजवले. आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही. तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं, आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी … Read more

आज फडणवीसांनी त्यांचा माईक हिसकावला उद्या….; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई : सोमवारी एका पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरुन माईक घेऊन स्वत: उत्तर दिले होते. शिवसेनेमधील नाराजी चव्हाट्यावर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या बैठकींचा सपाटा लावण्यात आला आहे. आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी केलेल्या कृत्यावरुन टीका केल्याचे पहायला … Read more

छत्रपती शिवरायांच्या ‘गनिमी काव्या’ने नवं सरकार; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

नागपूर : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आता शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार संभाळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या गनिमी काव्याप्रमाणे निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आले. सरकार बनवीन, पण सरकारमध्ये जाणार नाही, अशी घोषणा मी केली होती. घोषणा करुन मी घरी … Read more

ज्यांची नावं घेताय त्यांच्यामुळेच कालपर्यंत सत्तेत होता; संजय राऊतांचं गुलाबरावांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली, असे म्हणणाऱ्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांना शिवसेनेच्या संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद सुरु होता. शिवसेनेतील बंडखोर आमदारामुळे नवे सरकारदेखील स्थापन झाले. मात्र अद्यापही शिवसेनेतील वाद संपताना दिसत नाही. बंडखोरांनी ज्या चार लोकांची नावं घेतली त्या चार … Read more

आम्ही निवडून येण्याची चिंता अजितदादांनी करु नये; गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला

मुंबई : राज्यातील विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये पहिल्या दिवशी सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पहायला मिळाली. आजच्या दुसऱ्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधपक्ष नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायाला मिळत आहे. सभागृहामध्ये शिंदे गटातील शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘जे शिवेसना सोडून गेलेत त्यांना कोणी पुन्हा … Read more