“संदीपान भुमरे मंत्री झाले तेव्हा त्यांनी माझ्या पायात लोटांगण घातलं, हवं तर व्हीडिओ दाखवतो”

मुंबई : शिवसेनेत मोठी पडल्यापासून शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप टीका करत आहेत. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या २ दिवसांपासून शिवसेनेतील शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी संजय राऊतांमुळेच आम्ही शिवसेना सोडल्याचे सांगितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत आज सकाळी पत्रकार परिषद घेत मौन सोडले आहे. तसेच सर्व आरोपांना आणि टीकांना आज संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.  

संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले, तेव्हा सामना कार्यालयात येऊन प्रेमाने त्यांनी माझ्यासमोर लोटांगण घातले. साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो असे म्हणाले. हवं तर त्याचं व्हिडीओ फुटेज काढायला लावतो. सगळं आहे, असे म्हणत संजय राऊतांनी संदीपान भुमरेंच्या आरोप, टीकांना उत्तर दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

संजय राठोड यांच्यावरच्या संकटात उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. जे बोलत आहेत, त्यांना बोलू द्यात. आमचे मन साफ आहे. कुणावरही भन्नाट आरोप करायचे की शरद पवारांमुळे शिवसेना संपत आहे. अर्धे लोक पवारांच्याच पक्षातून आमच्याकडे आलेत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.