मी कधीच कोणासमोर लोटांगण घातलं नाही; भुमरेंचं राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोर आमदारांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. बंडखोरांनी राऊतांवर केलेल्या टीका आणि आरोपांना संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेत उत्तरे दिली. ‘संदीपान भुमरे हे मंत्री झाले तेव्हा सामना कार्यलयामध्ये आले आणि माझ्यासमोर लोटांगण घातलं’, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या वक्तव्यावर संदीपान भुमरे यांनी आता भाष्य केले आहे.

मी कधीही कोणासमोर लोटांगण घातलेलं नाही. निवडणूक जिंकून आलो. मंत्री झालो तेव्हा मी राऊतांना भेटायला गेलो होतो, तिथे जाऊन फक्त आभार मानले. पण मी लोटांगण वगैरे घालणार नाही. मी एक कार्यकर्ता आहे. ३५ वर्षे शिवसेनेसाठी काम केले आहे. त्याची पावती मिळाली असावी कदाचित. त्यांच्या बोलण्याकजे एवढं लक्ष देऊ नका. लोकांनाही राऊतांच्या बोलण्याचा कंटाळा आलाय, असे संदीपान भुमरे म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, आमच्यावर आगपाखड करणाऱ्या संजय राऊतांनी खासदाराकीचा राजीनामा द्यावा आणि जनतेतून निवडणून दाखवावं, असं थेट आव्हानच आता संदीपान भुमरे यांनी संजय राऊतांना दिले आहे.