लसीचा तुटवडा…तुम्हीच सांगा कसे रोखायचे कोरोनाला

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाच्या लढ्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे होऊन बसले आहे. यासाठी लसीकरण मोहीम वेगाने व प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ शकतो. मात्र एकीकडे हे सगळं असताना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकणार कसे ? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. करोनाला … Read more

सीरम इन्स्टिट्यूट आक्रमक,म्हणाले केंद्र सरकारच जबाबदार…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा पुरवठा नसल्यामुळं राज्यातील लसीकरण लांबणीवर पडलंय. अशात लसीच्या तुटवड्याला एक प्रकारे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटने म्हटलंय. दरम्यान केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबाबत काहीही माहिती न घेता … Read more

जिल्ह्यात किती लाख लोकांनी घेतली कोरोनाची लस ? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशाला झोडपून काढलंय आणि अशात लशींच्या कमतरतेमुळे संकट जास्त गडद झालं आहे. जिल्ह्यात 13 जानेवारीपासून करोना लसीकरणाला सुरूवात झालेली आहे. जिल्ह्यात गेल्या साडेचार महिन्यांत 6 लाख 15 व्यक्तींनी करोनाची लस घेतली असून यात 4 लाख 81 हजार व्यक्तींनी पहिला तर 1 लाख 33 … Read more

कोरोनाचा वाढता धोका पाहता प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करावे

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे दरदिवशी नागरिकांचे बळी जात आहे. याला रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र शहरात लसीकरण वाढविण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावे, अशी मागणी आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आली. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी आयुक्त शंकर गोरे यांची … Read more

कोरोना इन्फेक्शननंतर किती दिवसांनी लस घ्यावी? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-कोरोनाविरूद्ध देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग होऊन तो बरा झाला असेल तर त्याने कोरोना लस किती दिवसांनी घ्यावी? जेव्हा मोठ्या संख्येने लोक कोरोना संसर्गाला बळी पडतात आणि दुसरीकडे, लसीकरण … Read more

५.८६ कोटी लसींचे डोस मोफत !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- देशात गेल्या १ मे पासून देशव्यापी लसीकरण मोहीम राबविली जात असतानाच आगामी १५ जूनपर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना तब्बल ५.८६ कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसींचे डोस मोफत स्वरूपात देणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी केली आहे. भविष्यात लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस खरेदी करण्याची मुभा दिल्याने राज्यांना ४.८७ … Read more

शिक्षकांची फ्रंटलाइन वर्कर म्हणून गणना करा

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  प्रत्येक तालुक्यात ज्या शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. त्या शिक्षकांचे सरसकट करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र एक दिवसाचे लसीकरण सत्र आयोजित करण्याचे आदेश जिल्हास्तरावरून पारीत व्हावेत. या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शिक्षक परिषदेच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन मंगळवारी करण्यात आले. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी नुकतेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सर्वेक्षण घरोघर … Read more

कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची आधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 3779 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –    अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

प्राथमिक शिक्षकांनी एक दिवस केले अन्नत्याग

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्राथमिक शिक्षकांची फ्रंटलाइन वर्कर म्हणून गणना करा व सर्वच शिक्षकांचे लसीकरण करा या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शिक्षक परिषदेच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेपैकी कोणतेही केडर लसीकरणाशिवाय कामकाज करत नाही. प्राथमिक शिक्षकानी नुकतेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सर्वेक्षण घरोघर … Read more

लसीकरणामध्ये डाक कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या! पोस्टल कर्मचारी संघटनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- डाक विभागाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश असून, कोविड काळातही डाक विभागातील सर्व सेवा सुरळीतपणे चालू आहेत. डाक विभागातील कर्मचारी सर्व सेवा पूरवत आहेत परंतु शासनाने फ्रंट लाईन वर्कर मध्ये डाक विभागाचा समावेश न केल्याने कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये  प्राधान्य मिळत नसल्याने लसीकरण करून घेणेसाठी कर्मचाऱ्यांना मोठया त्रासास सामोरे जावे लागत आहे … Read more

नागरिकांच्या लसीकरणाबरोबरच सुरु आहे पशुधनाचे लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर नागरिकांचे लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. यातच नागरिकांचा जीव जसा महत्वाचा आहे, त्याचबरोबर पशु पक्ष्यांचा देखील जीव महत्वाचा आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कोरोना काळातही पशुधनाचे लसीकरण सुरूच आहे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पशुधनासाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या लक्षात … Read more

मतदार यादीनुसार लसीकरण करा – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- राहुरी तालुक्यामध्ये कोविड लसीकरणाबाबत ज्या गावांमध्ये जास्त लोकसंख्या असेल त्या गावाला प्राधान्य देऊन तेथील मतदार यादीनुसार लसीकरण करावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. राहुरी तालुक्यातील मांजरी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या २० गावांच्या दक्षता समितीच्या प्रतिनिधींसमवेत ना. तनपुरे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी … Read more

पुढाऱ्यांचा लसीकरणातील हस्तक्षेप थांबवा तरच सर्वकाही सुरळीत होईल

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने राबविण्यात येत आहे. यातच जिल्ह्यात एक वेगळाच संतापजनक प्रकार सुरु झाला आहे. सध्या काही नेते, कार्यकर्ते मंडळी लसीकरण केंद्रावर येतात. व्हीआयपीच्या नावाखाली आपल्या जवळच्यांना लस देण्यास भाग पाडतात. आरोग्य विभागाने व्हीआयपी लसीकरण पद्धत बंद करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून … Read more

गर्दी टाळण्यासाठी नालेगावात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करावे -नगरसेवक गणेश कवडे

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नालेगाव येथील शिव-पवन मंगल कार्यालयात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी सभागृहनेते तथा नगरसेवक गणेश (उमेश) कवडे यांनी केली आहे. कवडे यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन दिले आहे. शहर व उपनगरमध्ये सध्या महापालिकेच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण केले जात आहे. … Read more

लसीकरणाचा गोंधळ सुरूच; स्थिगिती असतानाही तरुणांचे लसीकरण केले

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवाणसांपासून लसीकरण मोहिमेचा अक्षरश फज्जा उडाला आहे. मनपाकडून यामध्ये सातत्याने गोंधळ निर्माण केला जातो आहे. राजकीय दबावातून गुप्तरित्या काहींचे लसीकरण करण्यात आले असल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे . महापालिकेच्या सावेडी उपनगरातील लसीकरण केंद्रांवर शुक्रवारी १८ ते ४४ वयोगटातील ७० … Read more

राजकीय दबावातून शहरात लसीचा काळाबाजार सुरु? चौकशीसाठी काँग्रेसचे आयुक्तांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-नगर महापालिकेतील सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय दबावातून खासगी जागेत महापालिकेचे बेकायदेशीरपणे लसीकरण सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी महापालिका केंद्रावरील परिचारिकांना एका हॉटेलवर बोलावून लस घेतल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मनपातील सत्ताधारी यांनी मनपा … Read more

‘जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास कोरोनावर मात करणे होईल शक्य’

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास कोरोनावर मात करणे शक्य होईल यासाठी नागरिकांनीही नियमांचे पालन करुन या केंद्रातील सुविधांचा लाभ घेऊन आपले लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले. मनपाच्या आरोग्य केंद्रवर लसीकरणासाठी होत असलेल्या गर्दी कमी करण्याचा दृष्टीने महात्मा फुले आरोग्य केंद्राचे उपकेंद्र म्हणून शहराच्या मध्यवस्तीतील … Read more

राजकीय दबावातून खासगी जागेत महापालिकेचे बेकायदेशीरपणे लसीकरण सुरू ?

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढताच सर्वसामान्यांसह राजकीय मंडळींची लसीकरणाकडे ओढ वाढली आहे. तासंतास रांगा लावूनही सर्वसामान्यांना लस मिळत नाही. मात्र काही राजकीय व्यक्तींकडून लसीकरणाचा काळाबाजार सुरु असल्याची चर्चा सध्या नगरमध्ये रंगत आहे.आता या प्रकरणी काँग्रेसन आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनपाच्या सावेडी लसीकरण केंद्रावर बुधवारी एक गंभीर प्रकरण घडल्याचे समोर आले … Read more