मागासवर्गीय कुटुंबीयांसाठी सार्वजनिक पाणवठा बंद करून मारहाण मारहाणीत दोन अपंग, मुकबधीर मुली जखमी

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-  मागासवर्गीय कुटुंबीयांना सार्वजनिक पाणवठा बंद करून, जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍यांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी खडांबे (ता. राहुरी) येथील पिडीत साळवे कुटुंबीय व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली. सदर प्रकरणी आरोपींना पाठिशी घालून कर्तव्यात कसूर करणार्‍या राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक … Read more

शुभमंगलपूर्वी सावधान नाहीतर अडकताल पोलिसांच्या बेडीत

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात विवाह समारंभ अथवा इतर कार्यक्रमांसाठी पोलीस ठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश पारीत केला आहे. पोलिसांच्या परवानगीविना होणार्‍या विवाह सोहळ्यात आता लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकावे लागणार आहे. मागील आठवड्यात कनगर येथे झालेल्या विवाह सोहळ्यात वधू-वरांसह तब्बल … Read more

आज ५११ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६२१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५११ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६६ हजार २८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

संभाजीराजेंना पाठिंबा देत आमदार पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दिक टीका !

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. यातच मराठा आरक्षणाचा प्रमुख चेहरा बनलेले छत्रपती संभाजीराजे हे राज्याच्या विविध भागात दौरा करत आहे. यातच संभाजीराजे यांच्या यांच्या भूमिकेला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला. मात्र यावेळी त्यांनी ‘सवंग प्रसिद्धीसाठी काही पण बोलू नका’ नका असा शाब्दिक टोला … Read more

दूधदर व बळीराजाच्या प्रश्नांसाठी आता आंदोलनाचा पवित्रा

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- खरीप हंगाम तोंडावर असताना राज्य सरकारने हंगामाच्या तयारीकडेही अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे, परिणामी शेतकऱ्यांना आत्तापासूनच खतांची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली. यामुळे किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याविरोधात … Read more

तोफखानाची नवीन डिबी पुन्हा स्थापन… आता तरी अवैध धंद्यांना आळा बसणार का?

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  तोफखाना पोलिसांनी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे प्रगटीकरण शाखेची (डिबी) स्थापना केली आहे. कायमच वादग्रस्त ठरलेली डिबी पुन्हा स्थापन झाल्याने आता त्यांच्या समोर गुन्ह्यांची उकल करून आरोपी जेरबंद करण्याचे आव्हान आहे. पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना जेरबंद करण्यासाठी डिबी कार्यरत असते. मात्र तोफखाना पोलीस ठाण्याची डिबी … Read more

लग्न सोहळ्यात आढळले २२ कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील कणगर येथे झालेल्या लग्न समारंभात २२ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली. बाधित रुग्णांमध्ये नवरदेव, नवरीसह कलवऱ्यांचा समावेश असून या रुग्णांना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. लग्न समारंभानंतर नवरदेवाला त्रास जाणवू लागल्याने डाॅक्टरांकडे तपासणी करण्यात आली. यावेळी कोविड चाचणीत नवरदेव कोरोना … Read more

पारनेरच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : आमदार नीलेश लंके

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- शहराच्या पाणी योजनेसह विविध विकासकामे मार्गी लावून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आमदार नीलेश लंकेे यांनी सांगितले. पारनेर-जामगाव रस्त्यावरील मणकर्णिका नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपुजन आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार लंके यांनी शहर विकासासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी पक्षाचे … Read more

अवैध दारू दुकान बंद करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीने ठाकूर निमगाववासिय त्रस्त झाले आहेत. या दारू विक्रीला पायबंद घालण्याची मागणी ठाकूर निमगाव येथील सरपंच सुनिता कातकडे यांनी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठाकूर निमगाव येथे मागील काही दिवसांपासून अवैद्य … Read more

पार्क केलेली ‘ती’ कार कशी बुडाली ? खरे कारण आले समोर…

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  घाटकोपर परिसरातील एका खासगी इमारतीच्या परिसरातील विहिरीत बुडालेली कार अखेर 12 तासांनी बाहेर काढण्यात आली. रविवारी सकाळी ही कार विहिरीत बुडाली होती. या इमारतीच्या परिसरात एक विहीर होती. मात्र, सोसायटीने ती विहीर बुजवून त्यावर आरसीसी बांधकाम केले होते. त्यानंतर विहीरीचा भाग गाड्यांच्या पार्किंगसाठी वापरला जात होता. दरम्यान गेल्या … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली निळवंडे डाव्या कालव्याची पाहणी

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गती दिली असून डाव्या कालव्याच्या 64 ते 70 किलोमीटर लांबीची पाहणी आज महसूलमंत्री श्री. थोरात यांनी केली. कौठे कमळेश्वर, काथरवाडी, लोहारे मेंढवण या परिसरात विविध ठिकाणची पाहणी करत त्यांनी कामाचा आढावा घेतला. आमदार डॉ सुधीर तांबे, … Read more

जिवंत बॉम्ब पिशवीत टाकून त्या तरुणाने गाठले पोलीस ठाणे

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- तंत्रज्ञांनाचा उपयोग माणूस ज्ञान आत्मसात करण्यासाठी करत असतो. मात्र काही कुरापती असलेले व्यक्ती याचं माध्यमातून विघातक गोष्टी घडवतात. असाच काहीसा प्रकार एका तरुणाने केला आहे. पंचवीच वर्षीय या तरुणाने चक्क यू-ट्यूबचे व्हिडीओ बघून चक्क बॉम्ब तयार केला. पण तो निकामी कसा करायचा याची माहिती नसल्याने त्याने तो जिवंत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्याजवळ मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलस्वार रस्ता ओलांडत असतांना समोरून येणारी मालवाहतूक ट्रकच्या (एमपी ०९ एचजी ७५७९) मागील चाका खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या मालवाहतुक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारसायकलस्वार (एमएच १५ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- नगर-औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर परिसरात विहिरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल होऊन सदर मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. याबाबत, समजलेली माहिती अशी की सुनील पांडुरंग … Read more

‘आठ दिवसांत रुग्ण वाढल्यास राज्यात पुन्हा लॉकडाऊन…?’

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- रविवारच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आणि रुग्णसंख्यात जास्त झाल्याचं दिसत आहे. आपण सवलत दिल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या धीम्या गतीने वाढत आहे. संख्या जर अजून वाढली तर अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढील आठ दिवसांतील परिस्थिती पाहून यासंबंधातील निर्णय घेतला जाईल,” असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री … Read more

साडेतीन वर्षांनी चिठ्ठी पाहिली अन‌् तोफखान्यात दाखल झाला सहा जणांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- २० ऑगस्ट २०१७ रोजी विवाहितेने आत्महत्या केली होती. पोलीस तपासात सुनीता यांच्या कमरेला एक चिठ्ठी मिळून आली होती. या चिठ्ठीच्या आधारे तब्बल साडेतीन वर्षांनी त्याचे अवलोकन करून तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी विवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल पतीसह पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला. सुनीता अमित पालवे (३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव … Read more

साईबाबा संस्थानवर जिल्ह्यातील प्रस्थापित, साखर सम्राट, मद्य सम्राट यांच्या नियुक्त्या होऊ नयेत !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दीर्घकाळ रखडलेल्या नव्या संस्थानच्या नियुक्तीची चर्चा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर वर्णी लागावी म्हणून अनेक राजकीय नेते-कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांनीही संस्थानवर राजकीय व्यक्ती नको, अशी भूमिका घेत सामाजिक क्षेत्रातील नावे पुढे केली आहेत. त्यामुळे … Read more

विरोधकांनी साडेचार वर्ष काय केले याचं आत्मपरीक्षण करावं

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- साडेचार वर्ष गप्प बसलेल्या विरोधकांनी राहुरीच्या जनतेसाठी काय केले, याचे प्रथम आत्म परिक्षण करावे. नंतर सत्ताधारी गटावर आरोप करावे. असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनिल कासार यांनी नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. दोन दिवसांपूर्वी विरोधकांनी सत्ताधारी गटावर घणाघाती आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी गटाकडून … Read more