आज ५११ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६२१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५११ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६६ हजार २८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७७ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ३६५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९४ आणि अँटीजेन चाचणीत ४१४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले ०१, जामखेड ०४, नगर ग्रा. ०२, राहुरी ०२, संगमनेर ०२ आणि श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, अकोले ०४, जामखेड ०२, कर्जत ०२, कोपरगाव १७, नगर ग्रा.०८, नेवासा १४, पारनेर १८, पाथर्डी १२, राहाता २७, राहुरी १६, संगमनेर १३, शेवगाव २०, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ६२१ जण बाधित आढळुन आले. मनपा ७१, अकोले १३, जामखेड १४, कर्जत १२, कोपरगाव १८, नगर ग्रा. ४५, नेवासा १५, पारनेर ७३, पाथर्डी ४३, राहाता १७, राहुरी १५, संगमनेर १३, शेवगाव ११, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये अकोले ४७, जामखेड १०५, कर्जत ९०, कोपरगाव ५७, नेवासा १२, पारनेर २९, पाथर्डी ३३, राहुरी ०२, संगमनेर ६४, शेवगाव ३९ आणि श्रीरामपूर ३३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,६६,२८४
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३३६५
  • पोर्टलवरील मृत्यू नोंद:५५३०
  • एकूण रूग्ण संख्या:२,७५,१७९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)