Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर लक्ष द्या. बँकेने ग्राहकांसाठी एक मोठे अपडेट दिले आहे. तुमचे पीएनबी बँकेत बचत खाते असल्यास प्रथम त्याची स्थिती तपासा. कारण PNB महिनाभरात अशी खाती बंद करणार आहे जे गेल्या काही दिवसांपासून वापरात आलेले नाहीत. बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ज्या खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांत कोणताही व्यवहार झाला नाही. तसेच ज्यांच्या खात्यात गेल्या तीन वर्षांपासून शून्य रुपये शिल्लक आहेत. अशी खाती लवकरच बंद होणार आहेत.
अनेक स्कॅमर अशा खात्यांचा गैरवापर करतात जे ग्राहक बऱ्याच काळापासून वापरत नाहीत. म्हणूनच बँकेने हे मोठे पाऊल उचलेल आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, खात्यांची गणना 30 एप्रिल 2024 च्या आधारावर केली जाईल. PNB (PNB Bank Update) ने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की ती सर्व खाती 1 महिन्यानंतर बंद केली जातील, जर ती गेल्या 3 वर्षांपासून सक्रिय नसेल. म्हणजेच त्या खात्याचा वापर केला नसेल.
दरम्यान बँक, डिमॅट खाती बंद करणार नाही. म्हणजेच डीमॅट खात्याला हा नियम लागू होणार नाही. बँकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, पीएनबी बँकेने म्हटले आहे की, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना अशी खाती बंद करणार नाही.
खाते बंद झाल्यानंतर पुन्हा कसे सक्रिय कराल?
बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर खाते निष्क्रिय झाले आणि ग्राहकांना खाते पुन्हा सक्रिय करायचे असेल तर अशा ग्राहकांना शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. केवायसी फॉर्मसोबत ग्राहकाला आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागतील. त्यानंतर त्यांचे खाते सक्रिय होईल. अधिक माहितीसाठी ग्राहक बँकेला भेट देऊ शकतात.