तरुणीची पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- राहाता परिसरातील बोठेवस्ती भागात राहणारी तरुणी प्रिती रघुनाथ बोठे , हिने रहात्या घरात भिंतीला असलेल्या पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी प्रिती बोठे या तरुणीचे चुलत भाऊ अरुण भगवान बोठे ( कृषी सेवा केंद्र ) बोठे वस्ती राहाता यांनी राहाता पोलिसात खबर दिल्यावरून पोलिसांनी अमन , २५ नोंदविला … Read more

ब्रेकिंग : आदर्शगाव लोहसरच्या सरपंचाना मारहाण

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे रेशनचे धान्य वाटपावेळी झालेल्या वादातून लोहसरचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल (अनुराग) जगन्नाथ गिते यांना मारहाण झाली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. विरोधी गटाचे गंगाधर ऊर्फ शिवाजी वांढेकर हे देखील या हाणामारीत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार … Read more

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील अपडेट्स

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. आज १४९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४२२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५५४७ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३० हजार ८५७ … Read more

अहमदनगरमध्ये ड्रायव्हरला झाली कोरोनाची लागन,शहरातील हा भाग होणार सील ?

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-  अहमदनगर शहर कोरोनामुक्त झाले असताना पुन्हा त्याने शिरकाव केला आहे. त्यामुळे नगरकरांची काळजी वाढली आहे.दोन दिवसांत अहमदनगर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे आज सकाळी (बुधवारी) जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ११ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी सारसनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव आला होता. ही व्यक्ती ड्रायव्हर असून … Read more

अहमदनगर मध्ये आता ‘या’ आजाराचा धोका,50 जणांना झाली लागण !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात  तब्बल ५० जणांना “सारी’ची लागण झाली आहे. महापालिका, नगरपालिका हद्दीत २३ आणि ग्रामीण भागात २७ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. कोरोनाबरोबरच सारीचे रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे. पावसाळ्यात सारी आजाराचे रुग्ण … Read more

अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास ‘हॉटस्पॉट’ करावे लागतील !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- शहरातील कोरोनाला पुन्हा आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिलाने काम करायला हवे. यासाठी चार टिम तयार करण्यात येणार आहेत. या कामात कुचराई करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. शहरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाहता महापालिकेतील स्थायी … Read more

पारनेर तालुक्यात शिरला कोरोना, त्या तरुणाच्या मृत्यूमुळे भितीचे वातावरण !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील ‘त्या’ मृत व्यक्तीचा चा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पारनेर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे,यामुळे तालुका हादरला असून नागरिकांत भितीचे वातावरण आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने पिंपरी जलसेन गाव सील करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत काल दि. १२ रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने सकाळी जिल्हा रुग्णालयात … Read more

जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या ११६ वर

अलिबाग, जि. रायगड, दि.13 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 13 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे- जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 13/05/2020) – 1 हजार 635, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा  incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 … Read more

परप्रांतीय मजुरांना मूळ गावी सोडण्यासाठी एस.टी. बसेस रवाना.!

अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : कोकणातील श्रीवर्धन तालुक्यामधून परप्रांतीय मजूरांना घेऊन तीन एस.टी. बसेस बोर्ली पंचतन आगारातून बुधवारी, संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास रवाना झाल्या. सांगली-कराड लगत असणाऱ्या कर्नाटक सीमेवरील जत या ठिकाणी या एस.टी. बसेस मार्गस्थ झाल्या. श्रीवर्धन आगारातून एकूण तीन बसेस निघाल्या असून प्रत्येक गाडीत प्रत्येक 22 याप्रमाणे एकूण 66 प्रवाशी कर्नाटक सीमेच्या दिशेने … Read more

महाराष्ट्रने रोजीरोटी दी है, कैसे भुलेंगे?

चंद्रपूर,दि.13 : लॉकडाऊन खत्म होने के बाद फिर से आना.. जहॉं,काम किया है वहॉं काम मिलेगा अशा आश्वासक शब्दात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधत झारखंडच्या नागरिकांना निरोप दिला. यावर महाराष्ट्र के भरोसे हमारी रोजीरोटी है… हम लोग आपका प्यार कैसे भुला देंगे… असे भावपूर्ण उद्गार काढत  जिल्ह्यातील झारखंडच्या मजुरांनी आज चंद्रपूर शहराचा निरोप घेतला. वेळात वेळ … Read more

राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा

मुंबई, दि.१३ : कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढणाऱ्या पोलीस दलातील योद्ध्यांसाठी गृह विभागामार्फत विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी गृह विभागामार्फत घेण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोना विरुद्धच्या या युद्धात २४ तास कार्यरत आहे. कार्यक्षमतेच्या दुपटीने पोलिसांना काम करावे लागत … Read more

राज्यात ६५ हजार उद्योगांना परवाने, ३५ हजार उद्योग सुरू – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई, दि. १३ : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून सद्यस्थिती ६५ हजार उद्योगांना उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असून त्यापैकी ३५ हजार उद्योगांनी उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात सुमारे नऊ लाख कामगार रुजू झाले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर श्री.देसाई यांनी ही माहिती दिली. … Read more

श्रमिक विशेष रेल्वे बिहारकडे रवाना

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयात संपर्क साधल्यानंतर रद्द केलेली तिकिटे रेल्वे प्रशासनाने पुन्हा वितरित केली. यानंतर ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत बिहारमधील 1 हजार 320 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज सायंकाळी 7.20 वा. छपराकडे रवाना झाले. प्रशासनाने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात दिवसभरात आढळले 6 कोरोना बाधित ! बाधितांची संख्या आता 60 !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- आज सकाळी नगर शहरातील सारसनगर येथील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोना वाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा आणखी ०५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात एकूण ०६ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ६० झाली आहे. सायंकाळी बाधित आढळलेल्या ०५ व्यक्तीपैकी ०३ व्यक्ती या … Read more

नेहमीप्रमाणे आर्थिक पॅकेजची घोषणाही पोकळ ठरू नये !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-   कोरोनाच्या संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चार भाषणांमधील मोठ मोठ्या परंतु पोकळ शब्दांतून देशाच्या गरजेचा एक शब्द आज ऐकायला मिळाला तो म्हणजे आर्थिक पॅकेज. गेल्या सहा वर्षातील वेगवेगळ्या पोकळ घोषणांप्रमाणे या आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नये हीच अपेक्षा” अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली. … Read more

धक्कादायक : तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अकोले तालुक्यातील विठा भागात राहणारी शेतकरी तरुणी राणी योगेश आवारी , वय ३० शेतात गेली असता ती घरी आली नाही तिचा शोध घेतला असता डॉक्टर भोकनळ यांच्या विहिरीजवळ चप्पल दिसून आली . तेव्हा विहीरीत गळ टाकून राणी आवारी हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. डॉक्टरकडे नेले मात्र ती उपचारापूर्वीच मयत … Read more

मालेगावमधील कोरोना रुग्‍ण शिर्डी येथील रुग्‍णालयात येणार ? जाणून घ्या सत्य…

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- मालेगाव व शेजारील काही तालुक्‍यांमध्‍ये कोरोना रुग्‍णांची संख्‍या दिवसागणीक वाढत आहे. त्‍यामुळे तेथील रुग्ण अन्‍य ठिकाणच्‍या रुग्‍णालयात दाखल करण्‍याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमिवर मालेगाव येथील रुग्‍ण शिर्डी येथील रुग्‍णालयात आणि विलगीकरण कक्षात दाखल करण्‍यात येणार असल्‍याची अफवा पसरल्‍यामुळे शिर्डी शहरासह परिसरामधील गावांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान मालेगाव … Read more

अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. १४ मे रोजी प्रामुख्याने अहमदनगर सह पुणे, नाशिक या जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १५ मे रोजी अहमदनगर सह पुणे, नाशिक व धुळे या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या आठवडय़ातही राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाळी स्थिती … Read more