कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६१व्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्र्यांकडून अभिवादन

सातारा, दि. ९ (जिमाका) : सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६१व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार … Read more

कर्मवीर अण्णांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र आजच्या घडीला उपयुक्त

मुंबई, दि. ९:- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवली.  आजच्या सुशिक्षित आणि प्रगतशील महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीर अण्णांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. ‘कोरोना’ नंतर राज्याला सावरण्यासाठी त्यांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले. कर्मवीर अण्णांनी रयत … Read more

हिंसक विचार थांबविण्यासाठी विचार प्रक्रिया बदलावी लागेल

मुंबई, दि.9: हिंसक विचार थांबवायचा असेल तर जीवनशैली आणि विचार करण्याची प्रक्रिया बदलण्याची गरज आहे. दुसऱ्याला मारलेली एक थप्पड ही इतरांचा सन्मान व प्रतिष्ठा राखण्याची आपली जबाबदारी विसरण्यास भाग पाडण्यास सुरुवात करते. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे हेच कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी सकारात्मक विचारांना चालना देण्याची गरज आहे, असे मत महिला … Read more

केंद्राच्या भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय

मुंबई, दि.9 :- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत अन्न,नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण विभागाने महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मका पिकाला नगदी पिक म्हटले जाते. मात्र लॉकडाऊनमुळे कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये मंदी आल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत … Read more

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख २० हजार पास वाटप

मुंबई दि.९ –  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३ लाख २० हजार ६९७ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच राज्यात १ लाख २४५ गुन्ह्यांची नोंद झाली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ८ मे २०२० या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख २४५ … Read more

मातृदिन अंगणवाडी सेविकांना अर्पण

मुंबई, दि. ९ : राज्यातील सर्व माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा देताना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या वर्षीचा मातृदिन अंगणवाडी सेविकांना समर्पित केला आहे. त्यासाठी त्यांनी एक अभंगपर कविता रचली आहे. कोरोना परिस्थितीमध्ये महिला व बालविकास विभाग लहान बालके, गर्भवती, स्तनदा माता यांच्या पोषण आहाराची तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. … Read more

नफेखोरी करणाऱ्या मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा

मुंबई दि. ९ : राज्य शासनाने दि. ३० एप्रिल २०२० रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेद्वारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य आजारांवरील उपचारांसाठी किती शुल्क आकारावे हे ठरवून दिलेले असताना काही रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारणी चालू असल्याने अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बृहन्मुंबई पालिका आयुक्तांना दिले आहेत. श्री. … Read more

‘तो’ पोलिस निरीक्षक अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याने पोलिस निरीक्षकाने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. शहरात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एका महिलेने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामुळे सदर अधिकाऱ्याने जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अहमदनगर Live24 वर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 52 !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे. जामखेड येथील ०२ कोरोना बाधित तरुणापैकी एकाचा चौदाव्या दिवसा नंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर दुसऱ्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तलवारीच्या धाकाने महिलेच्या घरातील अडीच लाखांचा ऐवज लांबविला !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे वैशाली बाबासाहेब हराळ यांच्या घरी दोन अज्ञात चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून सुमारे अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हराळ यांच्या तक्रारीवरून नगर तालुका पोलीसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. ही घटना शुक्रवारी, दि.8 रात्री … Read more

पंधरा दिवसांपूर्वीच रचला होता ‘त्या’ खुनाचा कट ! पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर …

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे यांचा खून करण्याचा कट पंधरा दिवसांपूर्वी दत्तात्रय पठाडे व त्याच्या प्रेयसीने रचला होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. आरोपी दत्तात्रय पठाडे व महिलेचे तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते, याची मुकुंदला माहिती होती. मयत मुकुंद वाकडे यानेही महिलेला त्रास दिला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी दोन दिवसांत झाले ‘एवढे’ अर्ज !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रोज हजारो अर्ज येत आहेत. दोनच दिवसांत २ हजार १०० जणांचे इतर अहमदनगर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज आले होते. जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना परवानगी देण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यरत करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ परदेशी नागरिक पोलिस कोठडीत !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  कोरोनाबाधित असलेल्या तबलिगी जमातीच्या पाच जणांचा अहवाल निगोटिव्ह आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील दोन परदेशी नागरिकांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन भारतीय नागरिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्या अटकेची कारवाई केलेली आहे. टुरिस्ट व्हिसा घेऊन भारतात धर्मप्रसार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील तीन … Read more

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उद्यापासून ‘मेड इन चंद्रपूर’ रोबोट होणार सहभागी

चंद्रपूर, दि. 8 : कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी जिल्ह्यात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने बनवलेला आधुनिक मेडी-रोवर रोबोट उद्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेला हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी असे सांगितले की, कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी … Read more

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार!

मुंबई, दि. ८ : मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला असून या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी करून आपापल्या घरी जाता येणार आहे. मुंबई शहर व उपनगरात ७ वसतिगृहे असून त्या ठिकाणी ७१ विद्यार्थी थांबलेले आहेत. याव्यतिरिक्त राज्यातील अन्य काही वसतिगृहांमध्ये काही … Read more

चांगापूर व कामुंजा जिनिंग सोमवारपासून सुरु होणार

अमरावती, दि. 8 : चांगापूर, कामुंजा येथील सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या खरेदी प्रक्रियेतील अडचणी दूर करून तिथे कापूस खरेदी तत्काळ सुरु करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार प्रशासन व पणन महासंघाकडून हालचाली होऊन सोमवारपासून (11 मे) ही खरेदी सुरु होणार आहे. त्यामुळे भातकुली, तिवसा, … Read more

स्वगृही परतणाऱ्या नागरिकांची तपासणी मोफत – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 8 – लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, अमरावती विभागात अडकलेल्या बिहार राज्यातील मजूरांसाठी विशेष रेल्वे अमरावती रेल्वे स्थानकावरून १० मे रोजी रवाना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने सोशल डिस्टन्स, पार्किंग, भोजन, पाणी आदी व्यवस्था … Read more

आपसात समन्वय राखून कोरोनावर मात करुया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

 जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 8- भुसावळ शहरातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सांयकाळी प्रांताधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कठीण काळात सर्व अधिकारी व यंत्रणामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचेही सांगितले. शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त करीत … Read more