कोरोना मुक्त ठाणे जिल्ह्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचा संकल्प – पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. १ : कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वयंशिस्त पाळून जिल्हा आणि राज्य कोरोना मुक्त करण्याचा संकल्प करा, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त … Read more

प्रत्येकाला जिल्ह्यात आणण्यासाठी मदत करणार : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि 1 मे : राज्य शासनाने 30 एप्रिल रोजी राज्याबाहेरच्या व राज्यातील इतर ठिकाणच्या नागरिकांना जिल्ह्यामध्ये आणण्याची परवानगी दिल्यानंतर प्रशासन गतीने कामी लागले आहे. ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी एकाच वेळी गोंधळ न करता ज्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत त्या जिल्ह्याच्या प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन पालकमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. अन्य राज्यात अडकून … Read more

परराज्यातील, राज्यांतर्गत अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठीचे नियोजन सुरू

मुंबई, दि.1 : परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले आहेत, त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत  शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात  सुखरूप पाठवले जाईल व त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, आणि राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनासुद्धा मूळ गावी … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण

सांगली, दि. 1 : कोविड-19 विरूद्धच्या लढाईत सांगलीकरांनी अत्यंत उत्कृष्ट साथ दिली. याबद्दल सांगलीकरांना धन्यवाद देत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा … Read more

कोरोनाच्या महासंकटावर निश्चितपणे मात करू – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 15 : महाराष्ट्रभूमी ही शूरवीर आणि संतांची भूमी आहे. यापूर्वीच्या प्रत्येक संकटावर या भूमीने मात केली आहे. आपण सर्वजण धैर्य, संयम, शिस्तीचा अवलंब करून कोरोनाच्या महासंकटावरही निश्चितपणे मात करू, असा विश्वास पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरकमहोत्सवी (60वा) वर्धापनदिन समारंभानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते … Read more

सर्व नगरपालिकांचे धोरण सुसंगत असावे – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग, दि. 01  : कोरोना प्रादुर्भाव रोखण्या संदर्भात व लॉकडाऊन विषयी घेण्यात येणाऱ्या निर्णयांमध्ये सर्व नगरपालिकांमध्ये एकवाक्यता असावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या समवेत आज पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, जिल्हाधिकारी … Read more

‘राज्य उत्पादन शुल्क’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटींची मदत

मुंबई, दि. 1 : ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे स्वयंप्रेरणेने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 ‘साठी 1 कोटींच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सुपूर्द केला. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या लढ्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील 2 हजार … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

पालघर, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभूवन, पोलीस अधीक्षक गौरव सिंह उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आणि साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचे हे निर्देश पाळत येथील … Read more

आता ‘या’ व्हायरसचा धुमाकूळ; शंभरहून जास्त मुले आयसीयूमध्ये !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  कोरोनाव्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हा विषाणू प्रौढांवर जास्त परिणाम करतो असे म्हटले जाते. यावर जगभर उपाय शोधण्याचे काम सुरु आहे. परंतु या दरम्यान युरोपमधून एक धक्कादायक बातमी येत आहे. इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्ससह जवळपास 6 देशांमध्ये एक विचित्र विषाणूने मुलांवर हल्ला करण्यास सुरवात केली आहे. युरोप आणि अमेरिकेत … Read more

आता नसीरूद्दीन शाह रुग्णालयात? काय आहे सत्य?

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  बॉलीवूडने दोन दिवसात ऋषी कपूर आणि इरफान खान हे दोन अनमोल हिरे गमावले आहेत. यानंतर अचानक बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनाही रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी व्हायरल झाली आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु हि बातमी खोटी आहे, यात सत्यता नसून केवळ अफवा आहे. इरफान व ऋषी कपूर … Read more

आता अहमदनगरच्या ‘या’ दोन रुग्णालयांत रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत येथील जिल्हा रुग्णालय सरकारने ‘कोव्हिड हॉस्पिटल’ म्हणून घोषित केले आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात करोनासंबंधित रुग्णांव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन हॉस्पिटलचे तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यातील इतर … Read more

कोरोना विरोधी पथकाने केला लाखभर रुपयांचा दंड वसूल  !

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- संगमनेर नगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून नगरपालिकेच्या कोरोना विरोधी पथकाने कारवाई करत सुमारे १ लाख ७ हजार ६५० रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. कोरोनाचा संक्रमण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकणे, तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे अशा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ जोडप्यास कोरोनाची लागण, १७ जणांना आरोग्य विभागाने केले होमक्वारंटाईन !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अकोले तालुक्यातील माळीझाप येथे राहणाऱ्या व सद्या वास्तव्य नाशिकमध्ये असलेल्या एका  जोडप्यास कोरोना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सदर कोरोनाबाधित रुग्ण तरुण हा नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती असून त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आल्याचे लक्षात आले आहे. विशेष बाब म्हणजे हा पोलीस कर्मचारी त्यांच्या भाचीच्या संपर्कात आल्याने … Read more

तुम्ही लॉकडाऊन मध्ये टाईमपास करत होतात तेव्हा अहमदनगरच्या ‘या’ मुलाने लाखो कमाविलेत !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांचे रोजगार – व्यवसाय बुडाले, शेतकर्यांचे तर सर्वात जास्त नुकसान झाले मात्र या कठीण परिस्थितीवर एका तरुणाने मात करत लाखो रुपये कमाविले आहेत… होय हे खरय.. शेती आणि युवक यांचा समन्वय होत नाही. शेतीपेक्षा आजचा युवक नोकरीला प्राधान्य देतो. मात्र बीए पर्यंत शिक्षण घेतलेल्या … Read more

हमको डटकर रहना है.. क्योंकि करोना को हराना है..!

रायगड-अलिबाग मधील रितेश घासे, आशिष पडवळ, पंकज वावेकर, समाधान चंदू, आरती पाठक, धनंजय साक्रूडकर, केतन भगत, नवीन मोरे या आठ जणांचं संगीत वेडं तरुण मित्र मंडळ. सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड, उमेद, जिद्द. सर्वांनी मिळून “बास कर” नावाचे प्रॉडक्शन हाऊस 2017 या वर्षी सुरू केले. हळूहळू लोकांकडून त्यांच्या कामाची पावती मिळू लागली आणि “झी म्युझिक” सारख्या आघाडीच्या म्युझिक … Read more

खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा

पुणे दि.१ :- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषि निविष्ठांबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात … Read more

कोरोनावर लवकरच निर्णायक विजय मिळवू !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-नवी दिल्ली : ‘कोरोना व्हायरसविरोधातील युद्धात भारत सर्वच मापदंडांवर अन्य देशांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांतच देश या जागतिक महामारीविरोधात निर्णायक विजय मिळवेल, असा ठाम विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी व्यक्त केला. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २५.१९ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने यावेळी … Read more