महिलेला जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी,२४ जणांवर ॲट्रोसिटी !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी आजमपूर येथे धान्याचे पोते ढकलून दिल्यामुळे जाब विचारायला गेलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ व अपमान करून थेट फाशी देऊन मारण्याची धमकी दिल्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात २४ जणांविरुद्ध ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादींनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोठ्याभाऊ … Read more

खतांचे भाव कमी न केल्यास आंदोलन !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी न केल्यास आंदोलन करणार असा इशारा शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांनी केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही सदानंद गोवडा यांना निवेदनाद्वरे दिला आहे. गेल्या दीड वर्षा पासून कोरोना महामारीमुळे बाजारात मंदी आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव मिळत नाही. आशातच चालू वर्षी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत पडून एका जणाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळासणे येथे विहीरीत पडून बबन आण्णा शिंदे (वय ६०) यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की डोळासणे येथे बबन शिंदे राहात होते. शनिवारी ते आंघोळ करण्यासाठी विहिरीवर गेले होते. बादलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढत असताना अचानक त्यांचा … Read more

लढाई एकजुटीने मुकाबला करून जिंकायचीय !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. या लाटेमध्ये तज्ञांच्या सुचनेनुसार लहान मुलांवर परिणाम होणार आहे. तरी प्रत्येकाने मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढे यावे, एकजुटीने मुकाबला करून कोरोनाची लढाई आत्मविश्वासाने जिंकायची आहे, असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले. गंगाधर शास्त्री गुणे … Read more

गंभीर वयाेवृद्ध रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात, सन्मानपूर्वक दिला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- वय वर्षे ७५, कोरोना एच आरसीटी स्कोअर १९, ऑक्सिजन पातळी ८० असलेली वृद्ध महिला, स्कोअर १५, तर ऑक्सिजन पातळी ८२ असलेला पुरुष रुग्ण, स्कोअर १५, ऑक्सिजन पातळी ८१ च्या आसपास असलेले वृद्ध यांनी श्रीरामपूर शहरातील पसायदान कोविड केंद्रात उपचार घेऊन कोरोनावर मात केली. या सर्वांना सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्यात … Read more

जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण आढळले ‘ह्या’ तालुक्यात !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- नेवासे तालुक्यात कोरोना बाधितांचा दहा हजाराचा आकडा पार होत असताना मंगळवारी नेवासे तालुक्यात जिल्ह्यात सर्वात जास्त २९६ बाधित रुग्ण सापडले. तालुक्यातील १३१ पैकी १३ गावांमध्ये बाधितांची संख्या पंधरा दिवसांपासून शून्यावर असून तालुक्यातील तब्बल ९१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. मध्यंतरी तपासणी किट नसल्याने नसल्याने तपासणी ठप्प होती. मात्र आता … Read more

काेराेनामुळे पती गमावलेल्या महिलांना मदत करणार

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- करिना कपूरने सोशल मीडियावर एक माहिती शेअर केली आहे. ही माहिती त्या महिलांसाठी आहे, ज्यांच्या पतीचा मृत्यु कोरोनामुळे झाला आहे. करिना त्यांच्या दु:खात सहभगाी असून तिने सहाुनभूती व्यक्त केली आहे. पोस्टमध्ये त्यांना रोजगार मिळवण्यात मदत मिळू शकते. करिनाने लिहिले, या उपक्रमात कोणीही वॉलेंटियर म्हणून काम करू शकते. खेड्यापाड्यापर्यंत … Read more

बँक कर्मचारींच्या लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सरसावले

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व बँक कर्मचारींचे कोरोना लसीकरण होण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले असून, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व बँक कर्मचार्‍यांना प्राधान्याने लसीकरण करुन घेण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्र पाठविले आहे. शहरासह जिल्ह्यात बँक कर्मचार्‍यांना प्राधान्याने लसीकरण सुरु झाले असून, … Read more

कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना रांगेत न थांबता मिळणार लस

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावणार्‍या शिक्षकांना फ्रन्टलाईनचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.18 मे) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षकांनी घरात अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलन केले होते. सदर प्रश्‍नी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांची भेट घेतली असता त्यांनी … Read more

सरसकट फळ व भाजी विक्री बंदीचा आदेश मागे घ्यावा

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  शहरातील भाजी व फळे विक्रेत्या संबंधित घालण्यात आलेले निर्बंधाच्या आदेशात सुधारणा करून धोरणात्मक पद्धतीने आदेश देऊन शेतकरी, भाजी विक्रेते व नागरिकांच्या सोयीसाठी नियोजन करण्याची मागणी चितळे रोड हातगाडी भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे व कार्याध्यक्ष अरुण खीची यांनी महापालिका … Read more

कोरोना काळात कर्तव्यात कसुर; दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस!

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना काळात कर्तव्यात कसुर करणाऱ्या दोन शिक्षकावर कार्यवाही करण्यात आली आहे. तहसील विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तालुक्यातील ही पहिलीच कारवाई आहे. अहमदनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनाकडून दिवसेंदिवस विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. गावातील विलगीकरण … Read more

सकारात्मक परिणाम नसल्याने कोरोना उपचारातून ‘हे’ महागडे इंजेक्शन बाद होणार…

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर इंजेक्शन काहीही सकारात्मक परिणाम करत असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीबरोबरच आता सर्वात जास्त मागणी होत असलेलं रेमडेसिवीर इंजेक्शनही कोरोना उपचाराच्या यादीतून वगळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. डॉ. राणा यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी … Read more

जाऊ नका डबल सीटर लांब लांब लांब…. अन्यथा होईल कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दुचाकीवर डबल सीट फिरणाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिला आहे. यापुढे दुचाकीवर डबल सीट फिरताना आढळला तर अशा व्यक्तींची दुचाकीच जप्त करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी … Read more

श्रीरामपूरात पोलिसांनी जप्त केला 10 हजारांचा गुटखा

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  श्रीरामपूर शहरात एका इसमाकडून पोलिसांनी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील काजी बाबा रोडवर एका इसमाकडे गुटखा असल्याची माहिती पालिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी आपल्या … Read more

आस्मानी संकटाचा फटका बळीराजाला; शेतमालाचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशातील काही राज्यांवर घोंघावणारे तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका अनेक जिल्हयांना बसला आहे. यातच या वादळाचा मोठा आर्थिक फटका नगर जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळ आणि जोरदार वार्‍यामुळे 20 गावातील 56 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. कृषी विभागाने मंगळवारी केलेल्या पंचनाम्यामध्ये नगर तालुक्यातील 3 गावांत … Read more

दिलासादायक ! जिल्हयातील रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांच्या पुढे

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद होत होती. बाधितांची आकडेवारी थेट साडेचार हजारांच्या पार गेली होती. मात्र आता काहीसे दिलासादायक चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणार्यांची संख्या देखील वाढली आहे. तसेच दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरीचा रेट देखील … Read more

लाचखोरी सुरूच; मंडल अधिकार्‍यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- वडिलांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीची सातबारा उताऱ्याची नोंद प्रमाणित करण्यासाठी राहता येथील मंडल अधिकाऱ्याने 3 लाखांची मागणी केली होती. त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत पथकाने राहाता येथील मंडलअधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर यास 2 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

पाच हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- पाच हजार रूपयांची लाच घेतांना अकोले येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस नाईक संदीप भाऊसाहेब पांडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस ठाणे आवारातच रंगेहाथ पकडले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले येथील घटनेत तक्रारदाराचे साडू व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध दाखल असलेल्या … Read more