केंद्रसरकारकडून 30 हजार कोटी रुपये घेणे : बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-सोलापूर दौरा काल केले. अतोनात नुकसान झाले, उद्या उस्मनाबाद येथे पाहणी दौरा करणार आहे. गुरूवारी मंत्रीमंडळातील सहकारी सर्व चर्चाकरून शेतकरी यांना मोठा दिलासा दिला जाईल. केंद्र सरकारमधील पीएम अमित शाहा यांना महाविकास आधीच शिष्टमंडळ मदतीसाठी भेटणार आहे. त्यात काँग्रेस नेते असतील. केंद्र सरकारने अपेक्षासारखी आधी मदत केली नाही, आता तरी … Read more

ना.थोरात यांच्या संदर्भातील वक्तव्य राष्ट्रवादीच्या खोसे यांनी मागे घ्यावे !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- पार्किंगमधील वादातील किरण काळे यांचे वैयक्तिक मत स्पष्ट असतांना या वादात राष्ट्रवादीच्या अभिजित खोसे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्यावर नाहक आरोप करुन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, श्री.खोसे यांनी ना.थोरात यांच्या संदर्भातील ती भावना दुखावणारी वक्तव्य मागे घ्यावी व आघाडीचा धर्म पाहावा, असे आवाहन अहमदनगर शहर … Read more

अकोले तालुक्यातील ‘त्या’ कामांबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्याची महसूलमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यामध्ये बऱ्यापैकी विकासकामे झाली आहेत. तर विविध कामे सुरु आहेत. परंतु बरीचशी कामे अनेक कारणामुळे बंदही होत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अगस्ती सह. साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे यांनी अकोले तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेली प्रलंबीत कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री … Read more

केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी – मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  यंदा मान्सूनने व परतीच्या पावसाने मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसलेला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली असुन या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहीती महुल मंत्री … Read more

बळीराजा संकटात; महसूल मंत्र्यांनी पतंप्रधानांना केली हि विनंती

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्ववभूमीवर महसूलमंत्र्यांनी केंद्राकडे मदतीची अपेक्षा केली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून … Read more

मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रावरून थोरातांनी राज्यपालांना विचारला हा प्रश्न

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रावरून वाद सुरू झाला आहे. या पत्राच्या भाषेबाबबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले होते. तर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज्यपालांच्या या कृतीवर आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या … Read more

शेतकरी कायद्याविरोधात 15 ऑक्टोबरला काँग्रेसची भव्य शेतकरी बचाव रॅली

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने घाईघाईने 3 शेतकरी विरोधी कायदे मंजूर केले आहेत त्याचा आम्ही काळे कायदे म्हणून उल्लेख करतो. या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रातही आंदोलन सुरु केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता 15 ऑक्टोबरला दुपारी 4.00 वा. महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे 10 हजार गावात … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कायम विकासाला प्राधान्य

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात विकास कामांचा वेग कायम असून कोरोना संकटातही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम गावच्या वाडी-वस्तीच्या विकासाला प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेच्या ३०५४ निधीतून चिकणी-निमगाव भोजापूर-राजापूर … Read more

बँक निवडणूकीच्या आडून विधानसभेची तयारी सुरु

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आद्यपही कायम आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यातील पक्षीय समीकरणे पुन्हा बदलल्याने जिल्हा बँक निवडणूकीच्या आडून विधानसभा निवडणूकीची गणितेही आखली जावू लागल्याची चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. जिल्हा बँक निवडणूक ही कारखानदारांसाठी प्रतिष्ठेची राहते. कारण कारखान्यांचे आर्थिक गणित … Read more

प्रलंबित मागण्यांसंदर्भात ग्रामसेवकांनी घेतली महसूल मंत्र्यांची भेट

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी शिष्टमंडळासह राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि सर्व प्रधान सचिव यांची एकत्रित बैठक आयोजित करून ग्रामसेवकांच्या मागण्या मंजूर होणेबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. त्यास प्रतिसाद देत … Read more

महसूल मंत्र्यांचे तालुक्यातील रस्ते होणार मजबूत

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-  एकीकडे नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडलेले आहे, याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना व वाहनधारकांना करावा लागतो आहे. दरम्यान राज्याचे महसूलमंत्री यांनी त्यांच्या तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण … Read more

संकट आले तरी दिलेला शब्दपासून मागे हटलो नाही; महसूलमंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कोरोनाचे संकट आद्यपही कायम आहे. तसेच या संकटमय काळात महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या हितासाठी खंबीर उभे राहिले आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच यावेळी बोलताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला चांगलाच टोला लगावला. महायुतीच्या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पहाटे पासून शेतकऱ्यांना रांगा लावायला लावल्या मात्र … Read more

काय सांगता ! मंत्री थोरात – पिचड- आ. लहामटे आले एकाच व्यासपीठावर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- 2019 ची विधानसभा कुणीही विसरणे अशक्य आहे. जी राजकीय परिवर्तन, उलथापालथ , पक्ष बदल आदी गोष्टी या कालखंडामध्ये घडल्या. या काळात एकाच पक्षातील सहकारी एकमेकांचे विरोधक बनले. संगमनेर-अकोले मधील माजी मंत्री पिचड, मंत्री थोरात , आ. लहामटे हे एकेकाळचे स्वपक्षीय विरोधक झाले. परंतु तब्बल वर्षभरानंतर हे लोक एकाच व्यासपीठावर … Read more

शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेले नवे कृषी विधेयक आधारभूत किंमत विनाआधार करणारे अाहे. संघर्षातून कामगारांनी मिळवलेले अधिकार नव्या कामगार कायद्याने संपुष्टात येणार आहेत. फक्त भांडवलदारांच्या सोयीसाठी शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. मालुंजे येथे … Read more

महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे सक्षम विरोधी पक्षनेते होते. भाजप-सेनेच्या सरकारमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. महाविकास आघाडीत त्यांना घेण्याचा प्रयत्न चालू आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सांगितले. आरोग्य अभियानाच्या बैठकीसाठी ते येथे आले होते. लोकशाहीचा चौथा खांब पत्रकारिता आहे. मात्र, जनभावना निर्माण करून लोकशाहीला घातक काम या क्षेत्रात … Read more

हाथरस प्रकरण दाबण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न – ना.बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहीक बलात्कार व हत्या प्रकरणी भाजपा सरकार पहिल्या पासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पीडित कुटुंबाला कोणालाही भेटू दिले गेले नाही. विरोधी पक्षाचे नेते व माध्यमांना प्रतिबंध करुन योगी सरकार कोणालाही तरी वाचवण्याचा आटापीटा करत आहे. हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशास्पद … Read more

राहुल गांधी धक्काबुकी प्रकरणावरून महसूलमंत्री थोरात संतापले

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बलात्कार पीडितेच्या परिवाराच्या भेटीसाठी जाताना काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला आहे. याच प्रकरणावरून काँग्रेसचे महाराष्ट्र … Read more

महसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. विरोधकांनीही यावर आवाज उठवला. परंतु काही खासदारांना निलंबित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कडाडले. कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय … Read more