आमदार निलेश लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस ,लंडन’मध्ये समावेश !

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोनाच्या वैश्विक संकटात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आमदार निलेश लंके यांची विदेशातही दखल घेतली असून त्यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस,लंडन’मध्ये समावेश झाल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी दिली. आज (गुरूवारी )दुपारी १ वाजता मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात आमदार लंके यांना स्मृतीचिन्ह … Read more

गोरगरिबांची लूट करणाऱ्यांचा परमेश्‍वरच कार्यक्रम करणार; लंकेचा विरोधकांना टोला

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला होता. रुग्णांना उपचारासाठी दवाखाने मिळत नव्हते, कोव्हीड सेंटर फुल होते. यावेळी देवदूत बनून आलेल्या आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी मध्ये हजार बेड क्षमता असलेले भव्य कोव्हीड सेंटर सुरु केलं. मात्र कोरोनाच्या संकटात काही महाभागांनी संकटात मदत करण्याऐवजी त्रास दिला. अशा प्रकारे त्रास … Read more

नोकरीला लावतो म्हणून पैसे घेऊन केली फसवणूक

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- महसूल विभागात नौकरी लावून देण्याच्या बहाण्याने 18 लाखांची फसवणूक झाल्याचा अकोले मधील प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा असाच एक प्रकार जिल्ह्यात घडला आहे. एकास नेव्ही मध्ये नोकरीला लावतो म्हणून पैसे घेतले व नोकरीला न लावता पैसे परत न केल्यामुळे तिघां विरोधात पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-  नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यात नातेवाईकांकडे आलेल्या १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर अरुण नावाच्या आरोपीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे कि सदर पिडिता डोंगरावर जनावरे ‘चरण्यास गेली असता आरोपी अरुणने तिला मारुन टाकण्याची धमकी देवून तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. पिडीत अल्पवयीन मुलीने पारनेर … Read more

अनाथ झालेल्या बालकांसाठी त्यांच्या नावे पाच लाख रुपयांची मुदत ठेव !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कोरोना आजारामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी त्यांच्या नावे पाच लाख रुपयांची मुदत ठेव सरकार ठेवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी दिली आहे. त्यामुळे पारनेर नगर मतदारसंघातील अनाथ झालेल्या बालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार लंके यांनी केले आहे. कोविड संसर्गामुळे आई … Read more

पारनेर तालुक्यातील खासगी सावकार लंके विरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील बाबाजी गयाजी लंके यांच्याविरोधात बेकायदा खासगी सावकारी केल्याच्या आरोपावरून पारनेर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. निघोज येथील टपाल कर्मचारी नवनाथ लंके यांनी बाबाजी लंके यांच्याकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले. त्यानंतर पुढील १८ महिने दरमहा अडीच हजार रुपये व्याज वसूल करण्यात आले. … Read more

कोरोना नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात ! ‘या’ तालुक्यातील एक मंगल कार्यालय तहसीलदारांनी केले ‘सील’

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथे कोरोना नियमावलीचे पालन न केल्यामुळे नंदनवन मंगल कार्यालयात अचानक भेट देत तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने कारवाई केली यामध्ये मंगल कार्यालय कोरोना कालावधी संपेपर्यंत सील करण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र आता या लाटेचा कमी होत असल्याने … Read more

भाळवणीत कोविड सेंटर होऊ शकते तर, एमपीएससीची अभ्यासिका का नाही?

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील निघोज येथे दुष्काळी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या एमपीएससीच्या अभ्यासिकेसाठी आमदार निलेश लंके यांनी एक कोटीचा निधी आनल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करुन, या अभ्यासिकेसाठी भाळवणी गाव का सुचवले नसल्याचा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळात भाळवणीचे कोविड सेंटर संपुर्ण देशात व परदेशात … Read more

झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेत तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. यातच अनेक कारणे देखील समोर आली आहे. मात्र अनेकदा नैराश्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यातच जिल्ह्यात पुन्हा एका आत्महत्येची नोंद झाली आहे. पारनेर तालुक्यातील वाळवणे येथे दिगंबर शिंदे या तरुणाने झाडाला गळफास लावून … Read more

दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागल्याने आता प्रवास देखील जीवासाठी धोकादायक बनू लागला आहे. यातच चोरी, लुटमारी, दरोडा, खून अशा वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांची संख्या वाढू लागली आहे. मात्र यांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. नुकतेच पारनेर तालुक्यामध्ये रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे … Read more

कोरोनाचा संभाव्य धोका पाहता ‘या’ दोन गावात जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यातच आता काहीशी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली असल्याने अनलॉक करण्यात आला आहे. मात्र संभाव्य कोरोनाचा धोका पाहता पारनेरमध्ये प्रशासनाने बुधवार व शनिवार दोन दिवस जनता कर्फ्युऐवजी फक्त शनिवारी पारनेर तालुका व बुधवारी सुपा येथील सर्व … Read more

17 गुन्ह्यांत आरोपी असलेला सराईत पोलिसांकडून जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- वेगवेगळ्या 17 गुन्ह्यांत आरोपी असलेला एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वनकुटे परिसरात अटक केली. मिलन उर्फ मिलिंद ईश्‍वर भोसले (वय 23 रा. बेलगाव ता. कर्जत, हल्ली रा. वनकुटे ता. पारनेर) असे आरोपीचे नाव असून आरोपीविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पारनेरच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : आमदार नीलेश लंके

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- शहराच्या पाणी योजनेसह विविध विकासकामे मार्गी लावून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आमदार नीलेश लंकेे यांनी सांगितले. पारनेर-जामगाव रस्त्यावरील मणकर्णिका नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपुजन आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार लंके यांनी शहर विकासासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी पक्षाचे … Read more

माजी सरपंचांच्या खुनाचा उलगडा; मुलानेच घेतला वडिलांच्या हत्येचा बदला

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- दोन दिवसांपूवी शेतात काम करत असताना नारायणगव्हानचा माजी सरपंच राजाराम शेळके यांचे हत्या करण्यात आली होती. या खुनाचा उलगडा झाला आहे. तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राजकीय वर्चस्व व आपसातील … Read more

तलवारीचा एकच घाव अन् संग्रामने घेतला वडिलांच्या हत्येचा बदला!

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल संग्राम कांडेकर याच्या मनात होती. राजाराम तुरुंगातून आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने एक धारदार तलवार देखील आणली होती. घटना घडण्यापूर्वी तीन ते चार दिवस संग्राम राजारामच्या मागावर होता. राजारामच्या शेताशेजारील उसामध्ये लपून बसून तो एकटा सापडण्याची संधी … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जिल्ह्यातील ह्या नेत्याचा हल्लाबोल ! तब्बल सतरा वर्षानंतर…

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार सभेत कुकडी प्रकल्पातून एक टीएमसी पाण्यात देण्याचा शब्द पारनेरच्या जनतेला दिला होता. त्यानंतर आता सतरा वर्षानंतर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेरच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण थेट मुख्यमंत्री … Read more

संग्राम कांडेकरने घेतला बापाच्या हत्येचा बदला :राजाराम शेळके हत्याकांडाचे गुढ उकलले !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-    नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याच्या हत्येचे गुढ उकलले असून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने वडीलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे एकट्या संग्राम यानेच तलवारीने सपासप वार करीत राजाराम यास जागीच ठार केल्याची कबुली त्याने शनिवारी स्थानिक … Read more

माजी सरपंचाची हत्या प्रकरणी चौघा आरोपींना पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कांडेकर हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने शिक्षा भोगत असलेल्या राजाराम शेळके व त्याचा मुलगा राहुल वर्षभरापूर्वी पॅरोलवर सुटले होते. शेळके शुक्रवारी शेतामधील काम करून घराकडे निघाला होता. तेवढ्यात अज्ञात मारेकर्‍यांनी धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान शेळके याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना पारनेर … Read more