गोरगरिबांची लूट करणाऱ्यांचा परमेश्‍वरच कार्यक्रम करणार; लंकेचा विरोधकांना टोला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला होता. रुग्णांना उपचारासाठी दवाखाने मिळत नव्हते, कोव्हीड सेंटर फुल होते.

यावेळी देवदूत बनून आलेल्या आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी मध्ये हजार बेड क्षमता असलेले भव्य कोव्हीड सेंटर सुरु केलं. मात्र कोरोनाच्या संकटात काही महाभागांनी संकटात मदत करण्याऐवजी त्रास दिला.

अशा प्रकारे त्रास देणाऱ्या व गोरगरिबांची लूट करणाऱ्यांचा परमेश्‍वरच कार्यक्रम केल्याशिवाय राहाणार नाही,’’ असा टोला आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांना मारला. वडगाव आमली येथे विविध विकासकामांच्या उद्‍घाटनप्रसंगी आमदार लंके बोलत होते.

कोरोनाच्या संकटातही मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मी सतत्याने प्रयत्न करून मोठा निधी आणला आहे.

तालुक्यातील एकही गाव विकासापासून वचित राहणार नाही, असेही लंके म्हणाले. आमदार लंके यांनी भाळवणी येथे उभारलेल्या कोविड सेंटरची देशभरात चर्चा झाली. कोविड रूग्णांसाठी लंके यांनी वाहून घेतले होते.

ते मुक्कामालाच कोविड सेंटरमध्ये थांबायचे. पवार कुटुंबीयांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली होती. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनेही आपले प्रतिनिधी पाठवून कोविड सेंटरच्या उभारणीची माहिती घेतली होती.

दरम्यान कोरोनाच्या दुसर्या लाटेत एकीकडे रुग्णांना उपचारासाठी वणवण भटकावे लागत होते,. याचवेळी आमदार लंके यांनी पुढाकार घेत भव्य कोव्हीड सेंटर उभारून रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मदत केली.