जरे हत्याकांड प्रकरण; सरकारी वकिलांची नेमणूक करा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-रेखा जरे हत्या प्रकरणाचा खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम किंवा ऍड.उमेश यादव यांची नियुक्ती करावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक काेर्टात चालवावा, अशी मागणी रुणाल भाऊसाहेब जरे व फिर्यादीचे वकील ऍड. सचिन पटेकर यांनी जिल्हा पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांच्याकडे केली. निवेदनात म्हटले आहे, जरे हत्या प्रकरणातील … Read more

शेतकऱ्याचा २५ क्विंटल कांदा चोरला पारनेर तालुक्यातील गारखिंडी येथील घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-सध्या शहर व ग्रामीण भागात चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी तर भरदिवसा घरफोड्या, रस्तालुटीच्या घटना घडत आहेत. आता हे कमी झाले म्हणून ग्रामीण भागातील चोरट्यांनी नामी शक्कल लढवली आहे. पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे चोरट्यांनी चक्क २५ क्विंटल कांदे व ताडपत्रीच चोरून नेली आहे. आजवर आपण चोरट्यांनी मौल्यवान … Read more

या गावात चक्क केंद्रीय मंत्र्यांच्या कोनशिलेवर हातोडा !

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाळवणी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन समारंभाच्या कोनशिलेवरच हातोडा टाकण्यात आला.देखभालीचे कारण दाखवीत ही कोनशिला टाकळी ढोकेश्वर येथील टोल नाक्यावर लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग २२२ चे १६१/५७० ते … Read more

नगरसह पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे अट्टल दरोडेखोर जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात धुमाकुळ घालणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, मंचर, लोणीकंद, पाररनेर आणि आळेफाटा परिसरात साथिदारांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (वय२६ रा. निघोज ता.पारनेर जि. अहमदनगर), दिपक उर्फ आशिक आझाद … Read more

खंडोबाच्या यात्रेला कोरोनाचे ग्रहण; प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-गेल्या वर्षांपासून कोरोनाचे संकट जगभर फोफावले आहे. यामुळे गेल्या वर्षात सर्वच सणोत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. तसेच गेल्या वर्षात अनेक धार्मिक कार्यक्रमे रद्द देखील करण्यात आले. यातच पारनेर तालुक्यामधील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान, पिंपळगाव रोठा येथे 28 जानेवारी ते 30 जानेवारीला होणारी यात्रा कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाची … Read more

व्हीआरडीई देशाच्या स्वातंत्र्याची आठवण : संस्था हालवू देणार नाही आमदार नीलेश लंके यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-देशाची फाळणी झाली त्यावेळी सध्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीजवळील चखलाला प्रांतातून व्हिआरडीईचे नगरमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. माझ्या नगर जिल्हयासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतरची ती आठवण आहे. सध्या ही संस्था नगर येथून चेन्नई येथे हालविण्याच्या हालचाली सुरू असून त्यास आपला ठाम विरोध आहे. यासंदर्भात आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेउन … Read more

इंटरनेटचा खेळखंडोबा; कामे रखडली

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- तंत्रज्ञांच्या युगात आजकही सर्वकाही सोपे सोयीस्कर झाले असून यासाठी इंटरनेट ही अत्यावश्यक बाब बनली आहे. मात्र जेव्हा हीच सेवा विस्कळीत होते तेव्हा चांगलीच फजिती होते व कामाचा खोळंबा होतो, अशीच परिस्थिती सध्या पारनेर तालुक्यातील सूप मध्ये घडत आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथील आयडियासह बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क सतत गायब … Read more

पिठाच्या गोळ्यांमध्ये विष घालून कोंबड्याना मारले

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- पारनेर तालुक्यातील कासारे (ता.पारनेर) येथील भिल्ल समाजातील प्रियंका शिवाजी पवार यांचा कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे. शेजारी राहणार्‍या व्यक्तींनी बुधवार दि.6 जानेवारी रोजी पूर्ववैमनस्यातून पिठाच्या गोळ्यात विष टाकून कोंबड्यांना मारले. सदर प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्याने, पीडित कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सदर प्रकरणातील आरोपींवर कारवाई … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पारनेर तालुक्यातील नेते बचावले ! कारची झाली अशी अवस्था …

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-फॉर्च्युनर वाहनास समोरून येणाऱ्या एका कारने कट मारल्यामुळे झालेल्या भिषण अपघातात पारनेर तालुक्यातील मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, शहराध्यक्ष वसिम राजे तसेच संदीप नगरे हे थोडक्यात बचावले. गुरूवारी रात्री नगर – जामखेड रस्त्यावर हा अपघात झाला.ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्‍वभुमिवर मनसेचे पारनेर शहराध्यक्ष वसिम राजे हे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी तसेच कार्यकर्ते संदीप … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आमदार लंकेचे कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. यातच जिल्ह्यातील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी आवाहन केले होते. याला सकरात्मक प्रतिसाद देखील मिळालेला पाहायला मिळाला.पारनेर मतदार संघातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करताना २२२ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध करण्यात आ.निलेश लंके यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री … Read more

हौदात बुडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे एका चार वर्षीय मुलाचा हौदामध्ये बुडुन दुर्देवी असा मृत्यु झाला आहे. शंभो सोनवणे (रा. यवत, तालुका दौंड,जि.पुणे) असे मयत चिमुरड्याचे नाव आहे. दरम्यान याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, शंभो हा त्याचे मामा श्रीकांत सोनवणे (रा.वडझिरे,ता.पारनेर) याचे घरी आई शुभांगीसोबत आला होता. मामाच्या नविन घराचे … Read more

आमदार लंके म्हणतात : हे गाव नसून एक परिवार आहे

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-‘हंगा तिथे दंगा’ अशी हेटाळणी करून तालुक्यातील अधिकारी तसेच राजकिय पुढाऱ्यांकडूनही हंग्याच्या नागरीकांना वेगळी वागणूक दिली जायची. सन २०१० मध्ये गावातील ५० टक्के तंटे एकत्र बसून मिटविले काही न्यायालयात मिटविले. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व ग्रामस्थांनीच एकत्र बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे श्रेय सर्व ग्रमस्थांचे आहे, … Read more

गळ्याला कोयता लावून ८० हजारांचे दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- घराचा कडी कोयंडा तोडून घरातील सदस्याच्या गळ्याला कोयता लावून घरातील ७९ हजारांचे सोन्याचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील अमोल सुखदेव शेळके यांच्या घराचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने कशाने तरी उचकाटून घरात प्रवेश केला. … Read more

‘दांडी बहाद्दर’ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना नोटिसा

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून 15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान पारनेर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयामध्ये आज अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी अनुपस्थित राहिलेल्या 112 कर्मचार्‍यांना नोटिसा पाठवून म्हणणे सादर करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर … Read more

आमदार लंकेच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात सगळीकडेच विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारांनी अर्ज भरतानाच शक्‍तिप्रदर्शन करून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पारनेर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या अर्जांच्या छाननीमध्ये परस्परविरोधी गटांनी आरोप-प्रत्यारोप केल्याने उशिरापर्यंत छाननीची प्रक्रिया सुरू होती. छाननी प्रक्रियेत १२० अर्ज … Read more

अतिक्रमणामुळे बसस्थानकाचा कोंडलेला श्वास मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- अतिक्रमणाच्या समस्येमुळे नागरिकंना नेहमीच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. अनेकदा कारवाई करून देखील अतिक्रमण धारक सुधारायला तयार नाही. मात्र नुकतेच पारनेर बसस्थानक परिसरातील तसेच तहसील कार्यालयाशेजारील अतिक्रमणांवर महसूल विभागाने कारवाई केली. त्यामुळे अनेक दिवसानंतर बस स्थानक परिसराचा कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे. पारनेर तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी … Read more

88 ग्रामपंचायतींसाठी सव्वा दोन हजारांवर अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावू लागला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काल अखेरचा दिवस होता, यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान पारनेर तालुक्यातील मुदत संपणार्‍या 88 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी … Read more

आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील नागरिक ‘या’ समस्येने हैराण

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने, गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे झाले आहेत. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. हा कचरा अनेक दिवसांपासून साठल्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे टाकळीकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीकडे … Read more