अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळल्या ‘त्या’अवस्थेतील मृतदेह, परिसरात खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  पारनेर तालुक्यातील निघोज कुंड पर्यटनक्षेत्र परिसरात कुकडी नदीपात्रामध्ये मोठया डब्यामध्ये मृतदेह आढळून आला असून तो महिलेचा असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुणे जिल्हयातून वाहत येणा-या कुकडी नदीवर निघोज शिवारात कुंड परिसरात जगविख्यात रांजणखळगे आहेत. याच परिसरातील कोल्हापर पद्धतीच्या बंधा-यावरून वाहत येत. पुणे जिल्हयातील टाकळीहाजीकडे जाणा-या जुन्या … Read more

पारनेर तालुक्यातील नेत्यांवर गुन्हे दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील विविध पक्षांचे नेते २०० ते ५०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या मोठ्या राजकीय सभा घेत असून यामुळे जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमाबंदी आदेशाचे व कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे या कायद्याचे उल्लंघन करणे व कोव्हिड सारख्या भयंकर आजाराचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या विविध राजकीय … Read more

आमदार निलेश लंके यांचा खासदार सुजय विखेंवर पलटवार

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- करोना रोखण्यासाठी मी जिल्ह्यात फिरत आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्या एकट्यावरच नव्हे तर आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी खासदार सुजय विखे यांनी केली होती. यावरून आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार केला आहे. ‘मी काम करणारा माणूस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अळकुटी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक साहेबराव नाना गोरडे वय 52 यांचे मंगळवारी सकाळी 11. 30 वाजण्याच्या सुमारास अळकुटी शिवारात अपघाती निधन झाले. प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार असल्यामुळे गोरडे हे त्यांचे गाव लोणीमावळा येथून अळकुटी येथे शाळेत गेले होते. तेथील कामकाज आटोपून ते पुन्हा लोणीमावळयाकडे दुचाकीवरून निघाले … Read more

पारनेर तालुक्यात वाढले कोरोना पेशंट; आरोग्य अधिकारी सांगतात `हे` कारण

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. ऑगस्ट महिन्यापासून नगर जिल्ह्यात कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने वाढत आहेत. यामध्ये पारनेर तालुक्यात पाच महिन्यात सुमारे 131 गावांपैकी 46 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. मात्र, कोरोनावर मात करून मोठ्या संख्येने पेशंट सुखरूप घरी परतत असले तरी मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. … Read more

सातत्यातने लॉकडाऊनची मागणी करणाऱ्या खा.विखे यांच्या ‘त्या’ बैठकीत सोशल डिस्टनसिंगचे तीन-तेरा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-के.के. रेंज संदर्भात दिल्लीत सरंक्षणमंत्री आणि लष्कर प्रमुख यांच्यासोबत चर्चा केली असून त्याचा तपशील माजी आ. शिवाजीराव कर्डिले आणि मी बाधित तालुक्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांना देणार असल्याचे खा.डॉ. विखे यांनी मागे म्हटले होते. आता याच अनुशंघाने पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे विखे यांनी शेतकऱ्यांची बैठक घेतली. ‘के.के.रेंज प्रश्नी शेतकऱ्यांना … Read more

के के रेंज बाबत खासदार डॉ. सुजय विखेंनी घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  के के रेंज मधील अधिग्रहित होणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांना त्यांची भरपाईची रक्कम देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मुंबई व पुणे येथील भूखंड दिले होते. मात्र, या भूखंडाची राज्य शासनाने विक्री करून त्यातून मिळालेल्या रक्कमेची इतर कामांसाठीच विल्हेवाट लावली, त्यामुळे के.के.रेंजबाबत राज्य शासन घेत असलेली दुटप्पी भूमिका. खासदार डॉ. सुजय … Read more

पर्यटनासाठी `इथे` गेलात तर होणार गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-   जिल्ह्यातील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असलेले मांडओहोळ धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पारनेर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जमावबंदी लागू केली आहे. यामुळे धरण परिसरात पर्यटकांना नो … Read more

पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण ओव्हरफ्लो,शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- टंचाईच्या काळात तालुक्यातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरणारा मांडओहोळ मध्यम प्रकल्प बुधवारी पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला. सलग दुसऱ्या वर्षी मांडओहोळ धरण भरल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांसह तालुकावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मांडओहोळ प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे. यावर्षी पळसपूर, नांदुरपठार, सावरगाव … Read more

के. के. रेंजच्या प्रश्नाबाबत नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- के. के. रेंजच्या विस्तारीकरणाबाबत जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन तीव्र लढा उभा करावा. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी अग्रभागी राहीन, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी, नगर, पारनेरच्या शेतकऱ्यांना सांगितले. के. के. रेंज प्रश्नी भूमिका मांडण्यासाठी बुधवारी कृषी विद्यापीठात आयोजित पत्रकार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची आत्महत्या,ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याच परिसरामध्ये चालू होते ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथील खानेबावस्ती येथे एका ३१ वर्षीय महिलेने राहत असलेल्या कोपीमध्ये बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यशोदा काशिनाथ मधे वय ३१ यांनी स्कार्पने कोपीचे आड्याचे बांबूला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला माहिती भाऊसाहेब यादव याने … Read more

चिमुरडीला पेटवणार्‍या ‘त्या’ नराधमांपैकी एकास पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील सुप्या जवळील वाघुंडे शिवारातील एका आदिवासी समाजातील महिलेवर काही नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार केला. तिने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर केस मागे घे असा दम देत तिच्या 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर एकाने पेट्रोल फेकले व तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटणा गुरूवारी (दि. 13) सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास … Read more

बिग ब्रेकिंग : आता लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-  सर्वांच्या बरोबरीने सरकार सक्षमपणे काम करत आहोत. रुग्णवाहिका मोफत ठेवल्या आहेत, स्त्राव तपासणी किंमती कमी केल्या आहेत. अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अधिकार देण्यात आले आहेत. लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल. आता लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. टप्प्याटप्याने सगळे क्षेत्र सुरू करणार आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी … Read more

पारनेरच्या भूमिपुत्राला पोलीस दलातील सर्वोच्च सन्मान

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गृह विभागाने पोलीस शौर्य, गुणवत्तापूर्वक सेवा आणि राष्ट्रपती पदके जाहीर केली आहेत. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ५८ पदके पटकावली आहेत. पोलीस दलातील सर्वोच्च सन्मानाचे समजले जाणारे राष्ट्रपती पदक पारनेरच्या भूमिपुत्राला बहाल करण्यात आहे . तालुक्यातील लोणी हवेली येथील भूमिपुत्र व सध्या नाशिक येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक … Read more

तहसिलदार ज्योती देवरे यांची कोरोना’वर मात !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांना कोरोनाची बाधा झाली होती. स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जाऊन रॅपिड चाचणी केली होती. तो अहवाल कोरोना पॉझिटिव आला होता. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांनी प्रकृती ठणठणीत आहे. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्या लवकरच कामावर रुजू होणार आहेत. काही दिवसापूर्वी कोरोना सदृश्य लक्षणे असल्याने देवरे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बलात्काराची केस मागे घे म्हणत मुलीस पेट्रोल टाकून पेटविले !

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-  बलात्काराची केस मागे घे म्हणत एका 26 वर्षीय तरुणीच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटविल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात काल सकाळी दहा वाजता घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात एक आदिवासी कुटुंब राहते. तेथील एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला … Read more

पारनेरची चिंता वाढली; एका दिवसात कोरोनाचे ‘इतके’ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. काल (शुक्रवार) तालुक्यातील १५ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा साडेचारशेच्या जवळ पोहोचला आहे. या १५ रुग्णामध्ये ढोकी ३, राळेगण … Read more

अहमदनगरच्या ‘त्या’जमिनीचे कदापिही हस्तांतरण होऊ देणार नाही; के.के.रेंज प्रश्नी शरद पवार मैदानात

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली … Read more