बापरे!हे संपूर्ण गावच कोरोनाच्या दहशतीखाली

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : तीन दिवसांपूर्वी भाळवणी येथील रहिवाशी असलेला जिल्हा परिषद कर्मचारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळल्याने तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांनी भाळवणी गाव तीन दिवस पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तर ग्रामपंचायतीच्या परिसरातील शंभर मीटरचा परिसर कॅन्टेन्मेंट झोन घोषित केला होता. व ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ग्रामपंचायतीचे पाच कर्मचारी व इतर तीन … Read more

अल्पवयीन मुलगी बेपत्ता,अपहरण केल्याचा संशय

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :पारनेर तालुक्यातील निघोज येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे. ११ जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास ही मुलगी बेपत्ता झाली. ती न सापडल्याने रविवारी दुपारी मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा … Read more

पारनेर तालुक्यात उपसरपंचासह पाच जुगाऱ्यांना अटक

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथे पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत माजी उपसरपंच सुभाष गाडीलकर याच्यासह पाच जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य तसेच ११ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. गाडीलगाव येथे गेल्या काही दिवसांपासून पत्त्यांचा हार जितचा खेळ खेळला जात असल्याच्या तक्रारी होत्या. पोलिस या जुगाऱ्यांवर पाळत ठेवून … Read more

‘पक्षांतर करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांनी काय दिवे लावले?’

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  ऐन निवडणुकीच्या तोंडावर पारनेरच्या नगरसेवकांनी पक्षांतरन केल्याने जे राजकीय नाट्य झाले ते महाराष्ट्राने अनुभवले. अवघ्या ५ दिवसात हे नगरसेवक राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेमध्ये आले. या नगरसेवकांनी विकासाचा मुद्दा ठेऊन पक्षांतरण केले असे म्हटले जाते. हाच धागा पकडत माजी उपनगरध्यक्ष चंद्रकांत चेडे व उद्योजक अर्जुन भालेकर यांनी त्यांच्यावर आरोप … Read more

अभिमानास्पद! पारनेर तालुक्यातील नारीशक्ती कोविड योद्धे म्हणून कार्यरत

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या परिस्थितीशी लढा देण्यासाठी पोलीस यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, शिक्षक, शासकीय यंत्रणेतील इतर घटक हे सर्वजण देशसेवा म्हणून कोविड योद्धे म्हणून कार्यरत आहेत. यात पारनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील लेकी व … Read more

रविंद्र कळमकर पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील रहिवासी रविंद्र भानुदास कळमकर यांची पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. 2009 मध्ये रवींद्र कळमकर यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती. त्यांची नेमणूक मुंबई येथे पार्कसाईट पोलिस ठाणे विक्रोली येथे झाली. नंतर त्यांनी माहिम, बांद्रा पोलिस स्टेशन … Read more

पारनेरच्या ‘त्या’ नगरसेवकांसह महिला पदाधिकारी क्वारंटाईन

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :पारनेरच्या नगरसेवकांचे पक्षांतरनाचे सत्तानाट्य महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झाले. परंतु आता या नगरसेवकांना व शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुखांना सात दिवस होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. कारण यांनी कोरोनाच्या काळात प्रवास केला असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. पक्षांतरनाच्या राजकीय नाट्यवेळी या सर्वांनी मुंबई येथे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. … Read more

जि. प. कर्मचारी पाॅझिटिव्ह, ‘हे’ गाव तीन दिवस बंद !

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :   पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील रहिवासी असलेला नगर जिल्हा परिषदेतील कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी भाळवणी गाव तीन दिवस पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले. रुग्णाच्या घरापासून, तसेच ग्रामपंचायत कार्यालयापासून शंभर मीटरचा परिसर १४ दिवसांसाठी कन्टेन्मेंट झोन करण्यात आला. कातळवेढे येथील साठ वर्षांच्या व्यक्तीलाही बाधा झाल्याचे उघड … Read more

पारनेरचे आमदार निलेश लंके तोंडावर पडले !

Nilesh Lanke

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमधील ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर जे सत्तानाट्य घडले ते महाराष्ट्राने पहिले. त्यानंतर लगेच ५ दिवसांत ते नगरसेवक पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आणि याच स्पष्टीकरणामुळे आमदार निलेश लंके तोंडावर … Read more

माजी आमदार विजय औटींची शिवसेनेतून हकालपट्टी करा

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  गेल्या वर्षी आमदार विजय औटींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळावा संपल्यानंतर ठाकरेंच्या वाहनांच्या ताफ्यावर औटी समर्थकांनीच दगडफेक केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या व पुन्हा शिवबंधनात अडकलेल्या पाच नगरसेवकांसह महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा बोरूडेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर औटींनी पक्षाकडे पाठ फिरवली. पक्ष संघटनेचा उपयोग … Read more

पारनेर नगरसेवकांबद्दल अजित पवारांचा गौप्यस्फोट ! म्हणाले निलेश लंके यांनी….

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : पारनेरच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली,या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. पक्षप्रवेशानंतर ते नगरसेवक सेनेचे असल्याचं समजलं, असे स्पष्टीकरणच अजितदादांनी दिले आहे. अजित पवार यांना आज पारनेरमधील पाच नगरसेवकांच्या प्रवेशासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. “मी त्या दिवशी बारामतीत होतो. गर्दीत मी सगळ्यांना … Read more

‘त्या’ नगरसेवकांच्या घरवापसीवेळी माजी आ. औटी यांना ‘मातोश्री’वरून निरोपच नाही ?

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :पारनेर नगरपंचायतीतील ‘त्या’ पाच नगरसेवकांनी पुन्हा बुधवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांनी पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले. यापुढे हे सर्व नगरसेवक आ. लंके यांच्याच नेतृत्वाखाली काम करतील. त्याचबरोबर पारनेर तालुक्यामधील महाविकास आघाडीची धुरा सुद्धा त्यांच्यावरच असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आ. निलेश लंके यांच्या … Read more

पारनेर मधील महाविकास आघाडीची धुरा आमदार निलेश लंके यांच्याकडेच !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   पारनेर नगरपंचायतीतील त्या पाच नगरसेवकांनी पुन्हा बुधवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांनी पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले. यापुढे हे सर्व नगरसेवक आ. लंके यांच्याच नेतृत्वाखाली काम करतील. त्याचबरोबर पारनेर तालुक्यामधील महाविकास आघाडीची धुरा सुद्धा त्यांच्यावरच असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आ. निलेश लंके … Read more

पारनेरचे ‘ते’ नगरसेवक पुन्हा येणार शिवसेनेत ; झाले असे काही की…  

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  पारनेरमधील ५ नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर खूप राजकीय हालचालींना वेग आला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता या गेलेल्या शिवसेना नगरसेवकांची घरवापसी होणार आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे. राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक आता … Read more

‘त्या’ फोडाफोडीमध्ये नेमका कुणाचा हात ? पार्थ पवार यांच्या पारनेर दौऱ्यामुळे…

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने असे केल्याने हा राज्यभर विषय गाजला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही गोष्ट रुचली नव्हती. आमचे नगरसेवक परत पाठवा असा निरोपही उद्धव ठाकरेंचे स्वीय … Read more

शरद पवार म्हणाले पारनेरमध्ये नगरसेवक फोडल्याचा मुद्दा….

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  सध्या राज्यात पारनेर मधील नगरसेवकांचा शिवसेनेतून राष्टवादी कॉंग्रेस मध्ये केलेला प्रवेश चांगलाच गाजत आहे, याबबत शरद पवार यांनी आपले मत मांडले आहे. पारनेर हा फार लहान प्रश्न आहे. तो काही राज्यस्तरावर परिणाम करणार प्रश्न नाही, असं विधान शरद पवार यांनी पुण्यात केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव … Read more

शिवसेनेत गेलेले ‘ते’ नगरसेवक म्हणतात औटींनी आम्हाला पाठबळ दिले नाही…

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावरून चांगलेच राजकीय रण तापले. आता यातील काही नगरसेवकांनी माजी आमदार विजय औटी यांवर निशाणा साधला आहे. नगरसेवक किसन गंधाडे म्हणतात, आम्ही गेली अनेक वर्ष माजी आमदार विजय औटी यांच्या बरोबर … Read more

पारनेरमधील राष्ट्रवादीच्या ‘त्या’ खेळीचा शिवसेनेने काढला ‘असा’ वचपा?

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने असे केल्याने हा राज्यभर विषय गाजला. या प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शिवसेनेने कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका देऊन वचपा काढला. शिवसेनेने कल्याण … Read more