अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा इन्स्टिट्यूटमध्ये अवघ्या पाच सेकंदात कळणार कोरोना रुग्णाचा रिपोर्ट !

लोणी : – कोरोनाचे टेस्टसाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारा मोठा खर्च लक्षात घेऊन केवळ एक्स रे आणि रक्त चाचणीच्या साह्याने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘चे तंत्रज्ञानाचा वापर करुन काही सेकंदात रग्णांची वर्गवारी कोरोनाबाधित, कोरोना संशयीत व इतर हे शोधण्याची ही प्रणाली प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस आणि ग्रेट ब्रिटन स्थित एआय फाॅर वर्ल्ड या संस्थेशी परस्पर सहकार्य … Read more

राज्‍यात कोरोना संकट, माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24  :- राज्‍यात कोरोना संकटाचे सावट गडत होत असतांना जनतेला दिलासा देण्‍यासाठी निर्णय प्रक्रीया अधिक गतीमान होण्‍याची आवश्‍यकता असल्‍याने राज्‍य सरकारने विविध क्षेत्रातील अनुभव संपन्‍न लोकांचा समावेश असलेली सर्वपक्षीय उच्‍चाधिकार समिती स्‍थापन करुन राज्‍याच्‍या हितासाठी सकारात्‍मक पाऊल टाकावे, अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात आ.विखे पाटील म्‍हणाले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा तालुका झाला ‘कोरोनामुक्त’

अहमदनगर :- राहात्यात आढळलेल्या रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुका कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली. तथापि, लॉकडाऊनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंडोनेशियातील व्यक्ती कोल्हार, भगवतीपूर, लोणी खुर्द व बुद्रूक, हसनापूर, दाढ बुद्रूक, पाथरे व हनंमतगाव या सात गावांतील पंचवीस व्यक्तींच्या संपर्कात आला होता. … Read more

डॉक्टर्स फोनद्वारे देणार मोफत वैद्यकीय सल्ला

राहाता :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये किरकोळ व साध्या आजारांसाठी रुग्णांना प्राथमिक पातळीवरील औषधोपचार व वैद्यकीय सल्ला त्वरित मिळावा तसेच रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राहाता तालुक्यातील श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या सहा डॉक्टरांच्या टीमने पुढाकार घेतला आहे. फोनद्वारे देण्यात येणाऱ्या मोफत वैद्यकीय सेवेचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या डॉक्टरांच्या वतीने डॉ.स्वाधिन गाडेकर यांनी … Read more

राज्‍यातील शेतक-यांच्‍या प्रश्‍नांसदर्भात माजी मंत्री आ.विखे पाटील यांचे मुख्‍यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर Live24 :-  कोरोना संकटावर मात करताना राज्‍य सरकारकडुन शेतकरी जाणीवपुर्वक दुर्लक्षित केला गेला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करतानाच अगामी खरीप हंगाम लक्षात घेवून शेतक-यांच्‍या कर्जाचे पुनर्गठन करुन बी-बियाणे, औषधे आणि खतांसाठी शेतक-यांना अनुदान द्यावे, फळ पिकांबरोबरच भाजीपाल्‍यावर प्रक्रीया उद्योगांना अनुदान देण्‍याबरोबरच शेतीमालाच्‍या विक्रीसाठी जिल्‍ह्यांच्‍या सिमा मोकळ्या कराव्‍यात आणि ऊस तोडणी मजुरांनाही त्‍यांच्‍या गावी … Read more

वापरलेले हॅन्डग्लोज रस्त्यावर ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राहाता :- तालुक्यातील लोणी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्कारंटाईनसाठी शिर्डी येथील साईआश्रम फेज 2 मध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याठिकाणी वापरून फेकून दिलेले हॅन्ड ग्लोज बाजूला असलेल्या रस्त्यावर आढळून आल्याने आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा प्रकारचे कृत्य करून रोगाला आमंत्रण देण्यात येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या … Read more

वाधवान परिवाराला कोणत्‍या तरी ‘बड्या नेत्‍याच्‍या’ सांगण्‍यावरुनच गृह विभागाने पत्र दिले !

अहमदनगर :-  खंडाळा ते महाबळेश्‍वर प्रवास करण्‍यासाठी वाधवान परिवाराला कोणत्‍या तरी ‘बड्या नेत्‍याच्‍या’ सांगण्‍यावरुनच गृह विभागाने पत्र दिले असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. पत्र देण्‍याचे धाडस एकटा गृह विभागाचा सचिव करु शकत नाही. त्‍यामुळे या पत्रामागील ‘बोलविता धनी कोण’? याची सत्‍यता मुख्‍यमंत्र्यांनीच जनतेसमोर आणावी अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. गावपातळीवर विज … Read more

ब्रेकिंग न्यूज : कार पेटवून देत ठाकरे कुटुंबियांना जीव मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशभरात लाॅकडाउन असताना राहाता तालुक्यातील निमगाव कोर्राळे गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब काळु ठाकरे यांच्या घरासमोर उभी केलेली स्विप्ट डिझायर ही चार चाकी गाडी उभी असताना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पेटवून कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला यात गाडीचे मोठे नुकसान झाल्यामुळे निमगाव कोर्राळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे याबाबत … Read more

कारण प्रवरेचा पॅटर्नचं वेगळा आहे …

जेव्हा जगातचं ‘कोरोना १९ ‘ मुळे आरोग्य सुविधांचे प्रश्न निर्माण होतात. जेव्हा सगळं जगचं धास्तावलेले असतं, जेव्हा आधुनिक मंदिरे समजली जाणारी खाजगी किंवा ट्रस्टची रुग्णालये रुग्ण सेवा कमी अधिक प्रमाणात देत नाही, तेव्हा एक उत्तर सकारात्मक पणे ग्रामीण भागात समोर दिसते ….ते म्हणजे ‘प्रवरा पॅटर्न‘ … संकट जेव्हा अधिक गडद होतातं …तेव्हा झाडांनी मुळांच्या साह्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संशयित तरुणी रुग्णालयात दाखल

File Photo

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पनवेल येथून आलेल्या राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील कोरोनाचे संशयीत असलेली एक तरुणीस काल नगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. पुणतांबा येथील ही तरुणी पनवेल येथे कामास होती. ती काल रात्री एका टँकरने आली असल्याचे तिने सांगितले. मात्र कोणत्या टँकरने आली … Read more

महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत ३०जून पर्यंत वाढवा! आ.विखे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना व्हायरसच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची तसेच पंजाबराव देशमुख व्याजमाफी योजनेची मुदत ३०जून २०२० पर्यत वाढवावी आशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोना व्हायरसच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत. … Read more

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आ.विखे पाटील दोन महीन्यांचे मानधन देणार!

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार म्हणून मिळणारे दोन महीन्यांचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.लोकप्रतिनिधी म्हणून निर्णय घेणारे पहीले आमदार ठरले आहेत. यासंदर्भात बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की,कोरोना सारख्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजूटीने लढाई करण्याची वेळ आली आहे.याची सुरूवात स्वतःपासून करावी म्हणून मिळणारे मानधन … Read more

लाॅकडाऊनच्या निर्णयाने भयभीत होवू नका, आपत्तीला धैर्याने सामोरे जावू- आ.विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना या जागतिक आपतीची वाढती व्याप्ती लक्षात घेवून राज्य सरकरने  महाराष्ट्र  लाॅकडाऊन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने भयभीत होवू नका.सरकार प्रशासन आणि जनतेच्या   सहकार्यानेच  या राष्ट्रीय आपतीचा धैर्याने मुकाबला करण्यासाठी जागृकता दाखवावी असे आवाहन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहानाला सर्वच समाज घटकांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या नदीचा झाला ‘नाला’ शेतकरी म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह24 टीम  / राहाता : शहरातील कात नदीवर अतिक्रमण झाले असून, ३०० फूट रुंदीच्या कात नदीचा नाला झाला आहे. सद्यस्थितीत ही कात नदी काही ठिकाणी फक्त चाळीस ते पन्नास फूट रुंदीची उरली आहे. कात नदीची तातडीने मोजणी करावी, अशी मागणी राहाता येथील शेतकरी बांधवांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब … Read more

पिसाळलेल्या कुत्र्याचा तीन बालकांना चावा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राहाता तालुक्यातील चितळी येथे शाळकरी मुलांना पिसाळलेल्या कुत्र्र्याने चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. काल गुरुवारी (दि. २७) खेळणाऱ्या मुलांमध्ये अचानक येऊन तिघांना या कुत्र्याने चावा घेतला. याता शिवराज गणेश चौधरी (वय ५), संकेत संदीप भोसले (वय १४) व तिसऱ्याचे नाव समजू शकले नाही. या चिमुरड्यांना चावा घेतल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या आणखी दोन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील तिघांचा दुर्देवी मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. गुजरातमधील कुबेर या ठिकाणाहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासादरम्यान नर्मदा शहरानजीक कार-ट्रकच्या भीषण अपघातात राहाता नगर जिल्ह्यातील तिघांचा मृतु झाला. नंदकिशोर संपत निर्मळ (वय २८) गोरक्षनाथ एकनाथ घोरपडे (वय ६३, दोघेही रा.पिंपरी निर्मळ ता.राहाता), प्रवीण सारंगधर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून मृतदेह जाळल्यानंतर आरोपी पोलिसात हजर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकुरखे गावात घडली आहे.चारीत्र्याच्या संशयावरून पतीने त्याच्या पत्नीचा निर्घृणपणे हत्या करत तिचा मृतदेह जाळला. याबाबत सविस्तर माहीती अशी की सुनील जनार्दन लेंडे हा एकुरखा शिवारात राहायचा त्याचे 2008 साली छाया हिच्यासोबत लग्न झाले होते त्यांना तीन मुले आहेत. सुनील हा … Read more

राज्‍यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्या. – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक जिल्‍ह्यातील साकुर येथे तमाशा कलावंतांवर झालेला हल्‍ला पुरोगामी महाराष्‍ट्राच्‍या दृष्‍टीने निंदनिय असुन, या घटनेचे गांभिर्य ओळखुन राज्‍य सरकारने दोषी व्‍यक्तिं विरोधातील खटला जलदगती न्‍यायालयात चालवावा आणि राज्‍यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्यावे अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात मुख्‍यमंत्र्यांना आ.विखे पाटील यांनी पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, नाशिक जिल्‍ह्यातील … Read more