मालकाला अंधारात ठेवून कामगारांनीच 50 लाखांच्या खतांची परपस्पर केली विक्री

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- राहाता तालुक्यातील एका कंपनीच्या गोडाऊनमधून मॅनेजर व तीन कामगारांनी कंपनीच्या मालकाला अंधारात ठेवत परस्पर 50 लाख रुपये किंमतीच्या खतांची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहाता पोलिसांनी कंपनीच्या मॅनेजर व तीन कामगार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कंपनीचे मालक … Read more

लोणी खुर्द येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- जिल्ह्यात पुन्हा गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याचा वावर हा जास्त प्रमाणात आढळून येत आहे. या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याची संख्या वाढली आहे. बिबट्याचे पाळीव प्राण्यावरील आणि माणसावरील हल्ले वाढल्याने, या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच एक दिलासादायक बाब म्हणजे राहाता तालुक्यातील … Read more

‘त्याने’ डोळ्यादेखत शेळीचा पडला फडशा!

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- बिबट्याने शेळीवर हल्ला करून उसाच्या शेतात ओढत नेऊन फस्त केल्याची घटना राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथील खोबरे वस्तीवर घडली. याबाबतची माहिती अशी की राहता तालुक्यातील बाभळेश्वर गावामधील शेतकरी दिलीप खोबरे यांची शेळी बिबट्याने रात्रीच्या वेळी हल्ला करून ओढत नेऊन ऊसाच्या शेतात फस्त केली असून यामुळे बाभळेश्वर येथील खोबरे वस्ती येथे … Read more

राहाता तालुक्यातील गावेही विकासाच्या वाटेवर : आ. काळे

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जो न्याय कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला जाईल. तोच न्याय राहाता तालुक्यातील जी गावे कोपरगाव मतदार संघाला जोडली आहेत, त्या गावांना देणार असून ही अकरा गावे देखील विकासाच्या रडारवर आहेत, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील नपावाडी येथे एका कार्यक्रम प्रसंगी … Read more

घरातून न सांगता निघून गेलेले गुरुजी झाले बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- राहाता येथील बागडे वस्तीवरून एक शिक्षक काही एक न सांगता घरातून बेपत्ता झाले आहेत. तानाजी छबुराव गमे असे या शिक्षकाचे नाव असून याप्रकरणी त्यांच्या पत्नी प्रतिभा तानाजी गमे यांनी या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात हरवल्याची खबर दिली आहे. दरम्यान राहाता पोलिसांनी याबाबत मिसींग केस दाखल केले आहे. याबाबत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीलगतच्या गावातील नागरिकांनी…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-  जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लगतच्या नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात 6,310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असल्याने नदीच्या विसर्गा मध्ये … Read more

केंद्र सरकारने देशात कोरोनाच वाढविण्याचे काम केले? महसूल मंत्री थोरात यांची भाजपवर कडवी टीका

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- केंद्र सरकारने देशात कोरोनाच संकट वाढविण्याचे काम केलं. भाजप लोकहिताचा विचार करत नाही याउलट काँग्रेस हा मानवतावादी, लोकहित व लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. जातपात धर्म गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करणारा पक्ष आहे. काँग्रेसला अनेक वेळा खूप कठीण प्रसंग आलेत परंतु त्या कठीण प्रसंगातून काँग्रेस पुन्हा सक्षमपणे … Read more

हे काय भलतंच; त्यांनी केला चक्क बिबट्यावर हल्ला! तो’ झाडावर चढला अन्यथा..?

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- नुसते त्याचे नाव जरी ऐकले तरी भल्या भल्याची भीतीने गाळण उडते. मोठ मोठ्या प्राण्यांची सहज शिकार करणाऱ्या बिबट्यावर चक्क रानडुकरांनी हल्ला केला. यावेळी बिबट्या नारळाच्या झाडावर चढला अन्यथा त्याचीच शिकार झाली असती. ही घटना राहाता तालुक्यातील राजुरी येथे घडली. या बाबतची माहिती अशी की राहाता तालुक्यातील राजुरी येथे … Read more

‘तो’ भुयारी पूल पावसाळ्यात ठरतोय नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :-  चितळी रेल्वे स्टेशन, जळगाव रेल्वे चौकी तसेच धनगरवाडी रेल्वे चौकीसह दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर ज्या ज्या ठिकाणी भुयारी पुलाची कामे पूर्ण झाली होती तेथे पावसाळ्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यातच आता राहाता तालुक्यातील जळगाव जवळील रेल्वे चौकीजवळ असलेल्या भुयारी पुलाखाली पाणी साचल्यामुळे या पुलाखालून जळगाव-गोंडेगाव … Read more

साखर झोप मोडून भल्या पहाटे लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांचा लांबच लांब रांगा

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :-  राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनतेने अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे अनेक नागरिक शक्य तितक्या लवकर जाऊन लसीकरण करुन घेत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांकडून पहाटपासून गर्दी केल्याचे दिसून येऊ लागले आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय ५० लाख रुपयांचा पुरस्कार !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- पंचतत्वाचे संवर्धन व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान २०२०-२१ अंतर्गत लोणी ग्रामपंचायतीने मिळवलेल्या राज्‍यस्‍तरीय ५० लाख रुपयांच्या व्दितीय पुरस्‍काराबद्दल आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्‍य साधून मुख्‍यमंत्री ना.उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्‍या हस्‍तें … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. चंद्रसेन तोडकर(वय-५१) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. चंद्रसेन यांनी प्रवरानगर येथील आहेर वस्तीवरील शेतातील झाडाला गळफास लावून घेतला. सकाळी ९.३० च्या सुमारास हि घटना घडली. … Read more

अत्यंत धक्कादायक : भाजी व भेळ विक्रेतेच निघाले कोरोना पॉझिटिव्ह,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राहाता शहरामध्ये भाजी व भेळ विक्रेते या दोन व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीमध्ये दिलासादायक वृत्त मागील काही दिवसांमध्ये येत होते. हे असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राहाता शहरामध्ये भाजी व भेळ विक्रेते या दोन व्यक्तींचा कोरोना … Read more

पाच रुपयांचे अनुदान तातडीने बॅक खात्यात वर्ग करा आ.विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून पाच रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने वर्ग करा आशी मागणी भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. राज्यात यापुर्वी दूध उत्पादकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केली.मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात यासंदर्भात पाच रुपये अनुदानाच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करूनही याची दखल … Read more

मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची या वर्षांची शैक्षणिक फी महाविकास आघाडी सरकारने माफ करावी

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने विद्यार्थ्यांची या वर्षांची शैक्षणिक फी माफ करावी आशी मागणी भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याबाबत सविस्तर पत्र दिले असून आरक्षणाच्या कारणाने चिंताग्रस्त बनलेल्या … Read more

अवैध वाळू तस्करीच्या वाहनाला ग्रामस्थांनी लावला ब्रेक

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- अवैध वाळू तस्करी करणारे वाहन संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील सरपंच सतीश जोशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून तलाठी व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दाढ खुर्दचे सरपंच सतीष जोशी यांनी फोन करून ग्रामस्थांच्या मदतीने … Read more

पुन्हा एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. तसेच भक्ष्याचा शोधात बिबट्याची मानवीवस्तीकडे वाटचाल होऊ लागली आहे. यातच अनेकदा दुर्घटनेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची देखील घटना घडली आहे. यातच राहाता तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात एका उसाचे शेतात मृत बिबट्या आढळून आला. हनुमंतगाव परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय असून मागील आठवड्यातच रस्ता … Read more

‘तो’ तरुण थेट स्वयंपाक घुसला अन्…

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- पतीच्या गैरहजेरीत एका तरुणाने थेट स्वयंपाक घरात येऊन महिलेचा हात धरला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग करून डोक्यात पाठीमागील बाजूने मारहाण केली. ही घटना पुणतांबा येथे घडली असून, याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, पुणतांबा येथे … Read more