उसने पैसे देण्या घेण्याच्या वादातून दोन गटात तुफान राडा

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- उसने पैसे देण्याघेण्याच्या कारणातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत जखमी करण्यात आले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे घडला आहे. या मारहाणीत शापिनखान शौकत पठान रा. उपासनी गल्ली संगमनेर हा गंभीर जखमी झाला आहे. … Read more

चारचाकीतून दारूची अवैध वाहतूक; पोलिसांनी केला पर्दाफाश

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी पिकअप पकडण्यात आली आहे. दरम्यान हि कारवाई पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी … Read more

संरक्षक जाळीमध्ये घुसून बिबट्याने बकरे आणि कोंबड्या केल्या फस्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच संगमनेर … Read more

कत्तलखान्याचे केंद्रबिंदू बनलेल्या संगमनेरात 300 किलो मांस जप्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. नुकतेच संगमनेरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या पत्र्याच्या वाड्यात … Read more

तरुणाचा अपघाती मृत्यू,शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील दीपक साहेबराव भुसाळ या तरुणाचा नुकताच अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दीपक हा संगमनेर येथील एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता. दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त तो नाशिकला गेला असता काम आटोपून संगमनेरकडे येत होता. परत येत असताना पहाटे ४ वाजेच्या … Read more

धक्कादायक ! 80 वर्षीय आजीचा खून करून चोरटा झाला पसार

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने एका 80 वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला. सावित्राबाई मोगल शेळके असे या खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात भरदिवसा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकाच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

संगमनेर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झाले, मतमोजणी झाले आणि निकाल देखील घोषित झाले. अनेक ठिकाणी दिग्गजांनी आपली सत्ता कायम राखत ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व मिळवले. यातच संगमनेर तालुक्यात देखील दिग्गजांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडल्या होत्या व यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. दरम्यान संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले ग्रामपंचायतीवर … Read more

विखे गटाची ३५ वर्षांची सत्ता थोरात गटाने ताब्यात घेतली !

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने अनेक वर्षे विखेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या १४ पैकी ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला. व कनोली, मनोली या थोरात गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींवर विखे गटाने वर्चस्व सिद्ध केले. संगमनेर तालुक्यातील ९४ पैकी थोरात गटाच्या भोजदरी, निमगाव टेंभी, निमगाव बुद्रूक, आंबी खालसा या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. … Read more

दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मुलाच्या अंगावर घेतली झेप

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-  संगमनेर ते कोल्हेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटर सायकल स्वरांवर झेप घेऊन ओम फकीरा मंडेला (वय १३ रा. वडाळा, नाशिक) या शाळकरी मुलाच्या पायाला तळपायाला आणि मांडीला चावा घेत गंभीररित्या जखमी केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली या बाबत समजलेली अधिक माहिती अशी … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का ! या ठिकाणी गमावली सत्ता !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना आता पर्यंत धक्का लागताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्वतःच्या गावात वीस वर्षापासून ताब्यात असलेली ग्रामपंचायतीत १७ पैकी १३ जागा परिवर्तन पॅनलने जिंकून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का दिला आहे. तर आता संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Read more

पाण्यात बुडून दोन सख्या भावांसह मामाचाही मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-केटीवेअरच्या पाण्यात दोन सख्या भावांचे व त्याच्या मामाचाही बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्यातील झोळे येथे गणेशवाडी येथे घडली असल्याचे समजते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरज संतोष गाढवे (वय १५) व मयूर संतोष गाढवे (वय १३) हे दोघे भाऊ आपले सख्खे … Read more

जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मामा व दोन भाच्यांना पाण्यात जलसमाधी !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील झोळे येथे गणेशवाडी परिसरात असणार्‍या म्हसोबा नाल्यात शेळ्या धुण्यासाठी गेलेल्या मामा व दोन भाच्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना रविवार दि. 17 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात शेळ्या धुवत असताना एका मुलाचा पाय घसरला असता दुसरा त्यास हात देण्यासाठी गेला, … Read more

महिलेचा खून झाल्याचे उघडकीस, ‘त्या’ दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव येथे महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला. या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५, रा. पांढरे वस्ती, शिरसगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला शिरसगाव येथे एकटी राहात होती. … Read more

अपहरण केलेल्या ‘त्या’ महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव गावांतर्गत असलेल्या पांढरे वस्ती येथील सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५) या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. नुकतेच या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर सदर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला आहे. या प्रकरणी दोघा … Read more

गुटख्याचा हॉटस्पॉट ठरलेल्या तालुक्यात गुटखा तस्करी सुरूच

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. संगमनेर तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात अवैध धंद्याने डोके वर काढले आहे. … Read more

भक्ष दिसताच बिबट्याने घेतली झडप; पहा पुढे काय झाले

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील पठारभागात बिबट्यांची दहशत वाढत आहे. नुकतेच शुक्रवारी (ता.15) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथे एका कारवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. परंतु, कारच्या सर्व काचा बंद असल्याने कारचालक तरुण बचावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कारचालक गणेश दिलीप वाघ हा तरुण शेळकेवाडी … Read more

या कारणावरून केला तिन महिलांचा विनयभंग या तालुक्यातील घटना : दोघेजण अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- मोटारसायकलला कारचालकाचा धक्का लागला त्यावरून कारचालकाला गाडी हळू चालव असे सांगितल्याचा राग आल्याने कारचालचालक व त्याच्यासोबत असलेल्या अन्य एकजण असे दोघांनी त्या मुलास मारहाण केली. यावेळी मध्यस्ती करणाऱ्या तिन महिलांचा या दोघांनी वियभंग केल्याचा गंभीर प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील पोहेगाव खूर्द मध्ये … Read more