गुगल मॅपने रस्ता शोधता शोधता कर गेली धरणात

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-अनेकदा प्रवासाला निघाले कि आपल्याला निश्चित स्थळाची माहिती नसल्यास आपण गुगल मॅपची मदत घेतो. मात्र असेच काही जण गुगल मॅपच्या साहाय्याने संबंधित ठिकाणी पोहचण्यासाठी निघाले असता कार थेट धरणात गेल्याची विचित्र घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी रात्री पुणे येथील सत्याराज शेखर व मित्र समीर सुधीर … Read more

अर्धा डझन बिबट्यांनी दोन शेळ्या केल्या फस्त

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच … Read more

महसूलमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेस अध्यक्षा नाराज

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात कोणत्याही क्षणी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा मागच्या काही दिवसापासून राज्याचे राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार थोरातांच्या या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी या निर्णयाच्या बाजूने नाहीत. दोन दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे … Read more

छोट्या – मोठ्या व्यावसायिकांना आस्मानी संकटाचा फटका

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा सर्वानाच अनुभवण्यास मिळत आहे. याचा रब्बीतील पिकांवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. कांदा, गहू, हरभरा, मका, द्राक्षे व डाळिंब या पिकांना मोठा फटका बसला आहे. या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले असतानाच छोटे-मोठे उद्योग करुन उदरनिर्वाह करणार्‍या व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसला आहे. सर्वात जास्त वीटभट्टी … Read more

भुकेल्या बिबट्याने केला चिकन डिनर

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने यापूर्वी मानवीवस्तीवर देखील प्राणघातक हल्ले चढविले आहे. यामध्ये काहींचा बळी देखील गेला आहे. नुकतेच बिबट्याने कोंबड्यांच्या खुरटयावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील माळेगाव पठार गावांतर्गत असलेल्या रामेश्वरदरा येथे शनिवारी (ता.9) पहाटे पाच वाजेच्या सुमारास … Read more

कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा गायींची सुटका

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. नुकतेच संगमनेर शहरात कत्तलीसाठी ६ गायी घेऊन जाणारा पिकअप … Read more

कारच्या धडकेत दोन शेळ्या ठार; सात गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळडी शिवारातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कार चालविणार्‍या चालकाने शेळ्यांना धडक दिल्याने दोन शेळ्या जागीच ठार झाल्या आहे. तर सात शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, खंदरमाळवाडी शिवारातील गोकुळवाडी येथे सदाशिव बबन लेंडे हे शेतकरी तथा पशुपालक आपल्या शेळ्या चारण्यासाठी एकोणावीस मैल येथून … Read more

महसूलमंत्री म्हणाले.. महाराजांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-  सध्या राज्यात नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विकासात्मक गोष्टींना फाटा देत, आर्थिक उन्नतीच्या गोष्टींवर चर्चा न करता शहरांच्या नामांतराच्या चर्चा हल्ली जोर धरू लागल्या आहेत. यातच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. थोरात म्हणाले कि, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा … Read more

कोरोनाची खुंटलेली वाढ हळूहळू पुन्हा वाढतेय

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यात सुरु असलेले कोविडचे संक्रमण आजही कायम आहे. त्याचबरोबर शहरी व ग्रामीण भागात कोरोनाच्या दररोजच्या आकडेमोडीचे प्रमाण कमी-अधिक होत कायम आहे. बुधवारी (ता.6) रात्री उशीराने प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील सात जणांसह 24 जणांची नव्याने रुग्णसंख्येत भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याचा कोविड आलेख उंचावत आता सहा हजार 93 … Read more

निवृत्त शिक्षकाचे साडेतीन तोळ्यांचे दागिने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- संगमनेर शहरातील गजबजलेल्या बाजार समितीजवळ एका निवृत्त शिक्षकाचे तब्बल साडेतीन तोळ्यांचे दागिने घेवून दोन चोरटे फरार झाले आहे. याबाबात अधिक माहिती अशी कि, बुधवारी (ता.6) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गोविंदनगर परिसरात राहणारे निवृत्त शिक्षक कारभारी पुंजीराम पानसरे संगमनेर बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरुन जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना … Read more

एडीसीसी बँकेच्या त्या भांडखोर व कामचुकार कर्मचारीचे निलंबन करावे

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- एडीसीसी (जिल्हा) बँक संगमनेर शाखेतील मगरुर, भांडखोर व कामचुकार कर्मचारीस निलंबीत करुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, एडीसीसी बँक मुख्य शाखेचे एमडी रावसाहेब वर्पे व मॅनेजर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. अन्यथा बँकेच्या मुख्य शाखे समोर आंदोलन करण्याचा इशारा … Read more

तोतया पोलिसाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे दागिने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-संगमनेर शहरात एका भामट्याने पोलीस असल्याचे सांगत ५६ हजार रुपयांचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कारभारी पुंजीराम पानसरे (वय ७० रा. गोविंदनगर ता. संगमनेर) हे बुधवारी सकाळी शेतकी संघाच्या गेटजवळ आले होते. त्यावेळी मोटारसायकल वरून दोन … Read more

आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी राष्ट्रीय सेवा दलाकडून रॅलीचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने 7 व 8 जानेवारीला रॅली काढण्यात येणार आहे. 7 ला सकाळी 11 वाजता नगर येथून आमदार डॉ. सुधीर तांबे रॅलीला प्रारंभ करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे यांनी दिली. दुपारी एक वाजता राहुरी, तीन वाजता कोल्हार, साडेचार वाजता … Read more

त्या दरोडेखोरांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना शहर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री गुंजाळवाडी रस्त्यावरील हॉटेल रानजाईच्या बोगद्याजवळ करण्यात आली. ही टोळी संगमनेरातील आहे. तिघांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गुंजाळवाडी रस्त्यावर ५ जण लोकांना अडवून लूट करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक … Read more

वनरक्षक महिलेस धक्काबुक्की करत शिवीगाळ केली

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-गृहिणी असो नाहीतर नौकरदार… आजही पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात महिलांना तुच्छ वागणूक दिली जाते. यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नुकतेच एका सरकारी महिला अधिकाऱ्यास धक्कबुक्की व शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार खुद्द महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा तालुका संगमनेर मध्ये घडला आहे. … Read more

कारच्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. अपघाताच्या वाढत्या सत्रामुळे दरदिवशी अनेक निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. तर काही जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारात येथे कारच्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, माळवाडी शिवारातील कुर्‍हाडे … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. नुकतेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. हि घटना संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीबाबत संगमनेर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना माहिती मिळाली. यानुसार … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत एकूण २ हजार ६०६ उमेदवारांपैकी तब्बल ९३२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ९४ ग्रामपंचायतींच्या १९२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे त्यातील चार ग्रामपंचायतींनी बिनविरोधचा झेंडा रोवला असून आता उर्वरीत 287 प्रभागातील ६९६ जागांसाठी १ हजार ४८२ उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात उभे आहे. ग्रामपातळीवरील विधानसभा … Read more