निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले?

अहमदनगर – गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं,  असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू … Read more

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : आ. कर्डिले

करंजी : पाथर्डी-नगर तालुक्यातील विविध गावच्या विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातुन सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. करंजी येथील भावलेवस्ती रस्ता, तिसगाव येथील गारूडकर वस्ती रस्ता, शिराळ मारूती मंदिर सभामंडप, करडवाडी … Read more

आ. कर्डिलेंना आ. राजळेंचे पाठबळ !

नगर दक्षिणेच्या राजकारणात भाजपा अंतर्गत पुन्हा एकदा नव्याने फेर जुळण्याचे प्रयत्न होत असून, आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार मोनिकाताई राजळे यांच्याभोवती भाजपचे राजकारण आगामी काळात फिरण्याची चिन्हे आहेत. भाजपासह सत्तेचे प्रमुख शक्तीकेंद्र बनलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महाजनादेश यात्रेच्यानिमिताने पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांनी आ. कर्डिले यांच्या लोकसभा निवडणुकीतील योगदानाबद्दल भरभरून कौतुक केले. या कौतुकामागील … Read more

आमदार शिवाजी कर्डिले यांनी ‘त्या’ डॉक्टरला खडसावले

राहुरी :- अपघातात ठार झालेल्या तरुणाच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना तब्बल १० तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागल्याने ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. तालुक्यातील म्हैसगाव येथील सुरेश श्रीरंग नेहे (वय ३५) यांचा मंगळवारी रात्री १० च्या सुमारास म्हैसगाव-राहुरी मार्गावरील केदारेश्वर घाटात अपघात होऊन ते ठार झाले. नेहे यांचा मृतदेह रात्री पावणेअकरा वाजता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात … Read more

मी केलेला विकास पहायचा असेल तर मतदारसंघात येऊन पहा – आ. शिवाजी कर्डिले

राहुरी :- आपले शिक्षण कमी असले, तरी आपण फिल्डवर काम करतो, त्यामुळे जनतेचे प्रश्न काय आहेत, ते शासन दरबारी कसे मांडायचे आणि मंजूर करून घ्यायची हातोटी आपल्याकडे आहे. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक निधी राहुरी – नगर – पाथर्डी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आणला आहे. आपण केलेला विकास कोणाला पहायचा असेल, तर या मतदारसंघात येऊन पहा, असे … Read more

२५ वर्षांत झाली नाही इतकी कामे राहुरीत केली- आ. कर्डिले

राहुरी :- तालुक्यात २५ वर्षांत झाली नाही इतकी कामे आपल्या काळात झाली असून आपण नेहमीच जनतेत असल्याने यावेळी राहुरीतून एक लाख मते विकास कामांच्या माध्यमातून मिळविणार असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी तालुक्यातील गुहा, वडनेर व तांदुळनेर येथे आ. कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी आ. कर्डिले बोलत … Read more

आमदार कर्डिले गटाचा दारूण पराभव !

अहमदनगर :- नगर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवख्या व युवा नेतृत्वाने प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला आहे. पारगाव भातोडी, पारेवाडी, मजले चिचोंडी या गावांमध्ये विद्यमान सरपंचांच्या हातातून सत्ता निसटली आहे. पारगाव ग्रामपंचायतीत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या गटाचा दारूण पराभव करत युवा व्याख्याते गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने दिमाखदार विजय मिळविला. तालुक्यातील पारगाव, पारेवाडी, मजले चिंचोली, भोयरे … Read more

आ. शिवाजी कर्डिलेंना बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र !

अहमदनगर :- लोकसभा निवडणुका पार पडताच शिवसेना – भाजप व महाआघाडी नेत्यांत श्रेयावाद रंगला आहे,आणि आमदार शिवाजीराव कर्डिले या वादाचे केद्रबिंदू आहेत.  खासदार डॉ. सुजय विखे यांना भाजपात येण्याची ऑफर देतानाच त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे आ. शिवाजीराव कर्डिले यांना डॉ. विखे यांच्या विजयाचे श्रेय मिळू नये म्हणून कर्डिले विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच कर्डिलेंना बदनाम करण्याचा … Read more

सुजय विखेंच्या यशात शिवाजी कर्डिले यांचा संबंध नाही !

अहमदनगर :- डॉ. सुजय विखे यांना अहमदनगर मतदारसंघातून तब्बल २ लाख ८१ हजार ४७४ मताधिक्य मिळाले. पाथर्डी तालुक्यातून सर्वाधिक ५४ हजार ८३५ मताधिक्य असून दुसऱ्या क्रमांकाची ५४ हजार १४९ मते नगर तालुक्यातून मिळाली. या मताधिक्यात महाआघाडी आणि निष्ठावंत भाजपचा वाटा आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांचा या यशात कोणताही संबंध नाही. त्यांना जनतेने सपशेल नाकारले, असा … Read more

जावयाला मदत करण्यापेक्षा आ.कर्डीले यांनी केला स्वताच्या भावित्यव्याचा विचार आणि ….

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेतून भाजपकडून डॉ सुजय विखे आणि राष्ट्रवादी कडून आ.संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर होतात भाजप आमदार आणि जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर असणारे आ.शिवाजीराव कर्डिले धर्म संकटात पडले होते. पक्षाने दिलेल्या उमेदवाराच काम कराव कि जावई संग्राम जगताप हा प्रश्न त्यांच्या समोर पडला,आजवरच्या नगर शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात कर्डिले पक्षापेक्षा सोयीचे राजकारण … Read more

आमदार शिवाजी कर्डिले कुणाला टोपी घालणार ?

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघासाठी मंगळवार, दि. २३ रोजी होणा-या मतदनाची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दुसरीकडे दोन्ही प्रमुख उमेदवारांसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेवटच्या दोन दिवशी पक्षाचेच काम केले की जावई राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे काम केले, यावरच बरीच राजकीय समीकरणे अवलंबून आहे. नेमकी … Read more

किंगमेकर असणारे आ. शिवाजीराव कर्डिले द्विधा मन:स्थितीत !

राहुरी – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये वेळोवेळी मीच किंगमेकर म्हणणारे आ. शिवाजीराव कर्डिले हे द्विधा मन:स्थितीत दिसून आले आहे. एकीकडे जावई संग्राम जगताप तर दुसरीकडे आपल्या पक्षाने दिलेले डॉ. सुजय विखे या उमेदवारांपैकी आ. कर्डिले कोणाला मदत करणार हे कोडे मतमोजणीनंतरच उघड होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील … Read more

माजीमंत्री पाचपुते आणि आमदार कर्डिलेंकडून खासदार गांधींना टोमणे

अहमदनगर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत माजीमंत्री बबनराव पाचपुते व आमदार शिवाजी कर्डिले यांनी खा.दिलीप गांधीना टोमणे मारले. माजी मंत्री पाचपुते यांनी साकळाईसाठी आपण कसे प्रयत्न केले, याचा पाढा वाचला. मागील सभेत खासदार गांधी यांनी डॉ. विखेंना मतदान करा एवढे म्हटले असते, तरी लोकांनी डोक्यावर घेतले … Read more

जावयाला सोडून आ.शिवाजी कर्डिले सुजय विखेंसोबत !

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन भाजपाचे उमेदवार डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी विराट शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते. दिल्लीगेट येथून भव्य रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. डॉ.सुजय विखे पाटील यांनी तीन उमेदवारी भरले. ही निवडणूक … Read more

शिवाजी कर्डिलेंचे कार्यकर्ते संग्राम जगतापांच्या प्रचारात !

अहमदनगर :- भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे नगर तालुक्यातील कार्यकर्ते भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे काम करीत आहेत. असा दावा नगर तालुका शिवसेनेने रविवारी केला. लोकसभा निवडणुकीवरून राहुरीचे आमदार कर्डिले यांचे नगर तालुका भाजपतील समर्थक व तालुका शिवसेनेत सध्या जुंपली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. विखे यांच्या प्रचारार्थ भाजप … Read more

…..पण टोपीची औकात काय ? – राठोड

नगर :आमदार शिवाजी कर्डिले जे बोलतील ते कधीच करत नाहीत. डॉ. सुजय विखे कोणाला बरोबर घेऊन फिरत आहेत, त्यांना ठावूक नाही.  कर्डिले हे विखे यांचे कधी सर्जिकल स्ट्राईक करतील समजणार देखील नाही. टोपीची महती काय आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यांचा आजवरचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल, असे टीकास्त्र नगर तालुक्यातील महाआघाडीचे माजी आमदार अनिल राठोड, … Read more

माझी भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही – आ.शिवाजी कर्डिले.

अहमदनगर :- माझ्यावर राजकीय द्वेषातून काही लोक आरोप करत आहेत. काही आमदारकीचे स्वप्नच पहात आहेत, तर काही लोक आपण आमदारकीला पडलो आहोत हे मान्य करायला तयारच नाहीत. अशा सर्व लोकांना मी वेळोवेळी त्यांची जागा दाखवून दिली आहे, असा टोला प्रा. गाडे, माजी आमदार राठोड, तनपुरे यांचे नाव न घेता आमदार शिवाजी कर्डिले यांनी लगावला. नगर … Read more

राष्ट्रवादीने माझी राजकीय कारकीर्द संपवली होती – आ.शिवाजी कर्डिले .

अहमदनगर : नगर जिल्ह्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहणारे शिवाजी कर्डिले लोकसभा निवडणुकीत कुणाला मदत करणार याविषयी चर्चा होती. पण सुजय विखेंच्याच मागे राहणार असल्याचं शिवाजी कर्डिलेंनी स्पष्ट केलं आहे. नगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आ.संग्राम जगताप हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे … Read more