कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आ. आशुतोष काळेच ठरतील ‘वन मॅन आर्मी’ ; कोल्हे महायुतीचा धर्म निभावणार !

Kopargaon Vidhansabha

Kopargaon Vidhansabha : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील काळे आणि कोल्हे हे दोन राजकीय परिवार शुगर लॉबी मधून येतात. शुगर लॉबी मधून येत असल्याने या दोन्ही परिवाराचा मतदारसंघातील गावागावांमध्ये घट्ट जनसंपर्क आहे. काळे आणि कोल्हे हे परंपरागत राजकीय विरोधक राहिले आहेत. गत निवडणुकीत कोपरगावात भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे यांच्यात लढत झाली होती. या … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मोठी घोषणा ! नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 2 हजार

Maharashtra Vidhansabha Nivdnuk

Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागले आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांकडे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांना एक मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोदी सरकार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

आणि अजितदादा बोलले…’झालं ते झालं, आता नव्याने सुरुवात करायचीय !

मुंबई :- बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झालेले राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे पुन्हा मूळ पक्षात बुधवारी सक्रिय झाले आहेत.  यशवंतराव चव्हाण सेंटरमधील पक्षाच्या बैठकीत अजितदादांनी केवळ हजेरीच लावली नाही तर नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शनही केले. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडासंदर्भात शंका व्यक्त केली गेली नसेल तर नवलच  राष्ट्रवादीतील आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा अजित पवार यांना विश्वास … Read more

माजीमंत्री बबनराव पाचपुतेच ठरविणार देवेंद्र फडणवीस – अजित पवारांचे भवितव्य !

अहमदनगर :- कालची सकाळ राजकीय भूकंपानेच उजाडली. अजित पवार यांनी बंडखोरी करत थेट भाजपशी हातमिळवणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.या बंडखोरीची बक्षिसी म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे. मात्र याच बंडखोरीमुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विधानसभेत … Read more

श्रीगोंदा तालुक्याला परत एकदा लाल दिवा मिळणार का ?

श्रीगोंदा : अतिशय चुरशीच्या झालेल्या श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपचे बबनराव पाचपुते यांनी आघाडी मिळवली आणि पाचपुते हे अटीतटीच्या लढाईत विजयी झाले. पाचपुतेंच्या विजयामुळे श्रीगोंद्यात पहिल्यांदाच विधानसभेला कमळ फुलले आहे. निकाल लागल्यानंतर बबनराव पाचपुते व त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते या दोघांनी तातडीने मुंबईला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील … Read more

कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने बाळासाहेब मुरकुटेंचा पराभव !

नेवासे :- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख विरोधक एकत्र येत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना विजयी केले होते. मात्र मुरकुटे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांना वारेवर सोडत कोणतेही बळ न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून असलेली खदखद या निवडणुकीत बाहेर पडली. मुरकुटे यांच्या विजयात कार्यकर्ते नडले असल्याच्या चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. मुरकुटे यांनी तालुक्‍यात … Read more

पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची रामावर आली वेळ !

कर्जत :- दहा वर्षे कर्जत-जामखेडची आमदारकी, पाच वर्षे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद, सहा खात्यांचा कारभार असे भाग्य लाभलेल्या मंत्री राम शिंदे यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, मंत्रिपदाचे वलय प्राप्त झाल्यानंतर कमी झालेला जनसंपर्क आणि ठरावीक लोकांनाच जवळ करण्याची प्रवृत्ती आड आली. पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची वेळ रामावर आली. जनतेच्या प्रश्नांकडे … Read more

हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका !

कर्जत :- जामखेड विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पराभव केला. गेल्या २५ वर्षपासूनचा भाजपचा बाल्लेकिल्ला ढासळा आहे त्यामुळे पराभवाची कारणमीमांसा शोधू, अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट शिंदे यांनी केली आहे. “हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका, नव्या जोमाने कामाला लागू, अनेक पराभव मी पाहिले, पचवले आहेत. … Read more

जनतेच्या हितासाठी सत्ता राबविणार- आमदार शंकरराव गडाख

सोनई : विरोधकांनी सत्तेच्या माध्यमातून राजकीय सुडबुद्धीने दिलेला त्रास मी विसरलो आहे. आपली राजकीय ताकद विरोधकांची जिरविण्यासाठी अजिबात खर्ची घालणार नसून जनतेच्या हितासाठी राबविणार असल्याचा दृढ संकल्प नवनिर्वाचित आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. विजयी घोषित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडाख यांनी वरील भावना व्यक्त केली. विजयानंतर त्यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन भास्करगिरी महाराज यांचे आशीर्वाद … Read more

कोल्हेंनी केलेली कामे निवडून येण्यासाठी पुष्कळ होती, परंतु जनतेने त्यांना नाकारले…

कोपरगाव :- राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय व युतीच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव अनेकांसाठी अनपेक्षित होता. कोल्हेंशिवाय अन्य उमेदवार निवडून येणे शक्य नाही, अशीच धारणा राजकीय वर्तुळात झाली होती, परंतु जनमानसात कोल्हेंबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा घेत आशुतोष यांनी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या विजयामागे अनेक शिलेदार आहेत. छुपे मतदानही काळेंच्या पारड्यात पडले. मागच्या पराभवाचा वचपा काढत … Read more

विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला -प्रा.माणिक विधाते

अहमदनगर :- मागील पाच वर्षाचे विकासात्मक कार्य पाहून जनतेने संग्राम जगताप यांच्याबाजूने कौल दिला आहे. विकास विरुध्द निष्क्रीय माजी आमदारामध्ये ही लढत होती. यामध्ये विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला असल्याची भावना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकितील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसर्‍यांदा विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल व … Read more

पराजय झटकून किरण काळे लागले कामाला

कालच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. असे असले तरी काळे यांनी आजच महानगरपालिकेमध्ये दाखल होत सुरू केलेल्या कामामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. निवडणुकीमध्ये काळे यांनी जाहीर केलेला वचननामा आणि जाहीरनामा हा चांगलाच गाजला होता. काळे हे वंचित बहुजन आघाडचे उमेदवार होते.  अल्पावधीत त्यांनी आपला प्रचार केला होता. परंतु … Read more

राम शिंदे यांनाच आत्मचिंतन करण्याची वेळ !

कर्जत: कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी अत्यंत रोमहर्षक व ऐतिहासिक विजय मिळवत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा ४३ हजार मतांनी पराभव केला. गेली पंचवीस वर्षे येथे असलेली भाजपाची सत्ता संपुष्टात आणत पवारांनी नवीन पर्वाला सुरुवात केली. कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे रोहित पवार यांनी … Read more

पारनेर मध्ये गुरुला शिष्याने हरविले !

पारनेरला शिवसेनेचे विजय औटी यांच्यासमोर त्यांच्याच पक्षात एकेकाळी असलेले व त्यांचे शिष्य मानले जात असलेले निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून औटींसमोर मोठे आव्हान उभे केले होते. लंके यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांपैकी काहींनी स्वीकारले व काहींनी विरोधात भूमिका घेतली. पण पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांची साथ मिळाल्याने त्यांना आणखी ताकद मिळाली. विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले असले तरी औटी … Read more

भाजप – शिवसेनेचे गर्वहरण, अहमदनगर जिल्ह्यात आघाडीची हवा !

अहमदनगर – जिल्ह्यात भाजपचे हेवीवेट मंत्री समजले जाणारे राम शिंदे यांच्या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. शरद पवाराचे यांचे नातू रोहित पवार यांची जोरदार ‘ एन्ट्री’ झाली आहे.  राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वगळता उर्वरित सर्वच उमेदवार ‘गॅस’ वर राहिले. विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना चौकार ठोकण्यात सपशेल अपयश आले.  येथे राष्ट्रवादीचे नीलेश लंके हे जायंट … Read more

श्रीगोंद्यातून पुन्हा एकदा घनश्याम शेलार पराभूत !

श्रीगोंद्यात घनश्याम शेलारांचे पक्षांतर अयशस्वी झाले आहे, श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांना निसटता विजय मिळाला. येथील निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे घनशाम शेलार यांनी त्यांना तगडी लढत दिली. शिवसेनेकडून नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची संधी मिळत नसल्याचे पाहून शेलारांनी चार-पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे हे पक्षांतर मात्र यशस्वी झाले नाही.  … Read more

राम शिंदेंना पर्याय उपलब्ध झाल्याने बदल घडविला !

कर्जत-जामखेड हा मतदारसंघ शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्या एंट्रीमुळे राज्यभर गाजला. निवडणुकीपूर्वीच या भागात त्यांनी तयारी केली होती.  मागील दोन वर्षांपासून त्यांचे संपर्क अभियान जोरात होते. त्यामुळेच त्यांनी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती मानले जाणाऱ्या प्रा. राम शिंदे यांना पराभवाचा झटका दिला.  मत विभाजन आणि जातीय समीकरणाचा फायदा मिळत असल्याने शिंदे दोनदा विजयी झाले होते. … Read more

संग्राम जगताप यांनी लोकसभेत झालेला पराभव पचवला पण…

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती, व त्या निवडणुकीत नगर शहरात ते तब्बल ५५ हजाराने पिछाडीवर पडले होते. त्यांची राजकीय कारकीर्द ओहोटीला लागल्याचे बोलले गेले.  पण ही इष्टापत्ती समजून व विधानसभा निवडणुकीतील संभाव्य धोक्याची घंटा लक्षात घेऊन त्यांनी तेव्हापासूनच पुन्हा शहरात ताकद पणाला लावली. सावेडी, बालिकाश्रम रोड, नागापूर, बोल्हेगाव, … Read more