भिंगारचे सर्व प्रश्न सोडवले जातील – डॉ. नीलम गोऱ्हे

नगर – राज्यभरातील अनेक छावण्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात मी विधानसभेत आवाज उठवला. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचेही ठरले होते. भिंगार येथील नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी दिले. शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भिंगारमध्ये झालेल्या प्रचारसभेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, अंबादास पंधाडे, जिल्हा महिला … Read more

‘या’ कारणामुळे सभापती राहुल झावरे यांनी दिला राजीनामा !

पारनेर :- आमदार विजय औटी यांच्याकडून माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा इतिहास पुसला जात असल्याचे सांगत पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे खळबळ उडाली. पत्रकार परिषदेत झावरे यांनी जि. प. अध्यक्ष शालिनी विखे यांना दिलेल्या राजीनाम्याची प्रत दाखवत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, नंदकुमार झावरे यांचा अनुल्लेख … Read more

जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले

निघोज :- जनसंवाद यात्रेत जनतेचे दु:ख मला समजले. पाणी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न मी सोडवणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री अशोक सावंत, प्रभाकर कवाद, दादा कळमकर, मधुकर उचाळे, सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कळमकर, अनंतराव वरखडे, सुवर्णा मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य … Read more

धनगर आरक्षणासाठी राम शिंदे कधीच भांडले नाहीत…

जामखेड – सामान्य जनतेच्या मागणीवरून शरद पवार यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व कर्जत-जामखेडचा चेहरामोहरा बदलू शकणारा तगडा उमेदवार दिला आहे. तुम्ही रोहित पवार यांना एकदा संधी देऊन पहा, पुन्हा तुम्ही त्यांना आयुष्यभर सोडणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने नान्नज येथे सोमवारी झालेल्या सभेत … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला !

श्रीरामपूर :- काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मागील सरकारने उपाययोजना केल्या नाहीत.अशी टीका खा.इम्तीयाज जलील यांनी श्रीरामपूरमध्ये बोलताना केली. विधानसभा निवडणुकीतील एमआयएमचे उमेदवार सुरेश जगधने यांच्या प्रचार सभेत खासदार जलील बोलत होते.  विविध पक्षांमध्ये होणारे नेत्यांचे पक्षांतर खपवून घेतले जाते. मात्र एमआयएम पक्षाची मत कापणारे म्हणत बदनामी … Read more

मोदी आणि अमित शहा झोपेतही माझे नाव घेत असतील…

कोपरगाव :- पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडून माझ्या नावाचा निष्कारण घोष चालू आहे. झोपेतसुद्धा ते माझेच नाव घेत असतील, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोपरगाव येथील सभेत बोलताना भाजपच्या अनेक नेत्यांची खिल्ली उडवली. राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ पवार आले होते. हा तरुण या भागाच्या विकासासाठी झटत आहे. अशा तरुणांची … Read more

नगर शहराच्या विकासासाठी अनिल राठोड यांनाच मंत्रीपद !

अहमदनगर :- शिवसेनेचे उपनेते माजी आ.अनिल राठोड यांना मातोश्रीवरून गुलाल घेवून या अन मंत्रीपद घेवून जा असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे,  त्यामुळे नगर शहरातील जनतेने अनिल राठोड यांनाच विजयी कराव आणि शहर विकासासाठी अनिल राठोड यांना मंत्रीपदाची संधी मिळवण्यास सहकार्य करावं असे आवाहन प्रथम महापौर भगवान फ़ूलसौंदर यांनी केले.    नगर शहरात वैद्यकीय … Read more

कर्जत-जामखेडमध्ये पवार-विखे सत्तासंघर्ष

कर्जत – जामखेड मतदारसंघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे व रोहित पवार यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीतील विजयानंतर प्रा. शिंदे यांची हॅट्ट्रिक होणार तर पवार यांचा विजय राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. या लढतीला विखे आणि पवार यांच्यातील सत्ता संघर्षाचीही झालर आहे. त्यामुळे भाजप तसेच राष्ट्रवादीसाठी हा … Read more

पंकजा मुंडे व माझ्यात मतभेद नाहीत : आ. राजळे

पाथर्डी :- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मी बहीण आहे. पंकजा व माझ्यात मतभेद नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद व पंकजा मुंडे यांचे सहकार्य मी जन्मभर विसरू शकत नाही. पाथर्डी-शेवगाव दोन्ही तालुके मला कुटुंबाप्रमाणे वाटतात. फसवाफसवी हा आपला विषय नाही. लोकांना फसवल्यावर काय अवस्था होते त्याचा अनुभव विरोधकांनी घेतला आहे, अशा शब्दांत आमदार मोनिका राजळे यांनी … Read more

डॉ. प्रकाश आंबेडकर यांची उद्या जाहीर सभा

जामखेड | वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण जाधव यांच्या प्रचारार्थ आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा रविवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता कर्जत येथील बाजारतळावर होणार असल्याची माहिती कर्जत तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी दिली. जाधव यांनी वंचित बहुजन जोडो अभियानाच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व गावांतील कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला आहे. … Read more

विकास कामांचा डोंगर उभा केला होता तर स्वतः मैदानात का उतरले नाहीत ?

काष्टी : कुकडी साखर कारखान्यावर प्रशासक नेमावा असा आदेश निघाला होता. त्यावर कोणी कुणाचे पाय धरले आणि काय तडजोड केली याचा भांडाफोड विधानसभा निवडणुकीच्या विजयी सभेत करणार आहे, अशी टिका भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी विरोधकांवर केली. काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे भाजप बुध कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी … Read more

काळजावर दगड ठेऊन आलोय !

नगर :- बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाराज असलेले राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. अभिषेक कळमकर हे राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. शरद पवारांच्या सभेनंतर झालेल्या प्रकरणानंतर आमदार जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांवर अभिषेक कळमकर नाराज होते.  अभिषेक कळमकर म्हणाले, … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत वाढ !

अहमदनगर :- विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कळमकर यांनी हाती शिवबंधन बांधलं. अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप आणि कळमकर या दोन गटांमध्ये वाद सुरू होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच … Read more

पाच वर्षांत नगर शहराचा बिहार झाला….

अहमदनगर :- गेल्या  ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेचे विचार घेऊन काम केले. प्लॉट, खंडणी, दहशत २५ वर्षे बंद होती, पण मागील पाच वर्षांत शहराचा चेहरा बदलून त्याचा बिहार झाला आहे.अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.   नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत राठोड बोलत होते, शहराला संरक्षण देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. विकास हा … Read more

नगर शहरातील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही !

नगर :- शहरातील गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय मी राहणार नाही. कसले गुंड, कोण गुंड? या गुंडांची तुमच्या पायाशी उभे राहण्याचीही लायकी नाही. एका बाजूला आपले अनिल राठोड व दुसऱ्या बाजूला जो गुंड असेल त्याने याद राखावे, यापुढे गुंडागर्दी केली, तर बोलून दाखवणार नाही, करून दाखवेन, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

निष्क्रिय लोकप्रतिनिधीला घरचा रस्ता दाखवण्याची योग्य वेळ आली आहे !

राहुरी :- विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघात भेटी – गाठी तसेच प्रचार दौरा सुरू करुन त्यात तालुक्यातील प्रश्नांवर उजेड टाकतानाच विकासावर भर देवून त्याबाबत मतदारांना जागृत करत असल्याने त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तनपुरेंनी काल देसवंडी, तमनर आखाडा, गोटुंबे आखाडा, उंबरे, ब्राम्हणी आदी ठिकाणच्या गावात जावून बैठका घेतल्या. … Read more

अहमदनगर जिल्हयातुन हे ५३ अपक्ष उमेदवार ठरणार डोकेदुखी ?

नगर  – विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत. नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या अपक्षांचे आव्हान राहणार आहे. या वेळी तब्बल ५३ अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चार मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. दोन मतदारसंघांत एमआयएम पक्षाचे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएम … Read more

शरद पवारांचे हेलिकॉप्टर बिघडते तेव्हा…

पारनेर :- मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस – कॉग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी (८ ऑक्टोबर) पारनेर येथे आले होते. पारनेरमधील सभा संपल्यानंतर जळगावला उड्डाण घेण्याण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. बिघाड झालेल्या हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ न शकल्याने दुसरे हेलिकॉप्टर पारनेर येथील हेलिपॅडवर मागविण्यात आले. त्यानंतर पवार … Read more