43 Inch Smart TV : जर तुम्हाला कमी किमतीत मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सवलतीत तुम्ही 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. अशी ऑफर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर मिळत आहे.
या ठिकाणी तुम्ही 50,000 रुपयांचा स्मार्ट टीव्ही 15 हजारांपेक्षा कमी किमतीत घरी आणू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. कंपनीकडून या स्मार्ट टीव्हीमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
तुम्हाला Flipkart वर एकूण 70% सवलत देऊन खरेदी करण्याची संधी मिळत असणारा स्मार्ट टीव्ही हा BeethoSOL चे बेझललेस प्रीमियम मॉडेल असून या स्मार्टटीव्हीसोबत व्हॉईस कंट्रोल्ड स्मार्ट रिमोट उपलब्ध करून देण्यात आला आहे. वायफाय कनेक्टिव्हिटीसह 24W थंडर स्पीकरही यात दिले आहेत. टीव्ही अँड्रॉइड आधारित सॉफ्टवेअरवर काम करत असून लोकप्रिय OTT अॅप्सवरील सामग्री त्यावर पाहायला मिळेल.
मिळेल मोठी सवलत
किमतीचा विचार केला तर BeethoSOL स्मार्ट टीव्ही (43BZ37) ची भारतीय बाजारपेठेत 43-इंच स्क्रीन आकाराच्या मॉडेलची किंमत 49,990 रुपये इतकी आहे मात्र 69% सवलतीनंतर फ्लिपकार्टवर 15,199 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे.
ग्राहकांनी फेडरल बँक कार्डने पैसे भरले तर त्यांना 10% सवलत मिळेल. तसेच एचडीएफसी बँकेच्या कार्डसह ईएमआय व्यवहारांवर 1000 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल. Flipkart Axis Bank कार्ड 5% कॅशबॅक मिळत आहे.
जाणून घ्या वैशिष्ट्ये
फीचर्सचा विचार केल्यास स्मार्ट टीव्हीमध्ये 43-इंच फुल एचडी (1920×1080 पिक्सेल) एलईडी डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट तसेच 178-डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगलसह उत्कृष्ट चित्र गुणवत्तेसह येत आहे. वापरकर्त्यांना उत्कृष्ट ऑडिओ अनुभव देण्यासाठी यामध्ये 24W एकूण पॉवर असणारे ड्युअल स्पीकर दिले आहेत. हे Android 9.0 वर आधारित टीव्ही सॉफ्टवेअरवर काम करते.
याच्या कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या या स्मार्टटीव्हीमध्ये दोन एचडीएमआय आणि दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. तसेच यात वॉल-माऊंट उपलब्ध करून दिले आहे. इतकेच नाही तर यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने हॉटस्टार आणि यूट्यूब सारख्या OTT अॅप्सवरील सामग्री 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करून या टीव्हीमध्ये प्रवाहित केली जाईल. फोन किंवा मोबाईल उपकरणांची स्क्रीन कास्ट करण्याचा पर्यायही मिळत आहे.