टेक्नोलाॅजी

5G Smartphone : तुम्ही 5G फोन खरेदी करणार असाल तर ‘ही’ बातमी वाचाच ! होणार हजारोंची बचत नाहीतर ..

5G Smartphone : तुम्ही देखील नवीन 5G फोन खरेदी करणार असाल तर थोडं थांबा आणि ही संपूर्ण बातमी वाचा. आम्ही आज या लेखात तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत . जे तुमची सहज हजारो रुपयांची बचत करून देणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या ग्राहकांसाठी Amazon नवीन 5G फोन खरेदीवर एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आला आहे.

तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन तुमच्यासाठी स्वस्तात नवीन 5G फोन खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या Amazon कोणत्या 5G फोन खरेदीवर हा भन्नाट ऑफर देत आहे. ग्राहकांसाठी सध्या Amazon iQOO Z6 Pro 5G वर हा भन्नाट ऑफर जाहीर केला आहे.

या फोनवर Amazon ने 18% डिस्काउंट जाहीर केला आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह येणाऱ्या या फोनची किंमत 27,990 रुपये आहे.मात्र 18% डिस्काउंटसह तुम्ही 22,999 रुपयांना हा फोन खरेदी करू शकतात. हे देखील जाणून घ्या तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी SBI किंवा ICICI बँकेचे कार्ड वापरल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची झटपट सूटही मिळेल. तसेच या फोनची किंमत तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये 18,050 रुपयांनी कमी करू शकता. एक्सचेंज ऑफरचे फायदे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असतील.

फीचर्स

iQOO Z6 Pro 5G मध्ये 2404×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.44-इंचाचा AMOLED डिस्प्ले पाहायला मिळतो. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याची पीक ब्राइटनेस लेव्हल 1300 nits आहे. iQOO चा हा फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. फोनमध्ये 4 GB पर्यंत व्हर्चुअल रॅम देखील देण्यात आली आहे. यामुळे त्याची एकूण रॅम आवश्यकतेनुसार 16 GB पर्यंत होते.

हा फोन Snapdragon 778 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, 8-मेगापिक्सलचा वाईड अँगल आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स त्याच्या मागील पॅनलवर 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये 4700mAh बॅटरी आहे. हे 66W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हे तंत्रज्ञान 18 मिनिटांत 50% पर्यंत बॅटरी चार्ज करते. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :-  Bajaj Pulsar 220F : पल्सर प्रेमींसाठी बिग न्यूज ! फक्त 500 रुपयांमध्ये बुक करा ‘ही’ जबरदस्त बाइक ; जाणून घ्या प्रक्रिया

Ahmednagarlive24 Office

Recent Posts