टेक्नोलाॅजी

जानेवारीच्या ‘या’ तारखेला भारतात लॉन्च होणार 6000 mAh बॅटरी असलेला व रंग बदलणारा स्मार्टफोन! जाणून घ्या किंमत

Realme 14 Pro+ Smartphone:- आपण मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये बघितले तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये अनेक स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना देखील त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये चांगले स्मार्टफोन मिळण्यास यामुळे मदत झाली.

तसेच आता या नवीन वर्षी म्हणजे 2025 मध्ये देखील अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असे स्मार्टफोन बाजारात लॉन्च करण्यात येणार आहेत व त्यातच आता Realme 14 Pro+ लवकरच भारतात लॉन्च होणार आहे व त्यापूर्वी तो चीनमध्ये लॉन्च करण्यात आला.

हा स्मार्टफोन भारतामध्ये 16 जानेवारीला लॉन्च होणार आहे व यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात रंग बदलणारे बॅक डिझाईन असणार आहे. जेव्हा 16 अंशापेक्षा तापमान कमी असते तेव्हा या फोनचा रंग बदलतो.

रियलमीचा नवीन फोनला धुळीपासून संरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून IP69,IP68 आणि IP66 रेटिंग मिळाली आहे व पावर करिता जलद चार्जिंग सपोर्टसाठी 6000 mAh क्षमतेची बॅटरी दिली असून अनेक प्रकारे उत्तम असा स्मार्टफोन असणार आहे.

Realme 14 Pro+ स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये

1- डिस्प्ले- या स्मार्टफोनमध्ये 6.83 इंचाचा 1.5K कर्व्ह AMOLED डिस्प्ले दिला आहे जो 2800×1272 पिक्सेल रिझोल्युशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो व इतकेच नाही तर 1500 nits पीक ब्राईटनेसला देखील सपोर्ट करतो.

2- प्रोसेसर- कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा स्नॅपड्रॅगन 7s Gen तीन प्रोसेसर दिला आहे तो ऍड्रेनो GPU सह कनेक्ट आहे.

3- स्टोरेज- हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये सादर केला असून यामध्ये 12 जीबी+256 जीबी स्टोरेज आणि दुसरा व्हेरियंट हा 12GB+512GB स्टोरेज व्हेरियंट मध्ये देखील येतो.

4- कॅमेरा- रियलमी 14 Pro+ स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सल सोनी IMX896 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तर 50 मेगापिक्सल अल्ट्राव्हाड अँगल लेन्स देखील उपलब्ध असून जी 3x झुमला सपोर्ट करते व सेल्फीकरीता यामध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

5- बॅटरी- कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 6000 mAh क्षमतेची बॅटरी देखील दिली आहे.

6- इतर वैशिष्ट्ये- याशिवाय यामध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर IP69,IP68 आणि IP66 रेटिंग आहे. हा फोन स्टेरिओ स्पीकर्ससह लॉन्च करण्यात आला आहे.

भारतामध्ये लॉन्च होणार रियलमीची ही सिरीज
Realme 14 Pro मालिका चार कलर व्हेरियंटमध्ये आणली जात असून भारतामध्ये बिकानेर पर्पल आणि जयपूर पिंक या दोन कलर व्हेरियंटमध्ये आणली जाणार आहे.

इतकेच नाही तर या लाईन अप मधील जगातील पहिले थंड आणि रंग बदलणारे डिझाईन व तीन प्रकारचा फ्लॅश लाईटसह ही सिरीज आणली जात आहे.

चीनमध्ये किती आहे या फोनची किंमत?
चीनमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला व त्याची किंमत साधारणपणे भारतीय चलनात 30 हजार 500 रुपये इतकी आहे. ही किंमत 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरियंटसाठी आहे.

तसेच हा स्मार्टफोन बारा जीबी रॅम आणि 512 जीबी व्हेरिएंट मध्ये देखील येणार आहे. सध्या चीनमध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे व 16 जानेवारी रोजी भारतामध्ये लॉन्च होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil