Redmi Note 13 Pro Plus 5g : तुम्ही नवीन वर्षाचे औचित्य साधून स्मार्टफोन घेण्याचा तयारीत आहात का, अहो, मग थांबा ! आधी संपूर्ण बातमी वाचा. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रेडमीने आपला एक नवीन भन्नाट फीचर्स असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने लॉन्च केलेला हा स्मार्टफोन डीएस्एल्आर कॅमेरा पेक्षा उत्कृष्ट कॅमेरा कॉलिटी असलेला फोन आहे.
DSLR कॅमेराला टक्कर देणारा हा रेडमीचा नवीन स्मार्टफोन नुकताच बाजारात लॉन्च झाला आहे. मात्र अजून हा फोन आपल्या भारतात लॉन्च झालेला नाही. परंतु चिंता करू नका पुढल्या महिन्यात हा फोन आपल्या भारतात देखील लॉन्च होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, Redmi Note 13 Pro Plus हा रेडमी कंपनीचा नवीन स्मार्टफोन नुकताच चायना मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
तसेच जानेवारी 2024 मध्ये हा कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार अशी माहिती समोर येत आहे. या स्मार्टफोन बाबत बोलायचं झालं तर हा फोन Redmi Note 13 सीरीजचा भाग असेल. Note 13 Pro Plus चा चीनी प्रकार 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच 1.5K OLED स्क्रीनसह येतो.
डिव्हाइसमध्ये 4nm ऑक्टा-कोर डायमेन्सिटी 7200 अल्ट्रा चिप आणि G610 ग्राफिक्स आहेत. हा फोन भारतात 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज सह लॉन्च केला जाईल. फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा Redmi Note 13 Pro Plus 5G चीनमध्ये 1999 युआनच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे.
म्हणजेच भारतात त्याची किंमत जवळपास ₹ 23 हजार ते ₹ 30 हजार असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन त्याच्या कॅमेरा क्वालिटी साठी विशेष ओळखला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सल चा कॅमेरा दिला जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हीही नवीन वर्षात स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर रेडमीचा हा फोन तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.