Jio Recharge Plan : जिओ ही देशातील एक आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे करोडो ग्राहक आहेत. कंपनीने टेलिकॉम सेक्टरमध्ये पाय ठेवल्यानंतर आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. वेगवेगळे रिचार्ज प्लॅन कंपनीकडून लॉन्च करण्यात आले आहेत. ग्राहकांना कंपनीच्या माध्यमातून स्वस्तात चांगले रिचार्ज प्लॅन दिले जात आहेत. आज अर्थातच 26 जानेवारी 2024 म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपूर्ण देशात आनंदात पार पडला आहे.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. हा राष्ट्रीय सण आपण सर्वांनीच मोठ्या आनंदात साजरा केला आहे. दरम्यान याच राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिओने रिपब्लिक डे स्पेशल ऑफर लॉन्स केली आहे. विशेष म्हणजे जीवन नंतर आता वोडाफोन-आयडिया या लोकप्रिय कंपनीने देखील आपल्या ग्राहकांसाठी रिपब्लिक डे स्पेशल ऑफर लॉन्च केली आहे.
या ऑफर अंतर्गत आता वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना अतिरिक्त डेटा मिळणार आहे. यामुळे वोडाफोन-आयडियाचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. या नवीन ऑफर अंतर्गत वोडाफोन-आयडिया कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना एका विशिष्ट प्लानने रिचार्ज केल्यास 50 जीबी डेटा अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तसेच या प्लॅनवर कंपनीकडून डिस्काउंट देखील दिला जात आहे. हा एक वार्षिक रिचार्ज प्लॅन आहे. Vi चा प्रीपेड वार्षिक प्लान हा आता 3,024 रुपयांना उपलब्ध होणार आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना एका वर्षाची अर्थातच 365 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे, या कालावधीत ग्राहकांना डेली 2 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंगचा देखील लाभ मिळणार आहे.
एवढेच नाही तर या प्लॅन सोबत 50 जीबी अतिरिक्त डेटा देखील ग्राहकांना मिळणार आहे. खरेतर या प्लॅनची किंमत 3 हजार 99 रुपये एवढी होती मात्र रिपब्लिक डे स्पेशल ऑफर अंतर्गत यावर 75 रुपयांचा डिस्काउंट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना वोडाफोन-आयडियाच्या अधिकृत एप्लीकेशन वरून रिचार्ज करावा लागणार आहे. तसेच ही ऑफर फक्त आणि फक्त 30 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे, यानंतर ही ऑफर संपणार आहे. यामुळे वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना या प्लॅनने लवकरात लवकर रिचार्ज करून लाभ घ्यायचा आहे.