Airtel Recharge Plan : सर्व टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन घेऊन येत असतात. यातील काही रिचार्ज प्लॅन ग्राहकांना परवडणारे असतात तर काही प्लॅन खूप महाग असतात. दरम्यान असाच एक रिचार्ज प्लॅन एअरटेल या टेलिकॉम कंपनीने आणला आहे.
ज्याची किंमत कंपनीच्या इतर प्लॅनपेक्षा खूप कमी आहे. कंपनीने आणलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 60GB डेटा मिळणार आहे. तसेच त्यांना अनलिमिटेड कॉल आणि एसएमएस मिळणार आहेत. काय आहेत कंपनीचे हे रिचार्ज प्लॅन जाणून घेऊयात.
पहा एअरटेल बल्क डेटा प्लॅनची लिस्ट :
लिस्टमधील पहिला प्लॅन 489 रुपयांचा असून या प्लॅनसह, वापरकर्त्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह 50GB बल्क डेटा दिला जात आहे. या मध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 300 एसएमएस आणि अनलिमिटेड 5G डेटा तसेच अपोलो 24|7 सर्कल, मोफत हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक मोफत यांसारखे अतिरिक्त फायदे देण्यात येत आहेत.
दुसरा कंपनीचा 509 रुपयांचा प्लॅन आहे जो 60GB डेटा आणि 1 महिन्याच्या वैधतेसह येतो. या मध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये 489 रुपयांचे अतिरिक्त फायदे मिळत आहेत.
तसेच पुढील 199 रुपयांचा प्लॅन असून ज्याची वैधता 30 दिवसांची आहे. तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएससह 3GB डेटा मिळेल. या प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये केवळ विनामूल्य हेलोट्यून्स आणि विनामूल्य विंक संगीत यांचा समावेश आहे.
तसेच यादीत 155 आणि Rs 179 रुपयांचे प्लॅन आहेत, यात ग्राहकांना 1GB आणि 2GB डेटा दिला जात आहे. हे दोन्ही प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएस तसेच विनामूल्य हेलोट्यून्स आणि विंक म्युझिकमध्ये प्रवेश देतात.
अशातच आता तुम्हाला 30 दिवसांसाठी 25GB बल्क डेटा हवा असल्यास तुम्ही Airtel च्या 296 रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस तसेच अनेक अतिरिक्त फायदे देतो.