Reliance Jio : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. रिलायन्स जिओच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किंमती 12 टक्के ते 25 टक्के पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. कंपनीने म्हटले आहे की नवीन किंमत 3 जुलैपासून लागू होईल. जिओने आपल्या टॅरिफ टेबलमध्ये प्लॅनच्या जुन्या आणि नवीन किंमतींची माहिती दिली आहे, जेणेकरून किंमत वाढल्यानंतर ग्राहकांना आणखी किती खर्च करावा लागेल हे कळू शकेल.
Jio च्या सर्वात कमी किमतीच्या प्लानची किंमत 155 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 2 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. पण किंमत वाढल्यानंतर तुम्हाला या प्लानसाठी जास्त खर्च करावा लागेल आणि त्याची किंमत 189 रुपये होईल. म्हणजेच प्लॅनच्या किमतीत वाढ झाल्यानंतर जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज पॅकची किंमत 189 रुपये होईल.
कोणत्या योजनेची किंमत किती वाढली?
155 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवल्यानंतर ती 189 रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये एकूण 2 GB डेटा देण्यात आला आहे. जिओच्या 209 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढल्यानंतर ती 249 रुपयांची झाली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळतो.
239 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवल्यानंतर ती 299 रुपये झाली आहे. 299 रुपयांच्या प्लॅनची किंमत 349 रुपये करण्यात आली आहे.
349 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवल्यानंतर ती 399 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर 399 रुपयांच्या प्लॅनची किंमत 449 रुपये करण्यात आली आहे. या सर्व प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.
जिओच्या 479 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढल्यानंतर ती 579 रुपयांची झाली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. त्याची वैधता 56 दिवस आहे.
या यादीतील दुसऱ्या प्लानबद्दल बोलायचे झाले तर Jio च्या 533 रुपयांच्या प्लानची किंमत वाढल्यानंतर ती 629 रुपयांची झाली आहे.