टेक्नोलाॅजी

Lowest Price Mobile Phone : सॅमसंग, वनप्लस सारखे जबरदस्त फोन झाले स्वस्त, आजच आणा घरी…

Lowest Price Mobile Phone : नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर होय, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका भन्नाट ऑफर बद्दल सांगणार आहोत ज्यांतर्गत तुम्ही सॅमसंग पासून ते वनप्लस पर्यंतचे जबरदस्त फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.

नुकतेच या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये 3 ब्रँडेड स्मार्टफोन स्वस्त झाले आहेत. यामध्ये OnePlus आणि सॅमसंग साखरे प्रमुख स्मार्टफोन यादीत समाविष्ट आहेत. आजच्या या बातमीत आपण या महिन्यात कोणता स्मार्टफोन किती रुपयांनी स्वस्त झाला हे पाहणार आहोत. चला तर मग…

OnePlus 11 5G

फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात लॉन्च झालेल्या OnePlus 11 5G च्या किमतीत आता कपात करण्यात आली आहे. मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि सुपरव्हीओओसी फास्ट चार्जिंग सपोर्टसह मजबूत 5,000mAh बॅटरीद्वारे समर्थित आहे. हा फोन 8GB 128GB व्हेरिएंटमध्ये 56,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता पण आता हा फोन 5000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. हा फोन आता कंपनीच्या वेबसाइटवर 51,999 रुपयांना विकला जात आहे.

Samsung Galaxy A34

बजेट आणि मिड-बजेट स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आता या फोनची किंमत कमी केली आहे. कंपनीने Galaxy A34 5G ची किंमत 6,500 रुपयांनी कमी केली आहे. सॅमसंग इंडिया वेबसाइट Galaxy A34 5G फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह किंमती कपात केल्यानंतर आता 24,499 रुपयांना विकला जात आहे.

OnePlus Nord CE 3 5G

OnePlus Nord CE 3 5G ची किंमत या महिन्यात 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हा मिड-रेंज स्मार्टफोन 8GB 128GB व्हेरिएंटसह येतो, कंपनी आता हा फोन 24,999 रुपयांना विकत आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts