Apple Decrease iPhone Rate : आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हालाही अँपलचा आयफोन खरेदी करायचा असेल तर सध्याचा काळ हा आयफोन खरेदी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. कारण की सरकारच्या एका निर्णयामुळे ॲपलच्या आयफोनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 23 जुलैला अर्थसंकल्प मांडला. यात अर्थमंत्र्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्यात. यामध्ये मोबाईल फोन संदर्भात देखील मोठी घोषणा करण्यात आली. केंद्रातील सरकारने मोबाईल फोन आणि अनेक भागांवरील कस्टम ड्युटी 20 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणली आहे.
मोबाईल फोन व्यतिरिक्त, मोबाईल पीसीबी पॅनेल आणि चार्जरवर देखील मूलभूत कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. आधी भारतात आयात केलेल्या स्मार्टफोनवर 18 टक्के जीएसटी आणि 22 टक्के कस्टम ड्युटी लागू होते. यात बेसिक कस्टम ड्युटीच्या 10 टक्के अधिभाराचाही समावेश होता. पण अर्थसंकल्पात केंद्रातील सरकारने मोबाईल फोनसाठी लागू असणाऱ्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात केली आहे.
केंद्राच्या या निर्णयानंतर आयात केलेल्या फोनवर 16.5 टक्के कस्टम ड्युटी (15 टक्के मूळ कस्टम ड्युटी आणि 1.5 टक्के अधिभार) लागू राहणार आहे. याशिवाय, 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. हेच कारण आहे की, आता ॲपलने आपल्या फोनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Apple ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असणाऱ्या जवळपास सर्वच आयफोनच्या किमती कमी केल्या आहेत. यामुळे आता आयफोन खरेदीचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. कंपनीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 3 ते 4 टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
म्हणजेच ग्राहकांची 6000 रुपयांपर्यंत बचत होईल. ही पहिलीच वेळ आहे की कंपनीने आपल्या प्रो मॉडेल्सची किंमत देखील कमी केली आहे. Apple ने iPhone 13, iPhone 14 आणि iPhone 15 तसेच iPhone SE ची किंमत कमी केली आहे.
Apple ने iPhone 13, 14 आणि iPhone 15 ची किंमत 300 रुपयांनी कमी केली आहे. तर iPhone SE ची किंमत 2300 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. प्रो मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने आपल्या स्मार्टफोनची किंमत 5,100 रुपयांवरून 6,000 रुपयांपर्यंत कमी केली आहे. पण तुम्हाला जर हे स्मार्टफोन्स कमी किमतीत खरेदी करायची असतील तर ॲपलच्या अधिकृत स्टोअरमधून खरेदी करावी लागणार आहे.
कारण की, ही सवलत फक्त एप्पलच्या अधिकृत स्टोअरवरचं उपलब्ध राहणार आहे. मात्र लवकरच इतर किरकोळ भागीदार देखील त्यांच्या स्टोअरमधील किमती कमी करतील, अशी आशा काही जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे. यामुळे साहजिकच आयफोन प्रेमींना याचा मोठा फायदा होणार आहे.