Big Diwali Sale : सणासुदीच्या निमित्ताने फ्लिपकार्टवर सध्या बिग दिवाळी सेलचे आयोजन केले जात आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, लॅपटॉप अॅक्सेसरीज आणि इतर आवश्यक घरगुती वस्तू यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे सवलतीत मिळू शकतात. फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये Apple iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याचीही संधी आहे. फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये उपलब्ध Apple iPhone 13 डीलबद्दल आम्ही तुम्हाला सर्व काही सांगत आहोत…
Apple iPhone 13 ऑफर किंमत
सेल दरम्यान, Apple iPhone 13 Mini फ्लिपकार्टवरून 38,090 रुपयांना खरेदी करता येईल. iPhone 13 Mini चा 128 GB व्हेरिएंट लॉन्चच्या वेळी 64,900 रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. 15 टक्के सूट दिल्यानंतर, हँडसेट 54,990 रुपयांना खरेदी करता येईल. परंतु तुम्ही एक्सचेंज आणि बँक ऑफरसह फोन अधिक स्वस्तात मिळवू शकता.
iPhone 13 Mini वर 16,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. त्यांच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात, ग्राहक हा लहान स्क्रीन आयफोन 16,900 रुपयांपर्यंतच्या सूटसह घेऊ शकतात. जर ग्राहकांनी जुने डिव्हाइस 16,900 रुपयांपर्यंत एक्सचेंज केले तर iPhone 13 mini ची प्रभावी किंमत 38,090 रुपयांपर्यंत खाली येईल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की एक्सचेंज ऑफर तुमच्याकडे कोणत्या कंपनीचा फोन आहे आणि स्मार्टफोन कोणत्या स्थितीत आहे यावर अवलंबून असते. नमूद केलेल्या सर्व ऑफर 256 GB आणि 512 GB स्टोरेज वेरिएंटवर देखील लागू होतील.
बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, कोटक बँक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहाराद्वारे फोन खरेदी केल्यास 1750 रुपयांपर्यंत आणि क्रेडिट कार्डद्वारे फोन घेतल्यावर 1250 रुपयांपर्यंत सूट मिळेल. दुसरीकडे, SBI क्रेडिट कार्ड धारकांना SBI बँक कार्डद्वारे खरेदी केल्यावर 1250 रुपयांची सूट मिळेल.
iPhone 13 Mini स्मार्टफोन 128 GB, 256 GB आणि 512 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो. तो हिरवा, निळा, स्टारलाईट, प्रॉडक्ट रेड, मिडनाईट, पिंक, अल्पाइन ग्रीन आणि रेड या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये A15 Bionic चिपसेट देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 5.4 इंचाचा रेटिना डिस्प्ले आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर iPhone 13 Mini मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सल प्राइमरी आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड सेन्सर आहेत. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 12-मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे.