Blaupunkt All New Sigma Series : बाजारात Blaupunkt ने आपला नवीन 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने या स्मार्ट टीव्हीची किंमत खूपच कमी ठेवली आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बाजारात कंपनीने All New Sigma Series मध्ये नवीन 40 इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही फ्लिपकार्टवरून हा स्मार्ट टीव्ही भन्नाट डिस्कॉऊंट ऑफर्ससह खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्हाला या स्मार्ट टीव्हीवर किती डिस्कॉऊंट मिळणार आहे.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Blaupunkt चा 40-इंच स्क्रीन आकाराचा स्मार्ट टीव्ही 13,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा टीव्ही फ्लिपकार्टवर विक्रीसाठी दिला जात आहे.
फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल 5 मेपासून सुरू होत आहे. परंतु अर्ली ऍक्सेस ऑफरमध्ये तुम्ही 4 मे ते 10 मे दरम्यान टीव्ही खरेदी करू शकाल.
टीव्ही खरेदीवर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के झटपट सूट दिली जात आहे. तर SBI कार्डवर 10 टक्के सूट दिली जात आहे. यानंतर टीव्हीची किंमत जवळपास 12 हजार रुपये राहते.
Blaupkunt च्या All New Sigma Series मधील 40-inch Android Smart TV मध्ये सराउंड साउंड तंत्रज्ञानासह दोन 40W स्पीकर आहेत. या टीव्हीमध्ये 512 एमबी रॅम आणि 4 जीबी स्टोरेज आहे. हा बेझललेस स्मार्ट टीव्ही आहे. त्याच्या खालच्या बाजूस बॉटम फायरिंग बिल्ड-इन स्पीकर्स देण्यात आले आहेत.
तसेच 3 HDMI आणि 2 USB पोर्ट देण्यात आले आहेत. या टीव्हीमध्ये 300 निट्सची पीक ब्राइटनेस उपलब्ध आहे. टीव्ही लॅपटॉप, मोबाईल, पीसी सोबत जोडता येतो. यासोबतच Amazon Video, Zee5, Sony LIV आणि Voot सपोर्ट देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- IMD Rain Alert: सावधान .. महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये 72 तास धो धो पाऊस अन् गारपिटीचा इशारा ; जाणून घ्या ताजे अपडेट