BSNL : आजकाल मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनली आहे, अगदी लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मोबाईलची गरज भासते, त्यामुळे दरमहिन्याला रिचार्ज करणेही महागले आहे, अशा स्थितीत दर महिन्याला मोबाईल रिचार्ज केल्यास तुमच्या खिशावर भार पडू शकतो.
म्हणूनच वर्षभरात एकाच रिचार्ज करणे चांगले. पण त्यासाठीही खूप पैसा मोजावा लागतो. पण यावेळी आम्ही या गोष्टी लक्षात ठेवून काही परवडणारे रिचार्ज घेऊन आलो आहोत, चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हा प्लॅन भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी लाँच केला आहे. या नवीन प्लॅनची किंमत 797 रुपये आहे, हा प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉल, हाय-स्पीड डेटा आणि अनेक फायद्यांसह उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता संपूर्ण वर्षासाठी आहे.
BSNL च्या या रिचार्जमध्ये मिळणारे फायदे :
BSNL च्या रिचार्ज प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी अमर्यादित लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स मिळतात. या प्लॅनसह रिचार्ज करणार्या वापरकर्त्यांना दररोज 2 GB हाय स्पीड डेटा आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. तुम्ही दररोज 2 GB डेटा वापरल्यानंतर तुमचा इंटरनेट स्पीड 40 KBPS इतका कमी होईल.